एक्स्प्लोर

Chandrakant Patil on Majha Maha Katta : त्यावेळी एकनाथ शिंदे माझ्या मदतीला धावले, चंद्रकांत पाटलांनी सांगितला पडद्यामागचा किस्सा!

Chandrakant Patil on Majha Maha Katta : भाजपच्या आमदारांना समजावताना हिंदुत्वाच्या रक्षणासाठी, या राज्याच्या विकासासाठी मनावर दगड ठेवा, असे वक्तव्य केल्याने चंद्रकांत पाटील यांच्या टीका केली जात होती.

Chandrakant Patil on Majha Maha Katta : महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार पडल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. तर राज्यात भाजप (BJP) सर्वात मोठा पक्ष असूनही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे लागले. त्यावेळी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी भाजपच्या आमदारांना समजावताना हिंदुत्वाच्या रक्षणासाठी, या राज्याच्या विकासासाठी मनावर दगड ठेवा, असे वक्तव्य केले होते. यावरून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. मात्र त्यावेळी एकनाथ शिंदे चंद्रकांत पाटील यांच्या माझ्या मदतीला कसे धावून आले, याबाबत राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महत्वाचे वक्तव्य केले आहे. 'एबीपी माझा महाकट्टा' (Majha Maha katta) या विशेष कार्यक्रमात चंद्रकांत पाटील आणि त्यांच्या पत्नी अंजली पाटील (Anjali Patil) यांनी हजेरी लावली. त्यावेळी ते बोलत होते. 

चंद्रकांत पाटील म्हणाले की, मी काहीही बोललो तरी वाद होत होते. मी राज्याचा अध्यक्ष होतो. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्या श्रद्धेमुळे आणि संघटनेच्या प्रेमामुळे आमदारांच्या प्रतिक्रिया खूप आक्रमक होत्या. त्यांना समजावताना मी माझे परंपरागत शब्द वापरणारच ना. अरे बाबांनो हिंदुत्वाच्या रक्षणासाठी, या राज्याच्या विकासासाठी मनावर दगड ठेवा, असे मी म्हटले होते. त्यात माझे काय चुकले? त्याचा अर्थ असा लावला गेला की, एकनाथजी मुख्यमंत्री झाले हे मला आवडले नाही.

मला एकनाथ शिंदेंचे फार कौतुक वाटते

ते पुढे म्हणाले की, मला एकनाथ शिंदेंचे फार कौतुक वाटते की, मी प्रवासाला जात असताना मला एक असा फोन आला की, तुमच्याबाबत वादविवाद सुरू आहे. त्यावेळी मी म्हटलं की, वादविवाद करण्याचे काय कारण आहे? मी माझ्या कार्यकर्त्यांना अधिवेशनात समजावत होतो. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ताबडतोब दीपक केसरकर यांना सांगून दादा अडचणीत आहे, तुम्ही बोलले पाहिजे असे म्हटले. त्यानंतर दीपक केसरकर अतिशय चांगले बोलले. ते म्हणाले की, 105 आमदार, सात अपक्ष असे मिळून 112 आमदार असणाऱ्या पक्षाला उपमुख्यमंत्रीपद मिळाले तर ते पेढे वाटणार काय, त्यांना दुःख होणार, अशी पडद्यामागची स्टोरी सांगत चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले होते. 

आणखी वाचा 

Chandrakant Patil on Majha Maha Katta : रात्री दोनला अमित शाहांचा फोन, पहाटे चारला फडणवीसांची भेट, चंद्रकांतदादांनी सांगितली पहिल्या मंत्रिपदाची इनसाईड स्टोरी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Municipal Corporation: कोल्हापूर मनपात 'महिलाराज' कायम, महापौरपदी महायुतीच्या रुपाराणी निकम; जायंट किलर अक्षय जरग यांना उपमहापौरपदाची 'लाॅटरी'
कोल्हापूर मनपात 'महिलाराज' कायम, महापौरपदी महायुतीच्या रुपाराणी निकम; जायंट किलर अक्षय जरग यांना उपमहापौरपदाची 'लाॅटरी'
Rajyasabha Member: राज्यसभेच्या ६ जागा बिनविरोध होण्याची शक्यता; मविआला फटका, महायुतीचे खासदार वाढणार, शरद पवारांसह या नेत्यांचा कार्यकाळ संपणार, कसं असेल संख्याबळाचं समीकरण?
राज्यसभेच्या ६ जागा बिनविरोध होण्याची शक्यता; मविआला फटका, महायुतीचे खासदार वाढणार, शरद पवारांसह या नेत्यांचा कार्यकाळ संपणार, कसं असेल संख्याबळाचं समीकरण?
टी-20 वर्ल्डकप उद्या सुरु होणार, पहिला सामना चार दिवसांवर अन् ऑस्ट्रेलियाला तगडा झटका; भारताच्या सुद्धा मार्गातील अडथळा दूर झाला?
टी-20 वर्ल्डकप उद्या सुरु होणार, पहिला सामना चार दिवसांवर अन् ऑस्ट्रेलियाला तगडा झटका; भारताच्या सुद्धा मार्गातील अडथळा दूर झाला?
एकदा मी बोलायला सुरुवात केली की थांबत नाही हे आता त्यांना माहीत झालंय, त्यांची डाळ शिजणार नाही : पीएम मोदी
एकदा मी बोलायला सुरुवात केली की थांबत नाही हे आता त्यांना माहीत झालंय, त्यांची डाळ शिजणार नाही : पीएम मोदी

व्हिडीओ

Bajrang Sonawane on Ajit Pawar : अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता का तपासा, बजरंग सोनवणेंची मागणी
Sambhaji Nagar Mayor : भाजपचे समीर राजूरकर संभाजीनगरचे महापौर, तर उपमहापौर शिवसेनेकडे
Shivendraraje Bhosale Satara : मला डिवचू नका… मी छत्रपतींची औलाद आहे; विरोधकांना थेट इशारा
Pankaj Bhoyar Nagpur : चंद्रपुरात भाजप-ठाकरे गट एकत्र येतील का? पंकज भोयर स्पष्टच बोलले..
Rohit Shetty And Baba Siddique Case : बाबा सिद्दिकी-रोहित शेट्टी दोन्ही आरोपींचा म्होरक्या एकच

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Municipal Corporation: कोल्हापूर मनपात 'महिलाराज' कायम, महापौरपदी महायुतीच्या रुपाराणी निकम; जायंट किलर अक्षय जरग यांना उपमहापौरपदाची 'लाॅटरी'
कोल्हापूर मनपात 'महिलाराज' कायम, महापौरपदी महायुतीच्या रुपाराणी निकम; जायंट किलर अक्षय जरग यांना उपमहापौरपदाची 'लाॅटरी'
Rajyasabha Member: राज्यसभेच्या ६ जागा बिनविरोध होण्याची शक्यता; मविआला फटका, महायुतीचे खासदार वाढणार, शरद पवारांसह या नेत्यांचा कार्यकाळ संपणार, कसं असेल संख्याबळाचं समीकरण?
राज्यसभेच्या ६ जागा बिनविरोध होण्याची शक्यता; मविआला फटका, महायुतीचे खासदार वाढणार, शरद पवारांसह या नेत्यांचा कार्यकाळ संपणार, कसं असेल संख्याबळाचं समीकरण?
टी-20 वर्ल्डकप उद्या सुरु होणार, पहिला सामना चार दिवसांवर अन् ऑस्ट्रेलियाला तगडा झटका; भारताच्या सुद्धा मार्गातील अडथळा दूर झाला?
टी-20 वर्ल्डकप उद्या सुरु होणार, पहिला सामना चार दिवसांवर अन् ऑस्ट्रेलियाला तगडा झटका; भारताच्या सुद्धा मार्गातील अडथळा दूर झाला?
एकदा मी बोलायला सुरुवात केली की थांबत नाही हे आता त्यांना माहीत झालंय, त्यांची डाळ शिजणार नाही : पीएम मोदी
एकदा मी बोलायला सुरुवात केली की थांबत नाही हे आता त्यांना माहीत झालंय, त्यांची डाळ शिजणार नाही : पीएम मोदी
RBI MPC Meeting: आरबीआयकडून पतधोरण जाहीर, रेपो रेटमध्ये कोणतेही बदल नाही; कर्जे महागणार नाहीत, ईएमआयही वाढणार नाही
आरबीआयकडून पतधोरण जाहीर, रेपो रेटमध्ये कोणतेही बदल नाही; कर्जे महागणार नाहीत, ईएमआयही वाढणार नाही
तब्बल 17 जणांची डीएनए चाचणी अन् जन्मदाता बापच बलात्कारी निघाला; पाच महिन्यांची गर्भवती असलेल्या मूकबधिर मुलीची शोकांतिका, महाराष्ट्रात काय सुरुय?
तब्बल 17 जणांची डीएनए चाचणी अन् जन्मदाता बापच बलात्कारी निघाला; पाच महिन्यांची गर्भवती असलेल्या मूकबधिर मुलीची शोकांतिका, महाराष्ट्रात काय सुरुय?
Ranveer Singh Use Three Vanity Van During Dhurandhar Shoot: 'धुरंधर'च्या शुटिंगवेळी फक्त रणवीर सिंहसाठी 3 व्हॅनिटी व्हॅन? सोशल मीडियावरच्या 'त्या' पोस्टनं वातावरण तापलं
'धुरंधर'च्या शुटिंगवेळी फक्त रणवीर सिंहसाठी 3 व्हॅनिटी व्हॅन? सोशल मीडियावरच्या 'त्या' पोस्टनं वातावरण तापलं
Dharashiv News: दोन दिवसांपासून येतायत गूढ आवाज, घरातील भांडी, दरवाजे खिडक्या हादरल्या; धाराशिवमध्ये नेमकं काय घडतंय?
दोन दिवसांपासून येतायत गूढ आवाज, घरातील भांडी, दरवाजे खिडक्या हादरल्या; धाराशिवमध्ये नेमकं काय घडतंय?
Embed widget