एक्स्प्लोर

Ashish Shelar: आशिष शेलारांनी ठाकरे बंधूंच्या जखमेवर मीठ चोळलं, म्हणाले, बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीतील 'भोपळा' फ्रेम करुन पाठवणार

BJP Ashish Shelar in Mumbai: अमितची मतं महेश सावंतांनी, संदीप देशपांडेंची मतं आदित्य ठाकरेंनी चोरली का, आशिष शेलारांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल. आशिष शेलार यांनी ठाकरे बंधूंवर टीकास्त्र सोडलं

Ashish Shelar on Thackeray Brothers: बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधुंच्या उत्कर्ष पॅनलचा पराभव झाल्यानंतर मुंबई भाजपचे मावळते अध्यक्ष आशिष शेलार यांनी ठाकरे बंधूंच्या जखमेवर मीठ चोळले आहे. मी ठाकरे बंधूंना बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीच्या निकालाची (BEST Election Result 2025) फ्रेम करुन पाठवणार आहे. त्या फ्रेममध्ये फक्त भोपळा असेल, अशी खोचक टिप्पणी आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केली. सोमवारी मुंबईतील भाजप मुख्यालयात मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी अमित साटम (Amit Satam) यांची नियुक्ती करण्यात आली. यानंतर आशिष शेलार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर मतचोरीच्या आरोपावरुन जोरदार टीका केली.

राज ठाकरे यांनी नुकत्याच मुंबईतील मनसे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात विधानसभा निवडणुकीत मनसेच्या मतांची चोरी झाल्याचा आरोप केला होता. याबाबत बोलताना आशिष शेलार यांनी म्हटले की, राज ठाकरे मतचोरीचा आरोप करतात. मग विधानसभा निवडणुकीत माहीम मतदारसंघात अमित ठाकरे यांची मतं महेश सावंत यांनी चोरली आहेत का? मनसेचे मुंबई विभाग अध्यक्ष संदीप देशपांडे यांच्या मतांची चोरी आदित्य ठाकरे यांनी केली आहे का, याचं उत्तर राज ठाकरे यांनी द्यावं, असं आव्हान आशिष शेलार यांनी दिले. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रभाग रचनेवरुन ठाकरे गटाकडून रडगाण्याचा बँड का वाजवला जात आहे? हिंमत असेल तर उबाठाने एकट्याने लढून दाखवावे, असेही त्यांनी म्हटले.

बेस्त पतपेढीच्या निवडणुकीत एकूण 21 जागांपैकी एकाही जागेवर ठाकरे बंधूंच्या पॅनलला विजय मिळवता आला नव्हता. या निवडणुकीत शशांक राव यांच्या पॅनलने सर्वाधिक 14 जागा जिंकल्या होत्या. तर महायुतीच्या नेत्यांनी एकत्रितपणे उभ्या केलेल्या सहकार समृद्धी पॅनलला 7 जागांवर विजय मिळाला होता.

Ashish Shelar: तरुण नेता मुंबई भाजपचा अध्यक्ष झाला, ही आनंदाची गोष्ट: आशिष शेलार

भाजपच्या मुंबई अध्यक्षपदी अमित साटम यांची नियुक्ती केंद्रीय भाजपच्या निर्णयानंतर रविंद्र चव्हाण यांनी केली आहे. मुंबई भाजपसाठी हा नवीन अध्याय सुरु झाला आहे. अमित साटम यांनी नगरसेवक, आमदार आणि तळागळातील कार्यकर्ता म्हणून काम केले आहे. एक तरुण चेहरा मुंबई भाजपचा अध्यक्ष होतोय, याचा आनंद आहे. मूळ कोकणाची नाळ असलेला आणि संघर्ष करणारा कार्यकर्ता अध्यक्ष झाला आहे. नागरी चळवळीतून उदयोन्मुख चेहरा पुढे आला आहे. त्यांची कारकीर्द यशस्वी होईल त्यासाठी शुभेच्छा, असे आशिष शेलार यांनी म्हटले.

आणखी वाचा

बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे गटाला अतिआत्मविश्वास नडला? पहिल्याच निवडणुकीत ठाकरे ब्रँडला धक्का

महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगे बिनडोक माणूस, तेली आणि ओबीसी समाज रस्तावर उतरणार, बावनकुळेंवरील टीकेनंतर भाजप नेत्याचा इशारा
मनोज जरांगे बिनडोक माणूस, तेली आणि ओबीसी समाज रस्तावर उतरणार, बावनकुळेंवरील टीकेनंतर भाजप नेत्याचा इशारा
आआथातू अरअरअर... करत जरांगेंनी बाहुबलीमधील कल्की स्टाईलने उडवली बावनकुळेंची खिल्ली, महसूलमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया समोर  
आआथातू अरअरअर... करत जरांगेंनी बाहुबलीमधील कल्की स्टाईलने उडवली बावनकुळेंची खिल्ली, महसूलमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया समोर  
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
संजय राऊत नोटा मोजायला गेले होते का? तुमच्याकडं फोटो पुरावा आहे का? राऊतांच्या आरोपावर रामदास कदमांचा पलटवार
संजय राऊत नोटा मोजायला गेले होते का? तुमच्याकडं फोटो पुरावा आहे का? राऊतांच्या आरोपावर रामदास कदमांचा पलटवार

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Embed widget