एक्स्प्लोर

BMC Election 2026: काँग्रेस 156, वंचित 62, शरद पवार गटाला 9 वॉर्ड, मुंबईत काँग्रेस-वंचितचं जागावाटप आज जाहीर होण्याची शक्यता

BMC Election 2026: मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी मंगळवार हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यापूर्वी जागावाटप जाहीर होण्याची शक्यता आहे. वंचित आणि काँग्रेस मुंबईत एकत्र

BMC Election 2026: आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या युतीकडून रविवारी जागावाटप जाहीर होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडी (VBA) आणि काँग्रेस (Congress) यांच्यात चर्चा सुरु आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही (NCP) या दोन्ही पक्षांशी पडद्यामागून चर्चा सुरु आहे. मात्र, या दोन्ही पक्षांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला फार कमी जागा देऊ केल्या आहेत. त्यामुळे आता मुंबईत शरद पवार गटाला स्वबळावर लढण्याची वेळ येऊ शकते. (Mumbai Mahanagarpalika Election 2026)

सूत्रांच्या माहितीनुसार, वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची आघाडीची घोषणा आज होण्याची दाट शक्यता आहे. काँग्रेसकडून वंचित बहुजन आघाडीला 62जागांचा प्रस्ताव देण्यात आला आहे तर काँग्रेस मुंबईत तब्बल 156 जागा लढण्याच्या तयारीत आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला केवळ 9 जागा सोडण्याची तयारी काँग्रेसने दाखवली आहे. 2017 साली निवडून आलेल्या नगरसेवकांपैकी केवळ एक जागा सोडण्यास काँग्रेस तयार आहे. उद्धव ठाकरेंची सेना काँग्रेसपेक्षा जास्त जागा देऊ करत असल्यामुळे ठाकरेंसोबत सुत जुळवून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रयत्न सुरु असल्याचे समजते. याबाबत आज दिवसभरात मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे.  मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी येत्या 15 जानेवारीला मतदान प्रक्रिया पार पडेल. त्यानंतर 16 जानेवारीला 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीची मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल. पुढील आठवड्यातील मंगळवार हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे.

 BJP Shivsena seat sharing: मुंबईत भाजप-शिवसेनेचा जागावाटपाचा जवळपास फॉर्म्युला ठरला

मुंबईत आतापर्यंत भाजप आणि शिंदे गटात 207 जागांवर एकमत झालं आहे. पण तरीदेखील 20 जागांवर पेच कायम आहे. आतापर्यंत ठरलेल्या जागावाटपानुसार भाजपच्या वाटेला निवडणूक लढण्यासाठी 128 जागा आणि शिवसेना शिंदे गटाला 79 जागा देण्याबाबत एकमत झाल्याची माहिती आहे.

KDMC Election 2026: कल्याण-डोंबिवलीत शिवसेना 65 जागांवर लढणार, भाजपला  57 जागा 

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिवसेनेला किमान 65, तर भाजपला 57 जागा मिळणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपची सता असल्याने कल्याण-डोंबिवलीत 84 जागा मिळाल्या तरच युती मान्य करायची अशी भाजपच्या स्थानिक नेत्यांची भूमिका होती. मात्र, आता भाजप 57 जागांवर लढण्यास राजी झाल्याची माहिती समोर येत आहे.

आणखी वाचा

मोठी बातमी! मुंबईसाठी भाजप महायुतीचं ठरलं, शिंदेंच्या शिवसेनेला 79 जागा; 20 जागांसाठी वेगळाच फॉर्म्युला

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
Pune NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
Embed widget