भाजपचं आगामी निवडणूकांसाठी टार्गेट सेट, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, राज्यात...
राज्यात भारतीय जनता पक्षाने (भाजप) नवीन सदस्यत्व अभियानाला सुरुवात केली आहे. यावर्षी भाजपचे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांसाठी टार्गेट सेट झाले आहे.
Maharashtra Politics: राज्यात विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी खातेवाटप करण्यात आलं. गेल्या काही दिवसांपासून गृहखातं कोणाला मिळणार याची एकच चर्चा होती. हे खातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच असून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे अर्थखातं कायम आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे नगरविकास आणि गृहनिर्माण खातं आहे. तर चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे वजनदार खातं असून त्यांना महसूल खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. आता भाजपचं आगामी निवडणुकांसाठी टार्गेट सेट झालं असून राज्यात 1 कोटी 50 लाख सदस्यसंख्या करण्याचं भाजपचं लक्ष्य असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
राज्यात भारतीय जनता पक्षाने (भाजप) नवीन सदस्यत्व अभियानाला सुरुवात केली आहे. यावर्षी भाजपचे 1 कोटी 50 लाख सदस्य संख्या करण्याचे लक्ष्य आहे. पक्षाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तयारीसाठी कंबर कसली आहे. 12 जानेवारी रोजी शिर्डी येथे होणाऱ्या भाजपच्या महाअधिवेशनातून निवडणुकांचे रणशिंग फुंकले जाणार आहे. आगामी निवडणुकांसाठी प्रत्येक पातळीवर भाजप मजबूत तयारी करत असून, प्रत्येक कार्यकर्ता घराघरांत पोहोचून जनतेशी थेट संवाद साधेल, असे बावणकुळे यांनी सांगितले.
काय म्हणाले बावनकुळे?
काल आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. आपल्या भाषणात त्यांनी लोकसभेतील पराभवानंतर विधानसभेत विजय खेचून आणल्याबद्दल कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या अतुलनीय परिश्रमामुळे हा विजय शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले. फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना जादूगरांची उपमा देत त्यांची पाठ थोपटली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांनीही या मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित केले. आगामी निवडणुकांसाठी प्रत्येक पातळीवर भाजप मजबूत तयारी करत असून, प्रत्येक कार्यकर्ता घराघरांत पोहोचून जनतेशी थेट संवाद साधेल, असे बावणकुळे यांनी सांगितले. त्यांनी भाजपच्या नव्या सदस्यत्व अभियानावर भर दिला आणि कार्यकर्त्यांना अधिकाधिक नागरिकांना पक्षात सामील करण्याचे आवाहन केले. भाजपच्या या नव्या सदस्यत्व अभियानाच्या माध्यमातून पक्षाने आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पक्षाचे नेते व कार्यकर्ते सध्या सर्वसामान्य जनतेशी संपर्क साधण्यावर आणि त्यांच्या समस्या ऐकून घेण्यावर भर देत आहेत. असं ते म्हणाले.