एक्स्प्लोर

VIDEO : पाठीमागून काहीतरी सल्ले द्यायचे आणि आरक्षणावरून महाराष्ट्र पेटवण्याचे उद्योग करायचे; छगन भुजबळांचा बारामतीतून शरद पवारांवर निशाणा

Chhagan Bhujbal : बारामतीमधून कुणाचातरी फोन आला आणि विरोधकांनी ओबीसी आरक्षणाच्या सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार टाकला असा आरोप राज्याचे मंत्री छगन भुजबळांनी केला. 

पुणे : राज्याचे ज्येष्ठ नेते म्हणून आरक्षणाच्या प्रश्नी मार्ग काढायचं सोडून शरद पवार (Sharad Pawar) हे विरोधी पक्षांना काहीतरी सल्ले देऊन महाराष्ट्र पेटवण्याचं काम करत आहेत असा थेट आरोप राज्याचे मंत्री आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) केला. तुमचा राग अजित पवार आणि छगन भुजबळांवर असेल, मग राज्यातल्या ओबीसी समाजाने तुमचं काय घोडं मारलंय असा सवालही भुजबळांनी शरद पवारांना विचारला. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा बारामतीमध्ये मेळावा होता. त्यामध्ये छगन भुजबळ बोलत होते. 

बारामतीमधून फोन आला आणि विरोधकांनी बहिष्कार टाकला

शरद पवारांमुळे विरोधकांनी आरक्षणाच्या बैठकीवर बहिष्कार टाकल्याचा आरोप करत भुजबळ म्हणाले की, राज्यातील ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आली होती. त्यावेळी शरद पवारांना घेऊन यावं अशी विनंती जितेंद्र आव्हाडांना केली होती. व्ही पी सिंहांनी जे ओबीसी आरक्षण दिलं त्याची अंमलबजावणी शरद पवारांनी केलं याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. आता आरक्षणाच्या बाबतीत जे काही प्रश्न निर्माण होतात त्यावेळी ज्येष्ठ नेते म्हणून पवारांनी त्या बैठकीला येणं अपेक्षित होते. पण बारामतीतून कुणाचातरी फोन आला आणि विरोधकांनी बहिष्कार टाकला. 

ओबीसी समाजाने तुमचं काय घोडं मारलंय? 

तुमचा राग हा अजित पवार आणि छगन भुजबळांवर असेल, पण मग ओबीसी समाजाने तुमचं काय घोडं मारलंय असा सवाल छगन भुजबळांनी शरद पवारांना विचारला. ते म्हणाले की, बारामतीमध्ये माळी, मराठा, धनगर समाजाने तुम्हाला मंतं दिली. पण सगळ्यांच्या बाबतीत तुमची भूमिका काय हे का सांगत नाही. 

विरोधकांना पाठीमागून काहीतरी सल्ले द्यायचे आणि महाराष्ट्र पेटवायचा असा उद्योग सुरू असल्याचा थेट आरोप छगन भुजबळांनी शरद पवारांवर केला. ज्यावेळी निवडणूक येईल त्यावेळी तुमची भूमिका मांडा, आम्ही आमची मांडू. पण राज्यातील सामाजिक प्रश्न पेटत असताना तुम्ही मुद्दामहून शांत का बसताय असंही छगन भुजबळ म्हणाले. 

राज्यातल्या सामाजिक प्रश्नांवर सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र यावं आणि चर्चा करून हा प्रश्न सोडवावा असंही छगन भुजबळ म्हणाले. 

दरम्यान, भुजबळ यांनी आपल्या भाषणातून मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करताना शरद पवार यांच्यावरती जोरदार टीका केली. भाषण पूर्ण होताच उपस्थितातून 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणा देण्यात आल्या

ही बातमी वाचा: 

VIDEO Chhagan Bhujbal Baramati : बारामतीत ऐन वेळेला फोन आल्यानं विरोधक आले नाही : छगन भुजबळ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vinod Tawde : ‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
Ind vs Aus 1st Test Playing-11 : पर्थ कसोटीपूर्वीच एका फोटोमुळे टीम इंडियाच्या प्लेइंग-11 चे चित्र स्पष्ट, 'या' खेळाडूंची जागा पक्की...
पर्थ कसोटीपूर्वीच एका फोटोमुळे टीम इंडियाच्या प्लेइंग-11 चे चित्र स्पष्ट, 'या' खेळाडूंची जागा पक्की...
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 19 November 2024Jitendra Awhad Full PC : डोकं फोडून घेण्याइतका स्टंट कोणी करत नाही, आव्हाडांचा पलटवारJay Pawar on Shrinivas Pawar : तब्बेत बरी नसताना दादांची आई सभेला? जयने घटनाक्रम सांगितलाSanjay Raut on Vinod Tawde : भाजपचा खेळ खल्लास! विरार कॅशप्रकरणी संजय राऊतांची तुफान टोलेबाजी...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vinod Tawde : ‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
Ind vs Aus 1st Test Playing-11 : पर्थ कसोटीपूर्वीच एका फोटोमुळे टीम इंडियाच्या प्लेइंग-11 चे चित्र स्पष्ट, 'या' खेळाडूंची जागा पक्की...
पर्थ कसोटीपूर्वीच एका फोटोमुळे टीम इंडियाच्या प्लेइंग-11 चे चित्र स्पष्ट, 'या' खेळाडूंची जागा पक्की...
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
Vinod Tawde  : विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण... दोन्ही नेते एकाच गाडीतून हॉटेलबाहेर पडले
विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण...
Vinod Tawde : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Video : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Vinod Tawde : विनोद तावडेंसारखा नेता पैशांसोबत पकडला जातो, ही लाजिरवाणी गोष्ट, जनता धडा शिकवणार; वंचितचा हल्लाबोल
विनोद तावडेंसारखा नेता पैशांसोबत पकडला जातो, ही लाजिरवाणी गोष्ट, जनता धडा शिकवणार; वंचितचा हल्लाबोल
Vinod Tawde : पाच कोटी वाटल्याच्या आरोपावर खुद्द विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमचे विरोधक...
पाच कोटी वाटल्याच्या आरोपावर खुद्द विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमचे विरोधक...
Embed widget