Pankaja Munde: कोणाला कुठल्या मतदारसंघातून, कुठल्या पक्षातून तिकीट मिळणार? पंकजा मुंडे म्हणाल्या...
काल विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा शपथविधी झाल्यानंतर आज पंकजा मुंडे बीडमध्ये उपस्थित आहेत.
Pankaja Munde: लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकांची बहुतांश पक्षांनी जोरदार तयारी सुरू आहे. एकीकडे मराठा आरक्षण प्रश्न तापताना दिसत असून दुसरीकडे एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या मारल्याचे चित्रं आहे. कोणाला कुठल्या मतदारसंघातून तिकीट मिळणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागलेली असताना आमदार पंकजा मुंडे म्हणाल्या, कुणाला कोणत्या मतदारसंघातून, कोणत्या पक्षातून तिकीट मिळणार हे प्रत्येक पक्षाच्या कोअर कमिटीनंतर कळू शकेल असं त्या म्हणाल्या. विधानपरिषद निवडणुकीच्या शपथविधीनंतर आमदार पंकजा मुंडे आज पहिल्यांदाच बीडमध्ये आहेत.
दरम्यान, राज्यात मराठा आरक्षण प्रश्न तापत असताना मी पाच वर्षे पालकमंत्री होते त्या काळात एकही चुकीची घटना घडली नाही असे म्हणत मनोज जरांगे यांच्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मनोज जरांगे यांनी बीडमध्ये पंकजा आणि धनंजय मुंडे यांचे दहशत असल्याचे म्हटले होते. त्या म्हणाल्या, मला लोकसभा निवडणुकीमध्ये लोकांनी सहा लाख 75 हजार इतकी मत दिली. खोटं बोलून अफवा पसरवून एकदा विजय मिळवता आला पण यापुढे असं होणार नाही असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
वंचितबाबत स्ट्राँग भूमिका घेईन
राज्यात मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना राज्यातील वंचित बाबत मी स्ट्रॉंग भूमिका घेईन यात वाद नसल्याचे आमदार पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.
2019 विधानसभा आणि 2024 लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करल्यानंतर विधान परिषदेत पंकजा मुंडे आमदार झाल्या आहेत. दरम्यान काल विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा शपथविधी झाल्यानंतर आज त्या बीडमध्ये जाणार आहेत. यावेळी सावरगाव भगवान भक्ती गडावर जाणार असून, गोपीनाथ गडासह परळीतील बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे दर्शन घेतील असेही त्यांनी सांगितले. लोकसभेनंतर माझा पहिला दौरा असून मला सत्कार सोहळे फारसे मान्य नाहीत. आपलं सरकार आणण्यासाठी आम्हाला कामाला लागायचं आहे, असेही त्या म्हणाल्या.
प्रकाश आंबेडकरांना शुभेच्छा
वंचितांचा आवाजासाठी जर कोणी कार्यक्रम घेत असेल आणि त्यात लोक सहभागी होत असतील तर ही स्वागत आहे गोष्ट आहे. राज्यातील वंचितांबाबत मी स्ट्रॉंग भूमिका घेईन यात वादन असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या. यासोबत त्यांनी प्रकाश आंबेडकरांसह लक्ष्मण हाकेंनाही ओबीसी यात्रेला शुभेच्छा दिल्या.
अहंकाराचे भांडण सोडा, एकजूट व्हा: पंकजा मुंडे
यावेळी पंकजा मुंडे यांनी आपल्या समर्थकांना महत्त्वाचे आवाहन केले. अहंकाराचे, पदाचे भांडण सोडा आणि एकजूट व्हा. एक वर्ष एकजुटीने घ्या. बीड जिल्ह्याने इतिहास घडवला आहे. मला तुमच्याकडूनही वचन हवे आहे. तुम्ही एकजूट राहण्याचे वचन द्या. काय करायचं आणि काय करायचं नाही याच भान ठेवा. आपल्याला काही कमी पडणार नाही, असा सल्ला पंकजा मुंडे यांनी आपल्या समर्थकांना दिला.
जरांगेंच्या टिकेवर पंकजा मुंडे म्हणाल्या...
पंकजा मुंडेंनी जातीयवाद थांबवावं असं जरंगे म्हटल्यानंतर त्यावर पंकजा मुंडे म्हणाल्या, त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल आभार. मुद्दा काय आहे तिथे बोलले पाहिजे कोणी काहीही बोलेल त्यावर मी प्रतिक्रिया देणार नाही असे म्हणत त्यांनी मनोज जरांगेना टोलावले.