एक्स्प्लोर

Eknath Shinde: आम्ही मोदींना सांगितलं '400 पार'च्या घोषणेमुळे कार्यकर्ते रिलॅक्स झाले; आता विधानसभेला गाफील राहू नका: एकनाथ शिंदे

Maharashtra Politics: ४०० पारमुळे कार्यकर्ते गाफील हे मी मोदींनाही म्हणालो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले. उबाठापेक्षा आपला स्ट्राईक रेट चांगला. महाविकास आघाडीला फेक नरेटिव्हमुळे यश मिळाले, असे शिंदे यांनी म्हटले.

मुंबई: लोकसभा निवडणुकीत भाजपच्या 'चारसो पार'च्या नाऱ्यामुळे लोकसभा निवडणुकीत फटका बसल्याची स्पष्ट कबुली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिली. तुम्ही गाफील राहू नका. आपण सर्व कार्यकर्ते आहात, एक-एक मत आपल्यासाठी महत्त्वाचं आहे.  शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत माझ्या एका मताने काय होणार, आपण जिंकणारच आहोत, असा विचार करुन गाफील राहता कामा नये. आम्ही पंतप्रधान मोदीजींसोबत (PM Modi) 400 पारच्या घोषणेबाबत बोललो. या घोषणेमुळे कार्यकर्ते रिलॅक्स झाले, असे मी त्यांना सांगितले. पण आता तसं करायचं नाही. आपले मोदीजी पंतप्रधानपदी बसलेले आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत कोणी कितीही जंग जंग पछाडले तरी मोदीजी त्यांच्यावर भारी पडतील, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले. ते रविवारी ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या विजयसंकल्प मेळाव्यात बोलत होते. 

नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडल्या त्यात आपण जिंकलो आहे. कोकण पदवीधर मतदारसंघात निरंजन डावखरे यांना चिंता नाही, विजय आपलाच आहे. महायुती म्हणून आपण ही निवडणूक मनावर घेतली आहे. लोकसभा निवडणुकीत कोकण हा महायुतीचा बालेकिल्ला ठरलेला आहे, भिवंडी अपवाद ठरला. लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी फेक नरेटिव्ह लोकांपर्यंत पोहोचवले, त्यामध्ये ते यशस्वी ठरले. फेक नरेटिव्ह पसरवण्यात काही स्वयंसेवी संस्थांचाही (NGO) हात होता. सगळ्याच स्वयंसेवी संस्था वाईट नाहीत. पण काही स्वयंसेवी संस्थांमध्ये शहरी नक्षली घुसले आहेत. हे सर्वजण मोदी द्वेषाने पछाडलेले आहेत. या एनजीओंनी देखील मोदी हटावचा नारा दिला होता, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली. 

महाविकास आघाडीने जास्त जागा जिंकल्या असल्या तरी मतांची टक्केवारीतील फरक फार कमी आहे. आज मुंबईतही आपल्याला त्यांच्यापेक्षा 2 लाख मतं जास्त आहेत.  आज आपला स्ट्राईक रेट उबाठा पेक्षा जास्त आहे. राज्यातील मतांच्या टक्केवारीत आपण थोड्या फरकानेच मागे आहोत. लोकसभा निवडणुकीत 30 जागांवर विजय मिळाल्यानंतर आम्ही  180 जागा जिंकणार, असे मविआ म्हणत आहे. असे गणित कुठे असते का, असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विचारला.

कोकणात साडेसहा पैकी साडेपाच जागा महायुतीने जिंकल्या: देवेंद्र फडणवीस

लोकसभा निवडणुकीत महायुतीने घवघवीत यश मिळाल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. आम्ही महायुतीला तडीपार करू, पण जनतेनं त्यांनाच कोकणातून तडीपार केले. कोकणातील साडेसहा जागांपैकी साडेपाच जागा आपण जिंकल्या. साडेसहा यासाठी मावळची थोडी जागा कोकणात येते म्हणून, महायुतीच्या  5.5 जागा  निवडून आल्या. केवळ भिवंडीची जागा निवडून येऊ शकली नाही, तिकडे काय घडले ते सर्वांनाच माहीत आहे. जे मुंब्र्यात घडले तेच भिवंडीत घडले, असो ते आपण सुधारु, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

आणखी वाचा

राज्यासाठी एकनाथ शिंदे प्रोटोकॉलनुसार मुख्यमंत्री, पण आमच्यासाठी फडणवीसच 'लीडर' : गणेश नाईक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lok Sabha Session : PM Narendra Modi आणि राहुल गांधी यांचं हस्तांदोलन ते अखिलेश यादव यांची फटकेबाजी
पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांचं हस्तांदोलन ते अखिलेश यादव यांची फटकेबाजी, संसदेत काय काय घडलं?
Kalki 2898 AD Day 1 Prediction : रिलीजच्या पहिल्याच दिवशी प्रभासचा चित्रपट रेकोर्ड तोडणार! 'कल्की 2898 एडी' किती कमाई करणार?
रिलीजच्या पहिल्याच दिवशी प्रभासचा चित्रपट रेकोर्ड तोडणार! 'कल्की 2898 एडी' किती कमाई करणार?
Richa Chadha  : प्रेग्नंसीमुळे दीपिकाला ट्रोल करणाऱ्यांना रिचा चढ्ढाचं सडेतोड उत्तर, म्हणाली गर्भायश नाही तर...
प्रेग्नंसीमुळे दीपिकाला ट्रोल करणाऱ्यांना रिचा चढ्ढाचं सडेतोड उत्तर, म्हणाली गर्भायश नाही तर...
Zika Virus Pune : ऐन वारीच्या तोंडावर पुण्यात झिका व्हायरसचा शिरकाव, कोथरूडच्या डॉक्टरला आणि त्याच्या मुलीला लागण
ऐन वारीच्या तोंडावर पुण्यात झिका व्हायरसचा शिरकाव, कोथरूडच्या डॉक्टरला आणि त्याच्या मुलीला लागण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Lok Sabha Session : PM Narendra Modi आणि राहुल गांधी यांचं हस्तांदोलन ते अखिलेश यादव यांची फटकेबाजीLaxman Hake Full PC Jalna : रुग्णालयातून डिस्चार्ज,  लक्ष्मण हाके मैदानात, कसा असणार दौरा?Chandrakant Patil on Pune Drugs Case : पब-बारसाठी नियमावली तयार करण्याची गरज : चंद्रकांत पाटीलSanjay Raut on Rahul Gandhi :

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lok Sabha Session : PM Narendra Modi आणि राहुल गांधी यांचं हस्तांदोलन ते अखिलेश यादव यांची फटकेबाजी
पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांचं हस्तांदोलन ते अखिलेश यादव यांची फटकेबाजी, संसदेत काय काय घडलं?
Kalki 2898 AD Day 1 Prediction : रिलीजच्या पहिल्याच दिवशी प्रभासचा चित्रपट रेकोर्ड तोडणार! 'कल्की 2898 एडी' किती कमाई करणार?
रिलीजच्या पहिल्याच दिवशी प्रभासचा चित्रपट रेकोर्ड तोडणार! 'कल्की 2898 एडी' किती कमाई करणार?
Richa Chadha  : प्रेग्नंसीमुळे दीपिकाला ट्रोल करणाऱ्यांना रिचा चढ्ढाचं सडेतोड उत्तर, म्हणाली गर्भायश नाही तर...
प्रेग्नंसीमुळे दीपिकाला ट्रोल करणाऱ्यांना रिचा चढ्ढाचं सडेतोड उत्तर, म्हणाली गर्भायश नाही तर...
Zika Virus Pune : ऐन वारीच्या तोंडावर पुण्यात झिका व्हायरसचा शिरकाव, कोथरूडच्या डॉक्टरला आणि त्याच्या मुलीला लागण
ऐन वारीच्या तोंडावर पुण्यात झिका व्हायरसचा शिरकाव, कोथरूडच्या डॉक्टरला आणि त्याच्या मुलीला लागण
Vashu Bhagnani : अक्षय कुमारच्या फ्लॉप चित्रपटामुळे ऑफिस विकावं लागलं? निर्मात्याने अखेर मौन सोडलं, म्हणाले...
अक्षय कुमारच्या फ्लॉप चित्रपटामुळे ऑफिस विकावं लागलं? निर्मात्याने अखेर मौन सोडलं, म्हणाले...
पंकजा मुंडे मंत्री होत्या, प्रीतम मुंडे खासदार होत्या, बीडचा विकास का केला नाही, सुषमा अंधारे यांचा हल्लाबोल
पंकजा मुंडे मंत्री होत्या, प्रीतम मुंडे खासदार होत्या, बीडचा विकास का केला नाही, सुषमा अंधारे यांचा हल्लाबोल
Maratha Reservation: सगेसोयरें जात प्रमाणपत्र म्हणजे आरक्षण कायद्यात ढवळाढवळ, वंचितच्या बॅनर्सनी वाद वाढणार?
सगेसोयरें जात प्रमाणपत्र म्हणजे आरक्षण कायद्यात ढवळाढवळ, वंचितच्या बॅनर्सनी वाद वाढणार?
Sanjay Raut on Rahul Gandhi :
"मोदी-शाहांना आता रोज राहुल गांधींना राम-राम करुनच संसदेत यावं लागेल"
Embed widget