एक्स्प्लोर

Maharashtra Politics : भाजप आमदार समीर मेघे अन् आमदार चरणसिंग ठाकूरांना नागपूर खंडपीठाने बजावली नोटीस; नेमकं प्रकरण काय?

भाजपचे हिंगणा येथील आमदार समीर मेघे आणि आमदार चरणसिंग ठाकूर यांना नोटीस धाडण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीला दिलेल्या आव्हान प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ही नोटिस बजावली आहे.

Maharashtra Assembly Election Results 2024 : नागपूर जिल्ह्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजपचे हिंगणा येथील आमदार समीर मेघे (Sameer Meghe) आणि काटोलचे आमदार चरणसिंग ठाकूर (Charansingh Thakur) यांना नोटीस धाडण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीला दिलेल्या आव्हान प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ही नोटिस बजावली आहे. परिणामी, या दोन्ही आमदारांना तीन आठवड्यात आपला जबाब नोंदवण्याचे निर्देशही नागपूर खंडपीठाने दिले आहे.  

तीन आठवड्यात जबाब नोंदवण्याचे निर्देश; नेमकं प्रकरण काय?

पुढे आलेल्या माहितीनुसार, हिंगणा मतदारसंघातील भाजपचे आमदार समीर मेघे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे पराभूत उमेदवार रमेशचंद्र बंग यांनी निवडणूक याचिका दाखल केली होती. तर काटोल मतदारसंघातील भाजपचे विजयी उमेदवार आमदार चरणसिंग ठाकूर यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार सलील देशमुख यांनी याचिका दाखल केली. विधानसभा निवडणुकीत विद्यामान आमदारांनी नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करत त्यांची निवड अवैध ठरण्याची मागणी या याचिकेतून करण्यात आली होती. सोबतच या मतदारसंघात पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी ही या याचिकेतून करण्यात आली आहे. दरम्यान याच प्रकरणी आता आमदार समीर मेघे आणि आमदार चरणसिंग ठाकूर यांना नोटीस धाडण्यात आली आहे. या नोटिसवर हे दोन्ही आमदार नेमकं काय उत्तर सादर करतात, आणि या याचिकेतून पुढे काय होतं? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

अशी रंगली होती विधानसभा निवडणुक

नागपुरातील 12 मतदारसंघातील  'हायप्रोफाइल' लढतीत काटोल विधानसभा मतदारसंघातही काटेकी टक्कर झाल्याचे बघायला मिळाले. कारण या मतदारसंघात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांच्याविरोधात भाजपचे चरणसिंग ठाकूर उभे होते. तर दुसरीकडे ऐन निवडणुकीच्या धामधुमीत अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाल्यामुळे येथील राजकारण तापले होते. मात्र मतदारांनी ठाकूर यांच्यावर विश्वास टाकला व त्यांचा 38 हजार816 मताधिक्याने विजय झाला आहे.

अशातच राज्याच्या राजकारणात महत्वाचा समजला जाणाऱ्या नागपूरातील 12 मतदारसंघापैकी एक असलेल्या नागपूरच्या हिंगणा विधानसभा मतदारसंघात  भाजपने मोठा विजय मिळवला. या मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा महायुतीकडून भाजपच्या तिकिटावर समीर मेघे (Sameer Meghe) हे मैदानात उतरले.  तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर माजी मंत्री रमेश बंग (Ramesh Bang) मैदानात होते. या विधानसभा क्षेत्रात निवडणुकीत बरेच उमेदवार मैदानात असले तरी खरी लढत मेघे विरुद्ध बंग यांच्यातच होती. मात्र या दोन दिग्गजांच्या लढतीत भाजपने विजयाचा गुलाल उधळत सलग तिसऱ्यांदा समीर मेघे यांनी मोठे यश संपादन केलं आहे. 

हे ही वाचा 

 

'एबीपी माझा'मध्ये कार्यरत. मी मराठी आणि नेटवर्क १८ लोकमत मध्ये कामाचा अनुभव 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Smriti Irani On Rahul Gandhi : 'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
मोठी बातमी! भिवंडीत राजकीय भूकंप, समाजवादी पक्षाच्या 6 नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी; स्वीकृत निवडीवरुन वाद
मोठी बातमी! भिवंडीत राजकीय भूकंप, समाजवादीच्या 6 नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी; स्वीकृत निवडीवरुन वाद
सुनेत्रा पवारांचं भाषण, शरद पवारांच्या बाजुला मुख्यमंत्री फडणवीसांची जयंत पाटलांसोबत चर्चा; अनेकांच्या भुवया उंचावल्या
सुनेत्रा पवारांचं भाषण, शरद पवारांच्या बाजुला मुख्यमंत्री फडणवीसांची जयंत पाटलांसोबत चर्चा; अनेकांच्या भुवया उंचावल्या

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Railway Bonus :रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
Smriti Irani On Rahul Gandhi : 'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
JIO IPO :जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड आयपीओद्वारे 27 कोटी शेअर जारी करणार, जिओचा IPO 'या' तारखेला खुला होणार
भारतातील सर्वात मोठा आयपीओ 'या' तारखेला खुला होणार, जिओच्या IPO संदर्भात मोठी अपडेट समोर
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
प्रत्येक रेल्वे तिकिटावर विमा सुविधा देणं बंधनकारक, सुप्रीम कोर्टाचे भारतीय रेल्वेला आदेश, 27 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू होणार
मोठी बातमी, रेल्वे काऊंटरवरुन खरेदी केलेल्या तिकिटाला विमा सुविधा द्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश
Embed widget