सुप्रिया सुळे मुख्यमंत्री तर युग्रेंद्र पवार आमदार, बारामतीत झळकले बॅनर, राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाण
बारामतीत (Baramati) लावलेल्या एका बॅनरने सर्वांचे लक्ष वेधलंय. बारामतीत सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचे भावी मुख्यमंत्री तर युगेंद्र पवारांचे ( Yugendra Pawar) फिक्स आमदार म्हणून बॅनर लागले आहेत.
Supriya Sule and Yugendra Pawar Baramati news : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर राज्यात घडामोडींना वेग येत आहे. सर्वच राजकीय पक्षांनी हालचाली वाढल्या आहेत. तसेच इच्छुकांनी गाठी भेटी, दौरे सुरु केले आहेत. यामुळं राजकीय वातावरण तापायला सुरुवात झालीय. अशातच बारामतीत (Baramati) लावलेल्या एका बॅनरने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. बारामतीत सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून तर युगेंद्र पवारांचे ( Yugendra Pawar) फिक्स आमदार म्हणून बॅनर लागले आहेत. या बॅनरची सध्या राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
बारामतीतील गुणवडी चौकात लागले बॅनर
बारामतीतील गुणवडी चौकात फुल अँड फायनल ग्रुपच्या वतीने सुप्रिया सुळे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून तर युगेंद्र पवारांचे फिक्स आमदार म्हणून अशा आशयाचे फलक लावण्यात आलेले आहेत. ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त हे बॅनर लावण्यात आलेले आहेत. बारामतीत लागलेले सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवारांचे बॅनर सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.
महायुती आणि महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण?
सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. त्यात बरोबर महायुती आणि महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण याचीही चर्चा सुरू झाली आहे. प्रत्येक पक्ष आपलाच नेता मु्ख्यमंत्री व्हावा अशी इच्छा व्यक्त करत आहेत. सध्याच्या स्थितीत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, जयंत पाटील अशी नावे चर्चेत आहेत. या सर्वांत जर कोणी शांत असतील तर ते नाव आहे शरद पवार यांचे. त्यांनी अजूनही मुख्यमंत्रिपदाबाबतचे आपले पत्ते खोलले नाही. आधी महायुतीची सत्ता घालवू मग मुख्यमंत्री ठरवू अशी भूमीका त्यांनी घेतली आहे. दरम्यान, जर महाविकास आघाडीचे सरकार आले, त्यात जर राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष झाला तर शरद पवार सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करू शकतात अशी चर्चा आहे. राष्ट्रवादीचे निवडून येणारे बहुतांशी आमदार हे नवखे असणार आहेत. त्यामुळं सुप्रिया सुळे अशा आमदारांचे समर्थन मिळवू शकतात. आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांचा वरचष्मा होता. आता तशी स्थिती नाही. सुप्रिया सुळेंसाठी मोकळे मैदान आहे. शिवाय पक्षाचे जेष्ठ नेते जयंत पाटील, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड हे शरद पवारांच्या निर्णयाला विरोध करतील अशी स्थिती सध्या तरी नाही. त्यामुळं सध्या सुप्रिया सुळे यांच्या नावाची चर्चा सुरु आहे.
महत्वाच्या बातम्या: