Balasaheb Thackeray Birth Anniversary LIVE : बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे विधीमंडळात थोड्याच वेळात अनावरण
Balasaheb Thackeray Birth Anniversary : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची आज 97 वी जयंती आहे.जयंतीनिमित्त शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे.
LIVE
Background
Balasaheb Thackeray Birth Anniversary : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची आज 97 वी जयंती आहे. बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त मुंबईतील शिवसेना भवन (Shiv Sena Bhavan) चारही बाजूंनी रंगीबेरंगी रोषणाईने सजले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या पक्ष आज प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीसोबत युती करणार असल्याची घोषणा करण्यात येणार आहे. दुसरीकडे, बाळासाहेब ठाकरे यांच्या 97 व्या जयंतीनिमित्त राज्य सरकार आणि शिंदे गटाच्या शिवसेनेच्या (बाळासाहेबांची शिवसेना) वतीने त्यांच्या चित्राचे महाराष्ट्र विधिमंडळात अनावरण करण्यात येणार आहे. या विशेष कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी राज्य सरकारकडून उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि नातू निहार ठाकरे यांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. राज्य सरकारने पाठवलेले निमंत्रण उद्धव ठाकरे स्वीकारतात की नाही हे पाहावे लागेल.
जयंती साजरी करण्यासाठी ठाकरे आणि शिंदे गटामध्ये चढाओढ
बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. बाळासाहेबांची जंयती साजरी करण्यासाठी ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये चढाओढ सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. तसंच या जयंतीनिमित्त आपलीच शिवसेना कशी खरी हे दाखवण्यासाठी देखील दोन्ही गटांचा प्रयत्न सुरु आहे. बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचंही दोन्ही गटाकडून आयोजन करण्यात आलं आहे. शिवसेना भवनाला सुंदर रोषणाई करण्यात आली आहे तर शिंदे गटाच्यावतीने सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. आज बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी ठाकरे आणि शिंदे गटातील नेते अभिवादन करण्यासाठी येतील.
बाळासाहेबांच्या तैलचित्राचं आज अनावरण, ठाकरे कुटुंब उपस्थित राहणार?
तसंच मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच एकनाथ शिंदे यांनी विधानभवनात बाळासाहेबांचे तैलचित्र लावण्याचं जाहीर केलं होतं. याच दिवसाचं औचित्य साधत आज विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये बाळासाहेबांच्या तैलचित्राचं अनावरणही करण्यात येणार आहे. या तैलचित्राच्या कार्यक्रमासाठी ठाकरे कुटुंबातील सगळ्यांनाच निमंत्रित करण्यात आलं आहे. मात्र निमंत्रण मिळाल्यानंतरही ठाकरे कुटुंब कार्यक्रमाला येणार का याबाबत अद्यापही प्रश्नचिन्ह आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनाही या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं आहे.
उद्धव ठाकरे यांची शिवसेनेच्या पक्षप्रमुखपदाची मुदत आज संपणार
तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांची शिवसेनेच्या पक्षप्रमुखपदाची मुदत आज संपुष्टात येत आहे. यामुळे 23 जानेवारीनंतर उद्धव ठाकरे पक्षप्रमुख राहणार का? हाच मोठा प्रश्न ठाकरे गटच नाही तर राज्यातील राजकीय वर्तुळात आहे.
Balasaheb Thackeray Birth Anniversary: बाळासाहेबांच्या तैलचित्राचं अनावरण सोहळा; अनेक मान्यवर उपस्थित
विधीमंडळात थोड्याच वेळात बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण पार पडणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यसह अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली आहे.
Balasaheb Thackeray Birth Anniversary: बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे विधीमंडळात थोड्याच वेळात अनावरण
बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे विधीमंडळात थोड्याच वेळात अनावरण पार पडणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील उपस्थित झाले आहेत.
बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त नाशिकमध्ये माजी महापौर विनायक पांडे यांच्या शिवसेवा मित्र मंडळाकडून 11 हजार 111 लाडवांचा प्रसाद
Balasaheb Thackeray Birth Anniversary : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने नाशिकमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ठाकरे गटाचे माजी महापौर विनायक पांडे यांच्या शिवसेवा मित्र मंडळाने 11 हजार 111 लाडवांचा प्रसाद तयार केला असून त्याचे वाटप केले जाणार आहे. त्याचबरोबर 11 हजार 111 भगवे फुग्यांसह पक्षाचे मशाल चिन्ह बनवण्यात आले आहे.
बाळासाहेबांनी स्वत: उद्धव ठाकरेंना उत्तराधिकारी म्हणून जाहीर केलं होतं, त्या निर्णयाला आव्हान दिलं जातंय : सुप्रिया सुळे
Supriya Sule Pays Tribute To Balasaheb Thackeray : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त श्रद्धांजली अर्पण केली आहे. एबीपी माझाशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, पवार-ठाकरे कुटुंबांच जुनं नातं आहे." बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त होणारं राजकारण दुर्दैवी असल्याचं म्हटलं. "बाळासाहेबांचा उत्तराधिकारी म्हणून उद्धव ठाकरे हा त्यांचा (बाळासाहेबांचा) स्वत:चा निर्णय होता. शिवसेना हा बाळासाहेबांनी सुरु केलेला पक्ष आहे. त्यांनी आपला उत्तराधिकारी ठरवलेला आहे. त्याला चॅलेंज दिलं जातंय हे षडयंत्र आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी राज्यभरातील कार्यकर्ते शिवाजी पार्कवर
Balasaheb Thackeray Birth Anniversary : आज बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरातून कार्यकर्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्क स्मृतिस्थळावर अभिवादन करण्यासाठी येत आहेत. यामध्ये संगमनेरमधून शिवसेना ठाकरे गटाच्या अजित मोमीन या कार्यकर्त्याने आपल्या रक्ताने उद्धव ठाकरे यांना संदेश लिहिला आहे. 'आखरी सास तक उद्धव ठाकरे साहेब के साथ रहूंगा. मुस्लीम मावळा अजीज मोमीन' असा तो संदेश आहे.
तर दुसरीकडे परभणीच्या पालममधून रामचंद्र गायकवाड हे शिवसेना कार्यकर्ते सहा दिवसात 500 किलोमीटरचा सायकलवरु प्रवास करुन बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिस्थळावर अभिवादन करण्यासाठी आले आहेत. शिवसेनेचे हे कार्यकर्ते दरवर्षी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी पार्कवर सायकलवर येत असतात. यंदाचे त्यांचं सातवं वर्ष आहे