एक्स्प्लोर

Zeeshan Siddique: मोठी बातमी: मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन झिशान सिद्दीकींची उचलबांगडी

Maharashtra Politics: युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही. यांनी संघटनेत फेरबदल केले आहेत. झिशान यांच्याकडून मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्षपद काढून घेण्यात आले.

मुंबई: काँग्रेसचे माजी नेते बाबा सिद्दीकी यांनी अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्त्वाकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. काँग्रेस पक्षाकडून बाबा सिद्दीकी यांचे चिरंजीव झिशान सिद्दीकी (Zeeshan Siddique) यांची मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन उचलबांगडी करण्यात आली. काँग्रेस (Congress) पक्षाकडून मंगळवारी रात्री उशीरा याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले. त्यानुसार मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी आता अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांची निवड करण्यात आली आहे. तर सुफियान मोहसीन हैदर यांच्याकडे मुंबई युवक काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही. यांनी संघटनेत फेरबदल केले आहेत. देशातील विविध राज्यांमधील पदाधिकाऱ्यांमध्ये बदल करण्यात आले असून नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. दिल्ली, गोवा, अंदमान निकोबार, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, त्रिपुरा आणि मुंबई प्रदेश युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये देखील बदल करण्यात आले आहेत.

काही दिवसांपूर्वीच झिशान सिद्दीकी यांचे वडील बाबा सिद्दीकी यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. तेव्हापासून झिशान हेदेखील काँग्रेस सोडतील, अशी चर्चा आहे. गेल्या काही दिवसांत त्यांनी काँग्रेसच्या बैठकांनाही उपस्थिती लावली नव्हती. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्त्वाकडून झिशान यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्यामुळे आता झिशान सिद्दीकी कधीपर्यंत काँग्रेसमध्ये थांबतात, हे पाहावे लागेल.

अजित पवारांच्या स्वागतासाठी झिशान सिद्दीकींची लगबग

बाबा सिद्दीकी यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशापूर्वी अजित पवार हे वांद्रे येथील झिशान यांच्या कार्यालयात आले होते. यावेळी त्यांचे स्वागत करण्यासाठी झिशान यांची लगबग सुरु असल्याचे दिसून आले होते. त्यावेळी झिशान यांनी आग्रहाने अजित पवार यांना कार्यालयातील खुर्चीवर नेऊन बसवले होते. तेव्हाच अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. तेदेखील बाबास सिद्दीकी यांच्यासोबतच राष्ट्रवादीत प्रवेश करतात का, असा सस्पेन्स निर्माण झाला होता. परंतु, झिशान यांनी आपण काँग्रेस पक्ष सोडणार नसल्याचे स्पष्ट केले होते. 

पूर्वीचे मुख्यमंत्री माझ्या ऑफिसजवळ कार्यक्रम घ्यायचे पण मला निमंत्रण नसायचं: झिशान सिद्दीकी

बाबा सिद्दीकी यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशानंतर झिशान सिद्दीकी यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली होती. त्यांनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांविषयी नाराजी व्यक्त केले होते. त्यांनी म्हटले होते की, यापूर्वी एक मुख्यमंत्री असे होते की, माझ्या ऑफिसजवळ कार्यक्रम ठेवायचे, पण त्या कार्यक्रमाचं मला निमंत्रण नसायचं. मी त्यांना भेटायचो तेव्हा ही गोष्ट बोलून दाखवायचो. एकदा तर जाहीर भाषणातही मी त्यांना मलाही मतदारसंघातील कार्यक्रमांचे निमंत्रण देत जा, असे सांगितले होते. अनेकदा माझ्या वाट्याचा निधीही शिवसेनेच्या दुसऱ्या एखाद्या आमदाराला दिला जात असे. मी त्यावेळी आवाज उठवायचो पण काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेते मला साथ द्यायचे नाही. मात्र, त्यावेळी अर्थमंत्री असलेले अजित पवार मला मदत करायचे, असे झिशान सिद्दीकी यांनी सांगितले.

आणखी वाचा

अजितदादांच्या सरबराईसाठी लगबग, ऑफिसवरचा पक्षाचा बोर्डही काढला; झिशान सिद्दीकीही काँग्रेस सोडणार?

पक्ष सोडला नाही, पण झिशान सिद्दीकींनी मनातली सगळी खदखद बोलून दाखवली, म्हणाले...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभाAaditya Thackeray : फडणवीस कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत, मनसेवरही हल्ला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
Sharad Pawar: वाट्टेल ते होऊ दे, पण  राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; आर.आर. आबांच्या लेकाच्या मतदारसंघातून शरद पवारांचा एल्गार
वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
Embed widget