एक्स्प्लोर

Pankaja Munde: मोठी बातमी: भाजपकडून पंकजा मुंडेंना राज्यसभेवर पाठवण्याच्या हालचाली, दिल्लीतील बैठकीत निर्णय?

Maharashtra Politics: बीड लोकसभा मतदारसंघात पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे यांना भाजपकडून राज्यसभेवर संधी दिली जाण्याची शक्यता. मराठवाड्यात भाजपला मोठा फटका बसल्याने पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर संधी देण्याची महाराष्ट्रातील नेत्यांची विनंती.

मुंबई: बीड लोकसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसलेल्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना आता राज्यसभेवर पाठवले जाऊ शकते. भाजपच्या गोटात त्यादृष्टीने हालचाली सुरु असल्याचे कळते. दिल्लीत नुकतीच भाजपच्या (BJP) नेत्यांची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना राज्यसभेवर पाठवण्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. पीयूष गोयल आणि उदयनराजे  भोसले हे लोकसभेवर निवडून आल्याने त्यांच्या राज्यसभेतील जागा रिक्त झाल्या आहेत. यापैकी एका जागेवर पंकजा मुंडे यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. तसे घडल्यास पंकजा मुंडे यांच्या पराभवामुळे कमालीचे निराश आणि नाउमेद झालेल्या त्यांच्या समर्थकांना मोठा दिलासा मिळू शकतो. 

राज्यात सध्या ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष सुरु आहे. त्यामुळे ओबीसी नेत्या असलेल्या पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर घ्या, असा एक मतप्रवाह भाजपच्या राज्यातील नेत्यांमध्ये आहे.  दिल्लीत झालेल्या बैठकीत राज्यातील काही वरिष्ठ नेत्यांनी त्यांना राज्यसभेवर घेण्याची केंद्रीय नेतृत्वाला केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे या बीड मतदारसंघातून रिंगणात उतरल्या होत्या. त्या विजयाच्या प्रबळ दावेदार मानल्या जात होत्या. मात्र, शरद पवार गटाच्या बजरंग सोनवणे यांनी शेवटच्या फेरीपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या लढाईत पंकजा मुंडे यांचा पराभव केला होता. पंकजा यांचा हा पराभव बीड जिल्ह्यातील मुंडे समर्थकांसाठी मोठा धक्का ठरला होता. त्यामुळे आता पंकजा मुंडे यांचे राज्यसभेवर पुनर्वसन झाल्यास मुंडे समर्थकांना काहीप्रमाणात दिलासा मिळू शकतो. मात्र, यापूर्वीही महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीवेळी पंकजा मुंडे यांच्या नावाची जोरदार चर्चा व्हायची. उमेदवारीच्या शर्यतीत त्याच आघाडीवर आहेत, असे सांगितले जायचे. परंतु, प्रत्येकवेळी पंकजा मुंडे यांच्या समर्थकांची निराशा झाली होती. त्यामुळे आता या खेपेला तरी हे दुष्टचक्र भेदले जाणार का, हे पाहावे लागेल.

पंकजा मुंडे समर्थकांच्या आत्महत्या

पंकजा मुंडे यांचा बीड लोकसभेतील पराभव त्यांच्या समर्थकांच्या प्रचंड जिव्हारी लागला होता. मुंडे समर्थक कमालीचे निराश झाले होते. याच नैराश्याच्या भरात बीड जिल्ह्यातील 4 मुंडे समर्थक तरुणांनी आत्महत्या केल्या होत्या. पंकजा मुंडे या सगळ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले होते. तसेच आपल्या समर्थकांना आत्महत्या करु नका, असे आवाहन केले होते. 

आणखी वाचा

पंकजा मुंडे आणि महादेव जानकरांना पाडण्यासाठी मनोज जरागेंनी बैठका घेतल्या; लक्ष्मण हाकेंचा मोठा आरोप

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक

व्हिडीओ

KDMC Shiv Sena VS BJP : फोडाफोडीला उधाण, कुणाचं कल्याण? सेना-भाजपत रस्सीखेच? Special Report
Mumbai Mayor : मुंबईचा महापौर कुणाच्या जीवाला घोर? पडद्यामागे कोणाची कुणाशी चर्चा Special Report
Silver Rate Hike : चांदीचे दर वाढण्याची नेमकी कारणं काय? चांदी दर तीन लाख पार.. Special Report
Thane Mahapalika Mayor : बहुमत जोरदार पण कोण 'ठाणे'दार? भाजप-सेनेत वाद पेटणार? Special Report
Snehal Shivkar :'पतीच्या समाजसेवेच्या कामामुळे यश', रिक्षाचालकाची पत्नी ठाकरेंच्या सेनेची नगरसेविका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगावं, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
Embed widget