Narayan Rane on Nitesh Rane statement: मुख्यमंत्री कोणाचा बाप नसतो, मी नितेशला समज दिलेय; नारायण राणेंनी टोचले मुलाचे कान
Nitesh Rane: तुमच्या मनात काहीही असेल, पण कुणाचाही बाप काढणं योग्य नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नितेश राणेंना खडसावलं! राजकारणात पर्सेप्शन महत्त्वाचे असते.

Narayan Rane on Nitesh Rane Statement: महायुतीमध्ये भाजपचा मुख्यमंत्री सगळ्यांचा बाप आहे, अशी टिप्पणी करुन वादाला तोंड फोडणारे राज्याचे मंत्री नितेश राणे यांना आता त्यांचे पिताश्री आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनीच समज दिली आहे. मुख्यमंत्री कोणाचा बाप नसतो. मी नितेशला (Nitesh Rane) समज दिली आहे. मुख्यमंत्री हा जनतेचा सेवक असतो. मी मुख्यमंत्री असताना मी सांगायचो की, मला साहेब म्हणू नका सेवक म्हणा, अशा शब्दांत नारायण राणे यांनी नितेश राणे यांचे कान टोचले. ते बुधवारी धाराशिवमध्ये आले होते. तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतल्यानंतर नारायण राणे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
यावेळी नारायण राणे यांनी म्हटले की, कोणाचा निधी अडवणं हे चुकीचं आहे. त्याबाबतही मी सूचना देणार आहे, अशी भूमिका मांडत जिल्हा नियोजन समितीच्या निधीबाबतच्या नितेश राणे यांच्या वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या वादावर राणेंनी पडदा टाकला. तसेच नारायण राणे यांनी पुन्हा एकदा मनसेचे नेते प्रकाश महाजन यांना लक्ष्य केले. प्रकाश महाजन हा मेंटल माणूस आहे. त्याच्याशी माझी तुलना का करता? मी दिल्लीला होतो आणि तो इकडे कुठे उभा राहातो क्रांती चौकात, त्याला भेटायला मी यायचं का?, अशा शब्दांत नारायण राणे यांनी संताप व्यक्त केला. तसेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार आहेत की नाही, याबद्दल मला माहिती नाही. ते एकत्र आले तर चांगली गोष्ट आहे, असे नारायण राणे यांनी म्हटले.
Nitesh Rane banner in Thane: नितेश राणेंना डिवचणारा ठाकरे गटाचा बॅनर महापालिकेने काढला
ठाण्यात तीन हात नाका परिसरात ठाकरे गटाकडून नितेश राणे यांना डिवचणारा एक बॅनर लावण्यात आला होता. ठाकरे गटाचे सहप्रवक्ता तुषार रसाळ यांनी ठाण्यातील मुख्य रस्त्यावर एक भलामोठा बॅनर लावला होता. 'मी तुषार दिलीप रसाळ... दिलीप पंढरीनाथ रसाळ हे माझे जन्मदाता (बाप). श्री. देवेंद्र गंगाधर फडणवीस हे माझे बाप नाहीत, असा मजकूर या बॅनरवर लिहला होता. या बॅनरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर ठाणे महानगरपालिकेने हा बॅनर उतरवला.
Nitesh Rane: नितेश राणे नेमकं काय म्हणाले?
नितेश राणे यांनी अलीकडेच धाराशिव येथील कार्यक्रमात त्यांच्या नेहमीच्या शैलीत भाषण केले होते. कुणी कितीही ताकद दाखवली, कसेही नाचलं तरी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री बसलाय हे लक्षात ठेवा, असा दमच नितेश राणेंनी दिला होता. यावरुन शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनीही नाराजी व्यक्त केली होती. आपल्या वक्तव्यांमुळे कोणाचा फायदा होतो, याचे भान ठेवा, असा सल्ला निलेश राणे यांनी आपल्या भावाला दिला होता. परंतु, नंतर निलेश राणे यांनी हे ट्विट डिलिट केले होते.
आणखी वाचा
देवेंद्र फडणवीस हे माझे बाप नाहीत! ठाण्यात झळकले बॅनर्स, ठाकरे गटाने नितेश राणेंना डिवचलं























