एक्स्प्लोर

Kirit Somaiya: ही एक गोष्ट केली तर मोदी उद्धव ठाकरेंना पुन्हा सोबत घेतील: किरीट सोमय्या

Maharashtra Politics: किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या आणि भाजपमध्ये आलेल्या नेत्यांविषयी आपली भूमिका मांडली. भ्रष्टाचारी नेते आपल्या मांडीला मांडी लावून बसत आहेत, याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

मुंबई: उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या गैरकृत्यांचं प्रायश्चित घेतलं आणि यापुढे लुटमार आणि माफियागिरी न करण्याचा संकल्प केला तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांना पुन्हा महायुतीत घेतील, असे वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiaya) यांनी केले. भाजपसोबत पुन्हा यायचं असेल तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुस्लीम लांगुलचालन सोडून पुन्हा हिंदुत्ववादी विचारसरणी स्वीकारावी लागेल, असेही सोमय्या यांनी म्हटले. ते सोमवारी एबीपी माझाच्या 'तोंडी परीक्षा' या कार्यक्रमात बोलत होते. 

यावेळी किरीट सोमय्या यांना भाजपने आधी आरोप केलेल्या आणि नंतर पक्षात घेऊन पवित्र केलेल्या नेत्यांविषयीची भूमिका विचारण्यात आली. त्यावर किरीट सोमय्या यांनी म्हटले की, भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्यांना आम्ही पक्षात घेतले ही बाब मला मान्य आहे. पण राजकारणात व्यापक हितासाठी अशा गोष्टी कराव्या लागतात, त्या अपरिहार्य असतात, अशी भूमिका किरीट सोमय्या यांनी मांडली. 

मलाही रोज सकाळी उठल्यावर हाच प्रश्न पडतोय. ज्यांचा आरोप आपण बाहेर काढला त्या घोटाळेबाज आणि बदमाशांच्या शेजारी बसावं लागतंय, त्याचं स्वागत माझ्या पक्षात होतंय हे योग्य आहे का असं रोज वाटतंय. पण मी केवळ घोटाळे बाहेर काढून ते तपास यंत्रणा आणि न्यायालयापर्यंत पोहोचवू शकतो. त्यापुढे मी काही करु शकत नाही. या सगळ्याबाबत माझ्या बायकोने दिलेला एक सल्ला मी नेहमी लक्षात ठेवतो. तिने मला सांगितलं आहे की, तुम्ही ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत, भविष्यात कधीही त्यांनी बाजू घेऊ नका. आपल्या भूमिकेवर ठाम राहा. या सल्ल्याचे मी तंतोतंत पालन करत आहे, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले.

भ्रष्टाचारी नेते आमच्याकडे आल्याने त्यांच्यावर वचक बसला: किरीट सोमय्या

किरीट सोमय्या यांना त्यांनी आरोप केलेल्या आणि भाजपमध्ये आलेल्या नेत्यांविषयी विचारण्यात आले. त्यावर सोमय्या यांनी म्हटले की, भ्रष्टाचाराचे नेते आमच्याकडे आल्याने ते पवित्र झाले असे मी म्हणणार नाही. पण मला एक निश्चित समाधान आहे की, गेल्या काही काळात जनतेमध्ये संदेश गेला की, एखाद्या राजकारण्यालाही शिक्षा होऊ शकते. अनेक राजकारण्यांची कोट्यवधींची संपत्ती जप्त झाली, अनेकांना दंड झाला. काही जणांवर अद्याप कारवाई सुरु आहे, असे किरीट सोमय्या यांनी सांगितले.

भ्रष्टाचारी नेते आमच्याकडे आल्यावर त्यांच्यावर वचक बसला आहे. यापूर्वी ते राजरोसपणे मोठी लूट करत होते, आता ती लूट करण्याचे प्रमाण मर्यादित असेल. या नेत्यांनी पुन्हा भ्रष्टाचार केला तर पंतप्रधान मोदी त्यांना पुन्हा माफ करणार नाहीत, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले.

आणखी वाचा

ज्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढला त्या घोटाळेबाज-बदमाशांच्या शेजारी बसावं लागतंय, हे फक्त देशाच्या 'लार्जर इंटरेस्ट'साठी सहन करतोय: किरीट सोमय्यांचं मोठं वक्तव्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
Vinod Tawde  : विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण... दोन्ही नेते एकाच गाडीतून हॉटेलबाहेर पडले
विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण...
Vinod Tawde : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Video : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Vinod Tawde : विनोद तावडेंसारखा नेता पैशांसोबत पकडला जातो, ही लाजिरवाणी गोष्ट, जनता धडा शिकवणार; वंचितचा हल्लाबोल
विनोद तावडेंसारखा नेता पैशांसोबत पकडला जातो, ही लाजिरवाणी गोष्ट, जनता धडा शिकवणार; वंचितचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 19 November 2024Anil Deshmukh Discharge : अनिल देशमुख यांना रुग्णालयातून  डिस्चार्ज ABP MajhaHitendra Thakur On Vinod Tawde :  टीप कुठून, केव्हा, कशी मिळाली? राड्यानंतर ठाकूरांची स्फोटक मुलाखतABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 19 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
Vinod Tawde  : विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण... दोन्ही नेते एकाच गाडीतून हॉटेलबाहेर पडले
विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण...
Vinod Tawde : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Video : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Vinod Tawde : विनोद तावडेंसारखा नेता पैशांसोबत पकडला जातो, ही लाजिरवाणी गोष्ट, जनता धडा शिकवणार; वंचितचा हल्लाबोल
विनोद तावडेंसारखा नेता पैशांसोबत पकडला जातो, ही लाजिरवाणी गोष्ट, जनता धडा शिकवणार; वंचितचा हल्लाबोल
Vinod Tawde : पाच कोटी वाटल्याच्या आरोपावर खुद्द विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमचे विरोधक...
पाच कोटी वाटल्याच्या आरोपावर खुद्द विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमचे विरोधक...
Vinod Tawde : विनोद तावडे थांबलेल्या हाॅटेलच्या रुम नंबर 407 मध्ये झाडाझडती, तब्बल 9 लाखांचे पाचशेच्या नोटांमध्ये बंडलच्या बंडल सापडले!
विनोद तावडे थांबलेल्या हाॅटेलच्या रुम नंबर 407 मध्ये झाडाझडती, तब्बल 9 लाखांचे पाचशेच्या नोटांमध्ये बंडलच्या बंडल सापडले!
विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, भाजपकडून पहिला पलटवार; म्हणाले, महाराष्ट्रातले वातावरण...
विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, भाजपकडून पहिला पलटवार; म्हणाले, महाराष्ट्रातले वातावरण...
Sanjay Raut: विनोद तावडेंना भाजपच्याच प्रमुख नेत्यानेच पकडून दिलं, हितेंद्र ठाकूरांना टीप दिली; संजय राऊतांचा गंभीर आरोप
विनोद तावडेंना भाजपच्याच प्रमुख नेत्यानेच पकडून दिलं, हितेंद्र ठाकूरांना टीप दिली; संजय राऊतांचा गंभीर आरोप
Embed widget