जमीन जुमला, सोन्या-नाण्याची आरास, गाडी-घोडा बंगला, राजेशाही थाट, उदयनराजेंची संपत्ती किती
Udayanraje Bhosale: कोल्हापूरच्या गादीचे वारसदार छत्रपती शाहू महाराज यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या अर्जातून त्यांच्याही संपत्तीची माहिती समोर आली होती
Udayanraje Bhosale सातारा - महायुतीचे उमेदवार आणि साताऱ्याचे राजे उदयनराजे भोसले यांच्या संपत्तीची नेहमीच चर्चा होत असते. राजघराण्याचे वारसदार म्हणून त्यांच्या श्रीमंतीची उदाहरणे दिली जातात. तर, त्यांच्या नावातही श्रीमंत उदयनराजे भोसले असा उल्लेख केला जातो. आता, लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने उदयनराजेंनी महायुतीचे उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या अर्जासोबत दिलेल्या नामनिर्देशित पत्रात त्यांच्या संपत्तीची माहिती दिली आहे. त्यामध्ये, उदयनराजे व त्यांच्या कुटुंबाची एकूण संपत्ती अब्जावधी रुपयांची असून त्यामध्ये स्थावर आणि जंगम मालमत्तेचा समावेश आहे. रोकड, सोने-चांदी व चारचाकी गाड्या ह्या जंगम मालमत्ता आहे.
कोल्हापूरच्या गादीचे वारसदार छत्रपती शाहू महाराज यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या अर्जातून त्यांच्याही संपत्तीची माहिती समोर आली होती. त्यानुसार, शाहू छत्रपती हे 296 कोटींचे मालक असून स्थावर व जंगम मालमत्ता मिळून त्यांची संपत्ती एवढी आहे. आता, साताऱ्याच्या गादीचे वारसदार उदयनराजे भोसले यांचीही संपत्ती जवळपास शाहू छत्रपतींच्या बरोबरीनेच असल्याचे दिसून येते. उदयनराजे व भोसले कुटुंबांची एकूण संपत्ती 2 अब्ज 96 कोटी 39 लाख 11 हजार 585 रुपये एवढी आहे. त्यामध्ये, उदयनराजेंच्या पत्नी व मुलांच्या संपत्तीचाही समावेश आहे. दरम्यान, उदयनराजेंचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हेही उपस्थित होते. आई भवानीमाता व छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन सातारा जिल्ह्यातील शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य जनतेला सोबत घेऊन आज लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला,असे उदयनराजेंनी अर्ज भरल्यानंतर ट्विटरवरुन म्हटले आहे.
उदयनराजेंकडील दागिने
उदयनराजेंकडे सोनं चांदी 30, 863 ग्रॅम (किंमत 2 कोटी 60 लाख 74 हजार )
पत्नीकडेदागिने - 4750 ग्रॅम (35 लाख 64 हजार )
कुटुंबाचे 628 ग्रॅम (44 लाख 35 हजार
मुलीचे 7054 ग्रॅम सोनं, चांदी आणि हिरे मिळून (5 लाख 29 हजार )
उदयनराजेंकडील कार (गाड्या)
उदयनराजेंच्या मालकीच्या कार - जिप्सी, 2 मर्सिडीज, ऑडी-डी, फॉर्चुरल, स्कॉर्पिओ,टॅक्टर, एस क्रॉस अशी वाहनं आहेत.
उदयनराजेंची संपत्ती
रोख रक्कम
स्वत: = 5,85,715
पत्नी = 1,35,980
हिंदू अविभक्त कुटुंब = 3,68,900
मुलगा = 22,400
------------------------
एकूण स्थूल उत्पन्न =
उदयनराजे - १६ कोटी ८५ लाख ७७ हजार 048
पत्नी - १ कोटी २९ लाख ९७ हजार ६१
हिंदू कुटुंब - २ कोटी १ लाख ८० हजार
मुलगा - १५ लाख ७४ हजार ४३३
मुलगी - २२ लाख २२ हजार ६१३
-------------------------------------------
१ कोटी ९० लाख ५ हजार १६५ रुपये किमतीच्या सर्व गाड्या
-------------------------------------------
जमीन -
उदयनराजे - १ अब्ज २७ कोटी ९९ लाख ३० हजार ५४२
कुटुंब - ५५ लाख
--------------
बिगरशेत जमीन
उदयनराजे - २० कोटी १४ लाख २० हजार ९९७
पत्नी - १ कोटी १० लाख १२ हजार ५७०
कुटुंब - १९ कोटी ९३ लाख १२ हजार ६९६
------
सर्व जमिनींचं एकूण मूल्य -
उदयनराजे - १ अब्ज ७२ कोटी ९४ लाख ४९ हजार ६९१
पत्नी - ३ कोटी ७९ लाख ३७ हजार ५७०
कुटुंब - २८ कोटी ७९ लाख ४८ हजार ५६५
मुलगा - ३ लाख १४ हजार ८२०
---------------------------
कर्ज -
उदयनराजे - २ कोटी ४४ लाख ६३ हजार ८४२
--------------------
जंगम मालमत्ता
स्वत: - १६ कोटी ८५ लाख ७७ हजार ४८
पत्नी - १ कोटी २९ लाख ९७ हजार ६१
कुटुंब - २ कोटी १ लाख ८० हजार २३७
----------------------------------------
उदयनराजे एकूण संपत्ती स्थावर आणि जंगम
1 अब्ज 90 कोटी 93 लाख 64 हजार 634
-------------------------------------------
पत्नीची एकूण संपत्ती स्थावर आणि जंगम
6 कोटी 89 लाख 47 हजार 201
-------------------------------------------
कुटुंब - 34 कोटी 7 1 लाख 07904
-------------------------------------------
मुलगा - 15 लाख 74 हजार 433
मुलगी - २२ लाख २२ हजार ६१३
-------------------------------------------