एक्स्प्लोर

Pravin Darekar: भाजपही मनावर दगड ठेवून महायुतीत, गरज नसेल तर..., प्रवीण दरेकरांच्या तोंडी न राहावून युती तोडण्याची भाषा, रामदास कदमांना सज्जड इशारा

Maharashtra Politics: महायुतीत राडा. महेंद्र थोरवेंचा सुनील तटकरेंवर हल्ला, रामदास कदमांची रवींद्र चव्हाणांवर टीका. रामदास कदमांच्या वक्तव्यामुळे भाजपचे नेते संतापले. महायुतीची गरज ही सर्वांना आहे, फक्त भाजपला नाही.

मुंबई: रवींद्र चव्हाण कुचकामी मंत्री आहेत, त्यांचा राजीनामा घ्या, अशा टीका करणारे शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांना भाजपकडून सडेतोड प्रत्युत्तर देण्यात आले आहे. भाजपच्या संयमाला दुबळेपणा समजू नका. महायुतीची गरज एकट्या भाजपला नाही, असा गर्भित इशारा भाजपचे आमदार आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या निकटवर्तीय नेत्यांपैकी एक असलेल्या प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी दिला आहे. त्यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना रामदास कदम यांना खडे बोल सुनावले.

रामदास कदम हे महायुतीमधील ज्येष्ठ नेते आहेत. मात्र, त्यांचे रवींद्र चव्हाण यांच्याबद्दलचे वकत्व्य अपरिपक्व म्हणावे लागेल. रामदास कदम यांना काही समस्या असेल तर चार भिंतीच्या आत ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासमोर मांडायला पाहिजे होती. पण त्यांचा स्वभाव हा खळबळजनक बोलण्याचाच आहे. महायुतीचा धर्म हा पाळलाच गेला पाहिजे. अन्यथा आरे ला कारे आम्हालाही करता येते, असा इशारा प्रवीण दरेकर यांनी दिला. रत्नागिरीत आमचे तीन आमदार आहेत, ठाण्यात नरेश म्हस्केला आमच्या पक्षाने खासदार केले, रवींद्र वायकरांना आमच्या लोकांनी विजयी केले, नाशिकची सीटही आम्ही शिंदे गटाला दिली. त्यामुळे तुम्ही उणीदुणी काढत असाल तर आम्हीही तयार आहोत, असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले.  महायुतीची गरज ही सर्वांना आहे. एवढं चांगलं वातावरण असताना मिठाचा खडा टाकू नये. महायुती फक्त भाजपची गरज नाही. आमचे कार्यकर्तेही मनावर दगड ठेवून महायुतीत लढत आहेत, असे वक्तव्य दरेकर यांनी केले.

रामदास कदम यांना वैयक्तिक कारणातून वैफल्य आले आहे. रामदास कदम यांचा मुलगा जिकडे आमदार आहे, तिकडे परिस्थिती अशी आहे की, भाजप नसेल तर त्यांना निवडून येणे अवघड आहे. त्यांच्या मुलाला मंत्री व्हायचे होते. त्यामुळे रामदास कदम अस्वस्थ आणि बैचेन आहेत. ते राजकीय पटलावरुन गायबही आहेत. या सगळ्या वैफल्यातून ही सगळी खदखद बाहेर येत आहे. भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे. राज्यभरात आमचं नेटवर्क आणि संघटना आहे. त्यामुळे आमच्या संयमाला दुबळेपणा समजू नका, असेही प्रवीण दरेकर यांनी म्हटले.

रामदास भाईंना दरवेळी भाजपला वेठीला धरु नये: देवेंद्र फडणवीस

अशाप्रकारचे आरोप करणे कुठल्या युतीधर्मात बसते. रामदास भाईंचे काही म्हणणं असेल तर त्यांनी अंतर्गत बैठकीत मांडलं पाहिजे. अशावेळी प्रत्येकवेळी भाजपच्या नेत्यांना वेठीस धरणे यातून एक चांगली भावना तयार होत नाही. मी आता रामदास भाईंचे म्हणणे जाणून घेईन, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

रामदास कदम नेमकं काय म्हणाले?

रवींद्र चव्हाण कुचकामी मंत्री आहेत, असा हल्लाबोल करत देवेंद्र फडणवीसांनी रवींद्र चव्हाणांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी रामदास कदमांनी केली आहे. गेल्या 14 वर्षापासून मुंबई-गोवा महामार्गाचे काम होत नाही. चाकरमान्यांचे हाल होत आहेत. समृद्धी महामार्गाचे काम तीन वर्षात पूर्ण होते. मग मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण  का होत नाही? असा प्रश्न रामदास कदमांनी उपस्थित केला. रवींद्र चव्हाणांना शिवसेनेची एलर्जी आहे. रवींद्र चव्हाण कुचकामी मंत्री आहेत, अशी टीका रामदास कदम यांनी केली.

आणखी वाचा

महेंद्र थोरवेला मी मोजत नाही, सुनील तटकरेंचा हल्लाबोल, अजित पवारांचंही एका वाक्यात उत्तर!

महत्त्वाच्या बातम्या

कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचं प्रमोशन म्हणून महाजनांना नाशिकचं पालकमंत्रीपद, भास्कर जाधवांचा टोला, तर नार्वेकरांना विधानसभेचं अध्यक्ष असल्याचं भान राहिलं नसल्याची टीका
कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचं प्रमोशन म्हणून महाजनांना नाशिकचं पालकमंत्रीपद, भास्कर जाधवांचा टोला, तर नार्वेकरांना विधानसभेचं अध्यक्ष असल्याचं भान राहिलं नसल्याची टीका
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
Shiv Sena Symbol Case : राहुल नार्वेकरांचे सगळेच निर्णय चुकले, सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बलांचा धडाधड युक्तिवाद; आजच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
राहुल नार्वेकरांचे सगळेच निर्णय चुकले, सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बलांचा धडाधड युक्तिवाद; आजच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget