एक्स्प्लोर

Shrikant Shinde Kalyan Candidate : ठरलं तर! कल्याणमधून श्रीकांत शिंदे हेच महायुतीचे उमेदवार, देवेंद्र फडणवीसांकडून थेट घोषणा

श्रीकांत शिंदे हेच कल्याणमधून महायुतीचे उमेदवार असतील, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून कल्याणच्या (Kalyan) जागेवरून महायुतीत (Mahayuti) धुसफूस चालू होती. भाजप आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची शिवसेना (Shivsena) या दोन्ही पक्षांनी या जागेवर दावा सांगितला होता. याच कारणामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekbath Shinde) यांचे पुत्र असूनही विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली नव्हती. दरम्यान, या जागेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठी घोषणा केली आहे. कल्याणच्या जागेवर श्रीकांत शिंदे हेच महायुतीचे उमेदवार असतील, असं फडणवीस म्हणाले आहेत. फडणवीसांच्या या घोषणेमुळे आता भाजपचे कल्याणचे स्थानिक नेतृत्व काय निर्णय घेणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

श्रीकांत शिंदे यांचा प्रचार न करण्याचा केला होता ठराव

ठाणे, कल्याणच्या भाजपच्या नेत्यांनी श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. या नेत्यांनी आपली नाराजी फडणवीस यांच्याकडे बोलूनही दाखवली होती. विशेष म्हणेज श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी दिल्यास आम्ही त्यांच्या प्रचाराचे काम करणार नाही, असा टोकाचा निर्णयही भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्या समर्थकांनी घेतला होता. त्यानंतर आता खुद्द फडणवीस यांनीच श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. 

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले? 

श्रीकांत शिंदे यांना भारतीय जनता पक्षाकडून विरोध नाही. श्रीकांत शिंदे हे कल्याणमधून महायुतीचे उमेदवार असणार आहेत. भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहणार आहे. आम्ही पूर्ण ताकदीने त्यांचा प्रचार करणार आहोत. मागच्या निवडणुकीपेक्षाही अधिक मताधिक्याने त्यांचा विजय होईल. आम्ही महायुतीतील भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना, रासपा, रिपाई असे सर्व घटकपक्ष त्यांना निवडवून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

गणपतराव गायकवाड काय भूमिका घेणार?

भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीला थेट विरोध केला होता. त्यांच्या कार्यकर्त्यांनीही आम्ही श्रीकांत शिंदे यांचा प्रचार करणार नाही, असा पवित्रा घेतला होता. ठाणे आणि कल्याण हे दोन्ही मतदारसंघ शिवसेनेला देऊ नयेत, अशी भूमिका गायकवाड यांनी घेतली होती. मात्र आता खुद्द देवेंद्र फडणवीस यांनीच श्रीकांत शिंदे यांना तिकीट दिले आहे. त्यामुळे गणपत गायकवाड काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. 

वैशाली दरेकर विरुद्ध श्रीकांत शिंदे

देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेनंतर आता कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे विरुद्ध महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्यात लढत होईल, हे स्पष्ट झाले आहे. काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारी जाहीर होताच, वैशाली दरेकर यांच्याकडून जोमात प्रचार केला जातोय. उद्धव ठाकरे यांनी श्रीकांत शिंदे यांना पराभूत करण्यासाठी मोठी राजकीय खेळी खेळली आहे. श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आहेत. तर दुसरीकडे वैशाली दरेकर यांचा कोणताही मोठा राजकीय वारसा नाही. त्यामुळे येथे मुख्यमंत्र्यांचे पुत्र विरुद्ध एक सामान्य कार्यकर्ता अशी लढत घडवून आणण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांच्याकडून केला जाणार आहे. त्यामुळ या जागेवर आता कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.    

हेही वाचा :

बजरंग सोनवणेंना उमेदवारी जाहीर होताच ज्योती मेटेंचा मोठा निर्णय, कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर स्पष्टच सांगून टाकले

सांगलीच्या जागेमुळे वाद चालू असतानाच राऊतांनी घेतली भाजपच्या नेत्याची भेट; नेमकं काय घडतंय?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ज्यांचे हात स्वच्छ आहेत, त्याला कोणाच्या बापाला घाबरायची गरज, ED च्या कारवाईवरुन शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल
ज्यांचे हात स्वच्छ आहेत, त्याला कोणाच्या बापाला घाबरायची गरज, ED च्या कारवाईवरुन शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल
Sujay Vikhe : लोकसभेत घराणेशाहीच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या निलेश लंकेंना सुजय विखेंनी घेरलं; म्हणाले, पारनेरमध्ये...
लोकसभेत घराणेशाहीच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या निलेश लंकेंना सुजय विखेंनी घेरलं; म्हणाले, पारनेरमध्ये...
हर्षवर्धन पाटील निवडून आल्यात जमा, दत्तामामाला किती मतांनी पाडायचं हे तुम्ही ठरवा, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल 
हर्षवर्धन पाटील निवडून आल्यात जमा, दत्तामामाला किती मतांनी पाडायचं हे तुम्ही ठरवा, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल 
Yogi Adityanath In Kolhapur : ठाकरे आणि पवारांमध्ये नुरा कुस्ती सुरु, स्वत:ला आणि देशाला धोका देतील; योगींची कोल्हापुरात जोरदार टीका
ठाकरे आणि पवारांमध्ये नुरा कुस्ती सुरु, स्वत:ला आणि देशाला धोका देतील; योगींची कोल्हापुरात जोरदार टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Navneet Rana Amravati : कापण्याची भाषा कराल तर त्यांना त्याच भाषेत उत्तर देणारABP Majha Headlines :  2 PM : 17 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 1 PM :17 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  1 PM : 17 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ज्यांचे हात स्वच्छ आहेत, त्याला कोणाच्या बापाला घाबरायची गरज, ED च्या कारवाईवरुन शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल
ज्यांचे हात स्वच्छ आहेत, त्याला कोणाच्या बापाला घाबरायची गरज, ED च्या कारवाईवरुन शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल
Sujay Vikhe : लोकसभेत घराणेशाहीच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या निलेश लंकेंना सुजय विखेंनी घेरलं; म्हणाले, पारनेरमध्ये...
लोकसभेत घराणेशाहीच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या निलेश लंकेंना सुजय विखेंनी घेरलं; म्हणाले, पारनेरमध्ये...
हर्षवर्धन पाटील निवडून आल्यात जमा, दत्तामामाला किती मतांनी पाडायचं हे तुम्ही ठरवा, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल 
हर्षवर्धन पाटील निवडून आल्यात जमा, दत्तामामाला किती मतांनी पाडायचं हे तुम्ही ठरवा, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल 
Yogi Adityanath In Kolhapur : ठाकरे आणि पवारांमध्ये नुरा कुस्ती सुरु, स्वत:ला आणि देशाला धोका देतील; योगींची कोल्हापुरात जोरदार टीका
ठाकरे आणि पवारांमध्ये नुरा कुस्ती सुरु, स्वत:ला आणि देशाला धोका देतील; योगींची कोल्हापुरात जोरदार टीका
Dhananjay Mahadik : उद्धव साहेब, मुन्ना महाडिकचा भांग देखील कोण वाकडा करू शकेल, असा कोणी पृथ्वीवर जन्माला आलेला नाही : धनंजय महाडिक
उद्धव साहेब, मुन्ना महाडिकचा भांग देखील कोण वाकडा करू शकेल, असा कोणी पृथ्वीवर जन्माला आलेला नाही : धनंजय महाडिक
Navneet Rana : ते कापाकापाची भाषा करत असतील तर आम्हीदेखील...; अमरावतीच्या राड्यानंतर नवनीत राणांचा इशारा, उद्धव ठाकरेंवरही आरोप
ते कापाकापाची भाषा करत असतील तर आम्हीदेखील...; अमरावतीच्या राड्यानंतर नवनीत राणांचा इशारा, उद्धव ठाकरेंवरही आरोप
PM Modi In Nigeria : पीएम मोदींना 17 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार; नायजेरियाकडून ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर पुरस्कार
पीएम मोदींना 17 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार; नायजेरियाकडून ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर पुरस्कार
मोदी म्हणाले, बाळासाहेबांची स्तुती करून दाखवा, पुण्यतिथिनिमित्त राहुल गांधींचं थेट ट्विट, म्हणाले
मोदी म्हणाले, बाळासाहेबांची स्तुती करून दाखवा, पुण्यतिथिनिमित्त राहुल गांधींचं थेट ट्विट, म्हणाले
Embed widget