एक्स्प्लोर

Ajit Pawar : भाजप-अजित पवारांच्या संबंधित 13 कारखान्यांवर राज्य सरकारची खैरात, 1,898 कोटींचे कर्ज मिळणार, काँग्रेसच्या संग्राम थोपटेंनाही लाभ

Maharashtra lok Sabha Election : भाजपशी संबंधित पाच तर अजित पवार यांच्या संबंधित सात कारखान्यांना राज्य सरकार स्वतःच्या जबाबदारीवर कर्ज मिळवून देणार आहे. त्यामध्ये काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांचाही समावेश आहे. 

मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या आधी राज्यातील भाजप (BJP) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्याशी संबंधित 13 साखर कारखान्यांना (Sugar Factory)  1898 कोटींचे कर्ज देण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. राज्य सरकार स्वत:च्या जबाबदारीवर राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून हे कर्ज घेऊन ते कारखान्यांना देणार असल्याची माहिती आहे. महत्त्वाचं म्हणजे आचारसंहिता लागू होण्याच्या आधी मंत्रीमंडळ उपसमितीने या प्रस्तावाला मान्यता दिल्याचं समोर आलं आहे. 

राज्य सरकारच्या एका समितीने 13 कारखान्यांची त्यासाठी निवड केली आहे. त्यामध्ये भाजपचे 5 राष्ट्रवादीचे 7 आणि एक कारखाना काँग्रेसशी संबंधित आमदाराचा आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांना खूश करण्यासाठी त्यांच्या राजगड साखर कारखान्यास 80 कोटी रुपयांची कर्जहमी देण्यात येणार आहे. 

अजित पवार गटाशी संबंधित कारखाने

- लोकनेते सुंदररावजी सोळंके साखर कारखाना (बीड)- 104  कोटी
- किसनवीर (सातारा)- 305 कोटी
- किसनवीर (खंडाळा)- 150 कोटी
- लोकनेते मारोतराव घुले पाटील ज्ञानेश्वर कारखाना(नेवासा) - 150 कोटी
- अगस्ती (अहमदनगर) - 100 कोटी
- अंबाजोगाई (बीड)- 80 कोटी
- शिवाजीराव नागवडे (श्रीगोंदा)- 110 कोटी

भाजपशी संबंधित कारखाने 

- संत दामाजी(मंगळवेढा) - 100 कोटी,
- वृद्धेश्वर (पाथर्डी)- 99 कोटी
- सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे ( कोपरगाव) -125 कोटी
- तात्यासाहेब कोरे वारणानगर (कोल्हापूर) -350 कोटी
- बसवराज पाटील यांचा विठ्ठलसाई (धाराशिव) -100 कोटी

काँग्रेसच्या संग्राम थोपटेंच्या कारखान्याला 80 कोटींचे कर्ज

राज्य सरकारने हमी घेतलेल्या या कारखान्यांमध्ये काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांच्या कारखान्याचा समावेश आहे. संग्राम थोपटे यांच्या राजगड साखर कारखान्याला 80 कोटींचे कर्ज देण्यात येणार आहे. 

संग्राम थोपटे हे बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर विधानसभेचे आमदार असून त्यांना खूश करण्यासाठी आणि आपल्याकडे वळवण्यासाठी अजित पवारांनी ही चाल खेळल्याचं बोललं जातंय. संग्राम थोपटे हे सध्या सुप्रिया सुळेंसोबत आहेत. तर या ठिकाणाहून सुनेत्रा पवार या महायुतीच्या उमेदवार असतील.

शरद पवारांनी गेल्या 40 वर्षांचे राजकीय वैर विसरून भोरच्या अनंतराव थोपटे यांची भेट घेतली आणि सु्प्रिया सुळेंसाठी बारामतीचं गणित जुळवून आणल्याची चर्चा आहे. त्याचवेळी आता अजित पवार गटाकडूनही त्यांना आपल्यासोबत घेण्यासाठी हालचाली सुरू असल्याचं दिसून येतंय. त्याचाच एक भाग म्हणून संग्राम थोपटे यांच्या कारखान्याला 80 कोटींचे कर्ज मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने स्वतः हमी घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

ही बातमी वाचा:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6PM 14 January 2025Walmik Karad Supporters: कराडवर लोकांचं प्रेम, परळी थांबलीय, कार्यकर्त्याने अंगावर पेट्रोल ओतलंAjit Pawar On Walmik Karad | दोषींवर योग्य ती कारवाई केली जाणार, मुंडेंबाबत प्रश्न अजितदादा म्हणाले...ABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5PM 14 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
Walmik Karad MCOCA : लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
Embed widget