एक्स्प्लोर

Bajarang Sonawane : माझ्याकडे धनंजय मुंडेंच्या चार कॅसेट, त्यांनी टीका केल्यास मोठं पाऊल उचलणार; बजरंग सोनवणेंच्या वक्तव्याने खळबळ

Bajarang Sonawane : बीड लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी धनंजय मुंडे, पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

बीड : महाविकास आघाडी (MVA) म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (NCP SP) पक्षाचे बीड लोकसभेचे (Beed Lok Sabha Seat) उमेदवार बजरंग सोनवणे (Bajarang Sonawane) यांनी वडवणी तालुक्यातल्या कोठारबन येथे प्रचार सभा घेतली.  या प्रचार सभेत बजरंग सोनवणे यांनी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. धनंजय मुंडे फोनवर लोकांना एकेरी भाषेत कशा शिव्या देतात याच्या माझ्याकडे चार कॅसेट आहेत. त्यामुळे त्यांनी माझ्यावर टीका करू नये अन्यथा मी निवडणूक आयोगाकडे या कॅसेट सादर करील, असा थेट इशारा बजरंग सोनवणे यांनी धनंजय मुंडे यांना दिला आहे. 

धनंजय मुंडे मला बहुरंगी म्हणतात मात्र त्यांचाच बहुरंगीपणा संपूर्ण महाराष्ट्राने बघितला आहे. मी रंगात रंग मिसळणारा बजरंग असून दोन्ही बहीण भावाने माझ्यावर टीका करण्यापेक्षा बीड जिल्ह्याच्या विकासावर बोलावं, असं सोनवणे म्हणाले. प्रीतम मुंडे यांनी संसदेत मराठा आरक्षणाच्या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली नाही. आरक्षणाच्या प्रश्नावरून संसदेत त्या कधीच बोलल्या नाहीत.  दहा वर्ष खासदार असताना बीड जिल्ह्यात कोणता मोठा प्रकल्प आणला हे त्यांनी सांगावं, अशा शब्दात बजरंग सोनवणे यांनी धनंजय मुंडे यांच्यासह प्रीतम मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावर देखील टीका केली. 

बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्या प्रचार सभेत पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या की मी प्रीतम मुंडेंना नाशिक मधून निवडणुकीत उभं करेल मात्र प्रीतम मुंडे यांना तिकीट देण्याचा अधिकार पंकजा मुंडे यांना आहे का असा देखील प्रश्न बजरंग सोनवणे यांनी उपस्थित केला आहे.   

धनंजय मुंडे यांची राजकीय उंची अनैतिक : बजरंग सोनवणे 

राजकारणामध्ये माझी उंची आणि लायकी काढली जाते. मात्र, माझी उंची नैतिक आहे तर धनंजय मुंडे यांची उंची अनैतिक आहे असं बजरंग सोनवणे यांनी म्हटलं.  मी तीस वर्षांपासून राजकारणात आहे तर तुम्ही फक्त पंधरा वर्षापासून राजकारणात आलात, असं देखील सोनवणे यांनी म्हटलं. 
 
दिल्ली ते गल्लीपर्यंत दहा वर्षापासून तुमची सत्ता होती. तुम्ही जिल्ह्याच्या विकासासाठी काय केलं, असा सवाल बजरंग सोनवणे यांनी केला. बीड जिल्ह्यात पाणी आणणार असं तुम्ही म्हणता मात्र ते पाणी अद्यापही आलेलं नाही.  शेतकऱ्यांच्या शेतमालाला अद्यापही पुरेसा भाव मिळत नाही आणि हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठीच मला संसदेत निवडून जायचं आहे त्यामुळे कोणावर टीका करण्यापेक्षा विकासाचं राजकारण जिल्ह्यात झालं पाहिजे, असं बजरंग सोनवणे म्हणाले.  

संबंधित बातम्या : 

नाशिक लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात, महायुतीत तिढा कायम असतानाच भुजबळांच्या कट्टर समर्थकाने घेतला अर्ज

 Dindori Lok Sabha : दिंडोरीत महाविकास आघाडीच्या फुटीवर शिक्कामोर्तब, नाराज जे पी गावित आज भरणार उमेदवारी अर्ज

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्याही बॅगा तपासल्या, शिंदे म्हणाले, कपडेच आहेत, युरिन पॉट नाही
Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्याही बॅगा तपासल्या, शिंदे म्हणाले, कपडेच आहेत, युरिन पॉट नाही
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प जिंकताच अमेरिकेत गर्भनिरोधक औषधांची मागणी तब्बल 1 हजार पटींनी वाढली! नेमकं कारण आहे तरी काय?
डोनाल्ड ट्रम्प जिंकताच अमेरिकेत गर्भनिरोधक औषधांची मागणी तब्बल 1 हजार पटींनी वाढली! नेमकं कारण आहे तरी काय?
बजरंग सोनवणेंनी परळीत शड्डू ठोकला; राक्षस, रावणनंतर आता धनंजय मुंडेंना थेट भुताची उपमा
बजरंग सोनवणेंनी परळीत शड्डू ठोकला; राक्षस, रावणनंतर आता धनंजय मुंडेंना थेट भुताची उपमा
पोकळ धमक्यांना एकनाथ शिंदे घाबरत नाही, मला हलक्यामध्ये घेतला म्हणून टांगा पलटी झाला : एकनाथ शिंदे
पोकळ धमक्यांना एकनाथ शिंदे घाबरत नाही, मला हलक्यामध्ये घेतला म्हणून टांगा पलटी झाला : एकनाथ शिंदे
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्याही बॅगा तपासल्या, शिंदे म्हणाले, कपडेच आहेत, युरिन पॉट नाहीEknath Shinde Bag Checking | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बॅग तपासली, कपडे आहे युरीन पॉट नाहीSaleel Deshmukh :  हा रडीचा डाव; षडयंत्र रचणारा कोण आहे ? हे जनतेला माहित आहे - देशमुखDevendra Fadnavis on Chandiwal : मविआ काळातील भ्रष्टाचाराचे मोठे पुरावे समोर आले - फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्याही बॅगा तपासल्या, शिंदे म्हणाले, कपडेच आहेत, युरिन पॉट नाही
Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्याही बॅगा तपासल्या, शिंदे म्हणाले, कपडेच आहेत, युरिन पॉट नाही
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प जिंकताच अमेरिकेत गर्भनिरोधक औषधांची मागणी तब्बल 1 हजार पटींनी वाढली! नेमकं कारण आहे तरी काय?
डोनाल्ड ट्रम्प जिंकताच अमेरिकेत गर्भनिरोधक औषधांची मागणी तब्बल 1 हजार पटींनी वाढली! नेमकं कारण आहे तरी काय?
बजरंग सोनवणेंनी परळीत शड्डू ठोकला; राक्षस, रावणनंतर आता धनंजय मुंडेंना थेट भुताची उपमा
बजरंग सोनवणेंनी परळीत शड्डू ठोकला; राक्षस, रावणनंतर आता धनंजय मुंडेंना थेट भुताची उपमा
पोकळ धमक्यांना एकनाथ शिंदे घाबरत नाही, मला हलक्यामध्ये घेतला म्हणून टांगा पलटी झाला : एकनाथ शिंदे
पोकळ धमक्यांना एकनाथ शिंदे घाबरत नाही, मला हलक्यामध्ये घेतला म्हणून टांगा पलटी झाला : एकनाथ शिंदे
डॉ.बियाणींचा मर्डर कोणी केला, खऱ्या बापाचा असेल तर उत्तर देईल; आव्हाडांनी धनंजय मुंडेंचं सगळंच काढलं
डॉ.बियाणींचा मर्डर कोणी केला, खऱ्या बापाचा असेल तर उत्तर देईल; आव्हाडांनी धनंजय मुंडेंचं सगळंच काढलं
मी भाजपसोबत कंम्फर्टेबल, राज ठाकरेंनी सांगितली 'मन की बात'; महायुतीसोबत जाण्याचं राज'कारण'
मी भाजपसोबत कंम्फर्टेबल, राज ठाकरेंनी सांगितली 'मन की बात'; महायुतीसोबत जाण्याचं राज'कारण'
Video: ''बॅगेत कपडे आहेत, युरीन पॉट नाही''; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगची झाडाझडती; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
Video: ''बॅगेत कपडे आहेत, युरीन पॉट नाही''; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगची झाडाझडती; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
Karanja Assembly Election : भाजप हॅट्रिक करणार की काँग्रेस बाजी मारणार? कारंजा मतदारसंघामध्ये बहुरंगी लढत
भाजप हॅट्रिक करणार की काँग्रेस बाजी मारणार? कारंजा मतदारसंघामध्ये बहुरंगी लढत
Embed widget