Manoj Jarange: सरकारशी सर्व चर्चा सध्या बंद आहे, कारण? मनोज जरांगे म्हणे इंटरनेट!
मनोज जरांगे यांचे छत्रपती संभाजीनगरमध्ये उपचार सुरु होते. उपचार थंबवून आता ते आंतरवली सराटी येथे पोहोचणार असल्याचे त्यांनी सांगितले.
chhatrapati sambhajinagar: राज्यात सध्या मराठा आरक्षणप्रश्न चांगलाच तापला असून या सर्व प्रश्नी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भूमीका स्पष्ट करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीवरून पुन्हा एकदा खळखळ केल्याचे दिसून आले. सरकारशी सध्या चर्चा नाही, सध्या सर्व बंद आहे. पावसामुळे इंटरनेट बंद आहे असं कारण देत यावेळी पुन्हा ड्रोन आल्यावर ते सरकारचे असतील असे समजावे असे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे म्हणालेत.
राज्यात मराठा आरक्षणप्रश्नी सुरु केलेले आमरण उपोषण तब्येतीच्या कारणामुळे स्थगित केल्यानंतर त्यांचे छत्रपती संभाजीनगरमध्ये उपचार सुरु होते. उपचार थंबवून आता ते आंतरवली सराटी येथे पोहोचणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शरद पवार काय म्हणतात यापेक्षा माझं मन...
काल छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठा आरक्षणाबाबत त्यांची भूमिका मांडल्यानंतर मनोज जरांगे म्हणाले,शरद पवार काय म्हणतात त्यापेक्षा माझं मन ,आणि विचार ,संस्कार काय सांगतात ते महत्वाचे आहे. धनगर, मुस्लिम, लिंगायत समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. बंजारा समाजाला वेगळा प्रवर्ग करण्याची मागणी आहे.
सरकारशी चर्चा बंद आहे- मनोज जरांगे
सरकार फक्त आरक्षण देऊ देऊ असे म्हणत आहे. आमचं म्हणणे ews सुरू ठेवा. सरकारने जे करायचं ते स्पष्टपणे करावे. कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी वेळ लागत आहे. त्याला देखील व्हालडीटीसाठी वेळ वाढवून द्यावा. अशी मागणी त्यांनी केली.
सरकारशी चर्चा नाही, सध्या सर्व बंद आहे.... पावसामुळे नेट बंद आहे. असं म्हणत मनोज जरांगे यांनी इंटरनेटचे कारण पुढे केले. तसेच उद्यापासून बैठका घेणार असून पाडल्याशिवाय पर्याय नाही. समिकरण जुळवावे लागणार आहे. असे सांगत आंतरवलीला थांबणार असल्याचे सांगितले.
आमची धग मराठवाड्यापुरती नाही
आमची धग मराठवाड्यापुरती नाही असे सांगत मुंबईतदेखील आमदारांना बसणे कठीण झाले आहे. असे सांगत सत्ताधारी आणि विरोधी दोघांची जबाबदारी आहे. दोघेही एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहे.... दुसऱ्याच्या गळ्यात लफडं गुंतवण देण्याची सवय राजकारणी यांची आहे..एकमेकांवर ढकलने दोघांना परवडणार नाही, एक झटका लोकसभेत दिला आहे. असे मनोज जरांगे म्हणाले.
चंद्रकांत पाटलांनी इकडे तोंड खूपसू नये
चंद्रकांत पाटील यांनी इकडे तोंड खुपसू नयेत.. गिरीश महाजन आले होते त्यांना विचारा काय झाले होते. असे म्हणत त्यांनी प्रकाश आंबेडकरांवरही निशाणा साधला.प्रकाश आंबेडकर सत्तेत नाही आम्ही देखील नाही मग आम्ही का चर्चा करावी? असा सवाल त्यांनी केला.