Pankaja Munde : धस म्हणाले, देवेंद्र फडणवीस बाहुबली, मी शिवगामी, मेरा वचन ही है शासन : पंकजा मुंडे
Pankaja Munde : मी गोपीनाथ मुंडे यांची लेक असून जे बोलते तेच करत असल्याचे म्हणत भाजप आमदार आणि मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी आष्टी येथील कार्यक्रमात तुफान फटकेबाजी केली आहे.

बीड : युवा कार्यकर्ते आज देवेंद्र फडणवीस यांना बाहुबली म्हणून संबोधतात. मात्र असाच एक किस्सा मला आज या निमित्ताने आठवला तो म्हणजे, मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला जेव्हा बाहुबली म्हटलं जातं त्याचं वेळी तुम्ही आमच्यापेक्षा ज्येष्ठ आहात, आदरणीय आहात. आमच्या मनात कायम आदर भावच तुमच्या बाबतीत येतो. मात्र आज ममत्व भाव येतोय. त्यामुळे आज जरी तुम्हाला कार्यकर्ते बाहुबली म्हणत असले तरी काही वर्षांपूर्वी मला शिवगामी म्हणत होते. मुळात शिवगामी ही बाहुबलींची आई आहेत. त्यामुळे तुमच्याकडे बघून आज मला वेगळाच भाव आलाय.
सुरेश धस यांनी भाषणात बोलताना ज्या प्रमाणे सिनेमातले डायलॉग म्हटले त्याच प्रमाणे आज आम्हीही सिनेमातले डायलॉग बोलू, आणि शिवगामीच वाक्य असतं 'मेरा वचन ही है मेरा शासन' आणि जे वाचन मी आमदार सुरेश धस यांना दिलंय तेच माझं शासन आहे. मी गोपीनाथ मुंडे यांची लेक असून जे बोलते तेच करत असल्याचे म्हणत भाजप आमदार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी बीड जिल्ह्याच्या आष्टीतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीतील कार्यक्रमात तुफान फटकेबाजी केली. आष्टी उपसा सिंचन योजनेच्या कामाच्या शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी पर्यावरण मंत्री तथा पालकमंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) बोलत होत्या.
मीही मुख्यमंत्र्यांची लाडकीच, म्हणून त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये आले- पंकजा मुंडे
आज जाहीर कार्यक्रमात चर्चा होती की पंकजा मुंडे येणार, तर काहींना शंका होती. मात्र मी कार्यक्रमाला का येणार नाही? सुरेश धस यांनी आपल्या मुलाचे लग्न केलं त्यावेळी साडी देऊन मला आमंत्रित केलं होतं. तेव्हा मी आवर्जून लग्नाला गेले होते. मात्र आता धाकट्याच्या लग्नाच्या वेळी बोलवलं तर येणार मात्र नाही बोलवलं तर नाही येणार. मात्र आजचा कार्यक्रम शासकीय आहे, आणि आज तरी शासन हे देवेंद्र फडणवीस यांचे आहे. त्यामुळे मी कार्यक्रमाला आले आहे. हा माझ्या जिल्ह्याचा, माझ्या शेतकऱ्यांचा कार्यक्रम आहे. त्यामुळे बॅनरमध्ये फोटो आहे का? पत्रिकेमध्ये नाव आहे का? माझी बसायची जागा काय, यात मी पडले नाही. यदाकदाचित मला तुमच्यात बसवलं असतं तर तिथे बसूनही मी कार्यक्रम बघितला असता. मात्र माझं भाग्य मोठा आहे आणि मीही मुख्यमंत्र्यांची लाडकीच आहे. म्हणून मी त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये आल्याचे ही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.
मंत्री झाल्याने माझेही थोडे नशीब आहे- पंकजा मुंडे
बीड जिल्ह्यात ज्यावेळी सहा पैकी पाच आमदार निवडून येतात त्यावेळी तुम्ही मुख्यमंत्री होता. बीड जिल्हा त्यामानाने फार लकी आहे, कारण 2014 मध्ये सहापैकी 4 आमदार निवडून आले. आता आमचे सहकारी आमच्या सोबत आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी आम्ही मरमर करून आमदार निवडून आणले. आज मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस आज पहिल्यांदाच जिल्ह्यात आले आहेत. तुम्ही मुख्यमंत्री झाल्यानंतर जिल्ह्यात प्रथम आले, तसे मीही मंत्री झाल्याने माझेही थोडे लक आहे. असेही मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या.
हे ही वाचा























