Chandrahar Patil on Vishal Patil : मला हरवण्यासाठी विशाल पाटलांना भाजपचं पाकिट, शेतकऱ्यांच्या मुलाविरोधात दोन दरोडेखोर, विश्वजीत कदमांच्या उपस्थित चंद्रहार पाटलांचा हल्लाबोल
Chandrahar Patil on Vishal Patil and Sanjaykaka Patil, Sangli : माझी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती, तरी उद्धव ठाकरे यांनी माझ्यावर विश्वास टाकला. माझ्याविरोधात एक नाही तर दोन उमेदवार उभे राहिले, पण माझ्या विरोधात बोलण्यासारखे काही नाही.
Chandrahar Patil on Vishal Patil and Sanjaykaka Patil, Sangli : "माझी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती, तरी उद्धव ठाकरे यांनी माझ्यावर विश्वास टाकला. माझ्याविरोधात एक नाही तर दोन उमेदवार उभे राहिले, पण माझ्या विरोधात बोलण्यासारखे काही नाही. राजकारण माझ्यासाठी नवे नाही. 35 वर्षानंतर सांगलीला डबल महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून दिली आहे", असे सांगलीचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील (Chandrahar Patil ) म्हणाले. सांगलीत काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांच्या उपस्थितीत प्रचार सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. चंद्रहार पाटलांनी विश्वजीत कदम यांच्या उपस्थितीत विशाल पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला. शिवाय संजयकाका पाटलांवरही सडकून टीका केली.
प्रामाणिकपणे बंडखोरी केली असती तर ती जनतेने स्वीकारली असती
चंद्रहार पाटील म्हणाले, मविआमध्ये बंड व्हायला नको हवे होते. जे काँग्रेसची उमेदवारी मिळेल म्हणून नाचत होते त्यांची उमेदवारी पक्षाने डावलली. मदन पाटील यांचा जिल्हा बँकेत, विधानसभेत कसा पराभव केला? पृथ्वीराज पाटील यांचा विधानसभेत कसा पराभव झाला आणि कुणी केला हे सांगलीला माहिती आहे. वसंतदादांचं नाव घेऊन नेहमी भाषणाला सुरुवात केली जाते. प्रामाणिकपणे बंडखोरी केली असती तर ती जनतेने स्वीकारली असती, असंही चंद्रहार पाटील यांनी म्हटलं आहे.
तर तुमचीही पराभवाची हॅट्रिक होईल
पुढे बोलताना चंद्रहार पाटील म्हणाले, भाजपचं मोठं पाकीट घेऊन शेतकऱ्याच्या पोराला हरवण्यासाठी विशाल पाटील प्रयत्न करत आहेत. भाजपची बी टीम म्हणून काम करत असताना आणि संजयकाकाची (Sanjaykaka Patil) हॅटट्रीक करुन देण्याचा तुमचा प्रयत्न असेल तर तुमचीही पराभवाची हॅट्रिक होईल हे तुमच्या लक्षात कसे आले नाही? शेतकऱ्याच्या मुलाविरोधात दोन दरोडेखोर , दोन साखर कारखाना दार उभे आहेत. दोघांनीही दहा दहा वर्ष शेतकऱ्यांची ऊसाची बिल दिली दिली नाहीत, असा दावाही चंद्रहार पाटील यांनी केला.
विश्वजीत कदम म्हणाले, मुख्यमंत्रिदाची इच्छा नसताना देखील तुम्ही मुख्यमंत्रिपद स्वीकारलं. सामान्य शिवसैनिकाकडे मुख्यमंत्रिपद जावं ही तुमची इच्छा होती. तुम्ही मुख्यमंत्री असलेल्या सरकारला देखील दृष्ट लागली. कोविड काळात लोकांचे जीव वाचवण्याचे नैतिक जबाबदारी नैतिक जबाबदारी समर्थपणे पाळली. आपण एकत्र काम करतोय हे काही लोकांना बघवलं नाही.
इतर महत्वाच्या बातम्या