Hingoli Lok Sabha: हिंगोलीत भाजपची ताकद सर्वाधिक, कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी; रामदास पाटील सुमठाणकरांची पक्षश्रेष्ठींना साद
Hingoli Lok Sabha Constituency: सध्या भाजपची या मतदारसंघात ताकद सर्वाधिक आहे. त्यामुळे ही जागा भाजपसाठी सोडून द्यावी, अशी मागणी लोकसभेचे प्रभारी रामदास पाटील सुमठाणकर हे करत आहेत.
Hingoli Lok Sabha Election 2024: हिंगोली : हिंगोली लोकसभेच्या (Hingoli Lok Sabha Constituency) जागेवर भाजपकडून (BJP) महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकार स्थापन झाल्यापासूनच तयारी करण्याच्या सूचना या जिल्ह्यातील नेत्यांना देण्यात आल्या होत्या. तेव्हापासून प्रशासनाचा दांडगा अनुभव असतानादेखील प्रशासकीय सेवेचा राजीनामा देत रामदास पाटील सुमठाणकर (Ramdas Patil Sumthankar) यांनी भाजप पक्षात प्रवेश केला. तेव्हापासूनच हिंगोली लोकसभेसाठी रामदास पाटलांनी तयारी सुरू केली होती. आता ही जागा महायुतीत शिवसेनेकडे देण्यात आली आहे. असं असलं तरी सध्या भाजपची या मतदारसंघात ताकद सर्वाधिक आहे. त्यामुळे ही जागा भाजपसाठी सोडून द्यावी, अशी मागणी लोकसभेचे प्रभारी रामदास पाटील सुमठाणकर हे करत आहेत.
एबीपी माझाशी बोलताना रामदास पाटील सुमठाणकर म्हणाले की, "प्रशासकीय सेवेचा राजीनामा देऊन अडीच तीन वर्ष होत आहेत. राजीनामा दिल्याबरोबर हिंगोली जिल्ह्यातून भारतीय जनता पार्टी प्रवेश केला, तेव्हापासून या मतदारसंघात काम करतोय, लोकसभा प्रवास योजनेच्या माध्यमातून दोन हजार बूथपर्यंत संघटन सुरू केलेलं आहे."
एकमतानं जागा आपल्याकडे घ्या : रामदास पाटील सुमठाणकर
"मी इच्छुक तर आहे, देवेंद्र फडणवीस यांची आम्ही बारा ते पंधरा जणांनी भेट घेतली. हिंगोली लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजप संघटन अत्यंत महत्त्वाचं आणि प्रबळ आहे. त्यामुळे या ठिकाणी भाजपचा उमेदवार विक्रमी मतांनी निवडून येऊ शकतो, असा आम्हाला विश्वास आहे आणि आम्ही काय आलो, त्यापैकी बरेच जण इच्छुक आहोत. एकमतानं जागा आपल्याकडे घ्या आणि मागच्या निकालापेक्षा किमान दोन तरी अधिक मतानं जागा निवडून आणू.", असा विश्वास रामदास पाटील मम यांनी व्यक्त केला आहे.
"मान्य आहे की, मागच्या अनेक वर्षांमध्ये शिवसेनेचे आमदार खासदार दिलेत. परंतु, वर्तमानात मतदारसंघात भाजपची ताकद सर्वात मोठी आहे. वर्तमानामध्ये भाजपचे तीन आमदार आहेत, भाजपची आताची ताकद मागच्या कित्येक पटींनी वाढलेली आहे, निवडून येण्यासाठी लागणारं गणित येथे भाजपकडे आहे, त्यामुळे आम्हाला वाटतं की, अशा वेळी कमळाच्या चिन्हावरती भारतीय जनता पार्टीनं या ठिकाणी लढावं.", असंही रामदास पाटील सुमठाणकर म्हणाले आहेत.
'अबकी बार चारसो पार'मध्ये हिंगोलीची जागा असणारच : रामदास पाटील सुमठाणकर
"आमचा उमेदवार महायुतीतील चिन्ह आहे, मोदीजींना तिसऱ्या वेळेस पंतप्रधान करायचं आहे. हा आमचा उद्देश आहे, अबकी बार चारसो पारमध्ये हिंगोलीची जागा असणार आहे. 2019 ला आम्ही भाजपची ताकत दाखवली. आताही आमची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे, मागील अडीच वर्षात लोकसभा जिंकण्याचा उद्देशानं आम्ही इथं काम केलं आहे. महायुतीत जागा कोणालाही सुटली, तर आम्ही युती धर्म पाळणार, असंही रामदास पाटील रामदास पाटील सुमठाणकर म्हणाले आहेत. तसेच, शीर्ष नेतृत्व लवकरात लवकर जागा जाहीर करतील आणि महाराष्ट्र राज्यातील आणि पार्लमेंटरी बोर्ड हा निर्णय घेत असतात, आम्हाला आदेश दिला की, आम्ही कामाला लागतो, असंही सुमठाणकर म्हणाले आहेत.