एक्स्प्लोर

Beed Election : बीडमध्ये मोठी घडामोड, हेमंत क्षीरसागर यांचा संदीप क्षीरसागर यांच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला पाठिंबा

Beed Election : बीड नगरपालिका निवडणुकीत माजी उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांनी आमदार संदीप क्षीरसागर यांच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार स्मिता वाघमारे यांना पाठिंबा दिला आहे.

बीड : आमदार संदीप क्षीरसागर यांचे भाऊ हेमंत क्षीरसागर यांनी मोठा निर्णय घेतल्यानं नगरपालिका निवडणुकीत नवे राजकीय समीकरण तयार झालं आहे. निवडणुकीच्या आदल्या दिवशी म्हणजे आज हेमंत क्षीरसागर यांनी त्यांचे भाऊ संदीप क्षीरसागर यांना पाठिंबा दिला आहे.  

माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी पुतणे योगेश क्षीरसागर यांना नगरपालिका निवडणुकीत पाठिंबा दिल्यानंतर निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे आज आमदार संदीप क्षीरसागर यांचे भाऊ हेमंत क्षीरसागर यांनी संदीप क्षीरसागरांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका एबीपी माझाशी बोलताना जाहीर केली. 

मागील बीड नगरपालिका निवडणुकीत हेमंत क्षीरसागर यांनी महत्त्वाची भूमिका बजावून उपनगराध्यक्ष पद मिळवले होते. मात्र, काका जयदत्त क्षीरसागर यांच्या भूमिकेनंतर शेवटच्या दिवशी त्यांनी आमदार संदीप क्षीरसागर यांनी निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी उभे केलेल्या उमेदवार स्मिता वाघमारे यांना पाठिंबा देऊन नवे राजकीय समीकरण निर्माण केले आहे.

Hemant Kshirsagar : हेमंत क्षीरसागर काय म्हणाले?

आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. यावर्षी बीडची नगरपालिका निवडणूक पाहिली तर सर्वसमावेशक चेहरा हा स्मिता वाघमारे म्हणून बीड शहरात समोर येत आहे. स्मिता वाघमारे यांचे आणि आमचे अनेक वर्षांपासूनचे कौटुंबिक संबंध आहेत. विष्णू वाघमारे आणि माझे गेल्या 15 वर्षांपासून वैयक्तिक संबंध आहेत. आजचा शेवटचा दिवस आहे. सर्व मित्र परिवार, प्रत्येक मित्र परिवारातील सहकारी आपण काय करायचं असं म्हणत होते. विष्णू वाघमारे 25 वर्षांपासून बीड शहरात काम करत आहेत. सर्व सामान्यांच्या मुलभूत गरजांसाठी ते कामी येऊ शकतात, त्यामुळं त्यांना मदत करायचं ठरवलं आहे. 

आमचे काका जयदत्त क्षीरसागर मोठे नेते आहेत. अनुभवी नेते आहेत पण लोकशाही आहे, त्यांच्या निर्णयाबाबत काही बोलू शकत नाही. मात्र, आम्ही आता स्मिता वाघमारे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणुकीत अनेक पक्ष, अनेक उमेदवार रिंगणात आहेत, अशावेळी मतदार काम करणारे चेहरा पाहून मतदान करतील, असं हेमंत क्षीरसागर म्हणाले. 

बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष व शिवसेना (उबाठा) पक्षाच्या बीड नगरपरिषद नगराध्यक्ष पदासाठी स्मिता विष्णु वाघमारे यांना उमेदवारी दिली आहे.  बीड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या भाजपनं डॉ. ज्योतीताई घोमरे (घुंबरे) यांना उमेदवारी दिली आहे. तर, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं  प्रेमलता दादासाहेब पारवे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळं बीडची निवडणूक रंगतदार बनली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

सत्तेत असूनही सरकार ऐकत नसेल तर ही सत्ता काय कामाची? राष्ट्रवादीच्या माझ्या आमदाराचा स्वपक्षाला घरचा आहेर
सत्तेत असूनही सरकार ऐकत नसेल तर ही सत्ता काय कामाची? राष्ट्रवादीच्या माझ्या आमदाराचा स्वपक्षाला घरचा आहेर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Rohit Pawar : राष्ट्रवादीला अर्थखातं मिळण्याची शक्यता कमी, रोहित पवारांचा दावा, भाजपच्या गोटातून पहिला प्रतिक्रिया समोर
राष्ट्रवादीला अर्थखातं मिळण्याची शक्यता कमी, रोहित पवारांचा दावा, भाजपच्या गोटातून पहिला प्रतिक्रिया समोर
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
Embed widget