BMC Election 2026 Survey: मोठी बातमी: अमराठी मतदार गेम फिरवणार, भाजप-शिंदेसेनेला भरघोस मतं मिळण्याचा अंदाज, नव्या सर्व्हेत कुणाची धाकधूक?
BMC Election 2026 Survey: ठाकरे बंधूंसाठी आनंदाची बातमी, मुंबईतील मराठी माणूस खंबीरपणे पाठीशी उभा राहणार पण..., BMC निवडणुकीच्या सर्व्हेत कोणत्या पक्षाला किती टक्के मतं?

Raj Thackeray and Uddhav Thackeray BMC Election 2026 Survey: संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेला मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला आता रंगत चढली आहे. सोमवारपासून मुंबईत ठाकरे बंधू आणि महायुतीच्या नेत्यांच्या प्रचारसभा सुरु होणार आहेत. मुंबईची यंदाची निवडणूक ठाकरे बंधूंसाठी अस्तित्वाची लढाई मानली जात आहे. तर भाजपने (BJP) यंदा मुंबईत कोणत्याही परिस्थितीत आपलाच महापौर बसवायचा, असा चंग बांधला आहे. ठाकरे बंधूंनी (Thackeray brothers) मुंबईतील मराठी मतदारांवर लक्ष केंद्रित केले आहे. तर भाजप आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेने मराठी मतदारांसोबत उत्तर भारतीय व अन्य अमराठी मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी खास रणनीती आखली आहे.
या पार्श्वभूमीवर AsceIndia या संस्थेने मुंबई महानगरपालिका निवडणुकीत कोणत्या पक्षाला कोणत्या समाजाची किती टक्के मतं मिळतील, याबाबतच्या एका सर्व्हेची आकडेवारी जाहीर केली आहे. या सर्व्हेनुसार मुंबईतील जवळपास निम्मे मराठी मतदार ठाकरे बंधूंच्या पाठीशी उभे राहणार असले तरी मुंबईत भाजप आणि शिवसेनेचीच सत्ता येईल, असा अंदाज आहे. अमराठी मतदार भाजप आणि शिंदे गटाला भरभरुन मतदान करेल, असा अंदाज या सर्व्हेत वर्तविण्यात आला आहे. मुंबईत ठाकरे बंधूंना माफक यश मिळण्याचा अंदाज सर्व्हे करणाऱ्या AsceIndia संस्थेचे संस्थापक अमिताभ तिवारी यांनी व्यक्त केला आहे. अमिताभ तिवारी यांच्या मते मुंबईतील 2017 च्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी 55 टक्के होती. यंदाही याच टक्केवारीच्या आसपास मतदान होईल, असे अमिताभ तिवारी यांनी म्हटले. त्यामुळे या सर्व्हेनुसार मुंबईत भाजप-शिवसेनेचा महापौर बसणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. परंतु, आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पक्षाला किती जागा मिळतात आणि ते मुंबईत आपले अस्तित्त्व राखणार का, हे पाहणे औत्स्युकाचे ठरेल. (Mumbai Election Result Survey 2026)
Mumbai Election 2026: BMC निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती टक्के मतं मिळणार?
Marathi Voters in Mumbai: मराठी मतदार
भाजप-शिवसेना- 42 टक्के
ठाकरे गट- मनसे- 44 टक्के
काँग्रेस- 4 टक्के
इतर- 11 टक्के
Muslim Voters in Mumbai: मुस्लीम मतदार कोणाच्या बाजूने?
भाजप-शिवसेना- 11 टक्के
ठाकरे गट- मनसे- 28 टक्के
काँग्रेस- 41 टक्के
इतर- 20 टक्के
Non Marathi Voters in Mumbai: अमराठी मतदार कोणाच्या बाजूने?
भाजप-शिवसेना- 53 टक्के
ठाकरे गट- मनसे- 15 टक्के
काँग्रेस- 19 टक्के
इतर- 13 टक्के
आणखी वाचा























