Ashok Naigaonkar : पाशवी बहुमत येता कामा नये, देशातलं वातावरण एकाच अंगाने जाता कामा नये, कवी अशोक नायगावकरांचे परखड मत
Ashok Naigaonkar, कोल्हापूर : ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर त्यांच्या कवितेतून महाराष्ट्रासह देशातील राजकीय-सामाजिक परिस्थितीवर भाष्य करत असतात. त्यांची मत महाराष्ट्रभर चर्चेतही असतात.
Ashok Naigaonkar, कोल्हापूर : ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर (Ashok Naigaonkar) त्यांच्या कवितेतून महाराष्ट्रासह देशातील राजकीय-सामाजिक परिस्थितीवर भाष्य करत असतात. त्यांची मत महाराष्ट्रभर चर्चेतही असतात. दरम्यान आज अशोक नायगावकर यांनी कोल्हापूरात एबीपी माझ्याशी बोलताना देशातील राजकीय परिस्थिती, लोकसभा निवडणूक आणि पुण्यातील पोर्शे कार अपघातावर भाष्य केलं आहे. ते कोल्हापूरात एबीपी माझाशी बोलत होते.
पूर्वी दिवे खूप कमी होते, पण अंधाराची भीती वाटत नव्हती
देशात पाशवी बहुमत कुठेही येता कामा नये, देशातलं वातावरण एकाच अंगाने जाता कामा नये. कोणीतरी येईल आणि लोकशाही नाहीशी करेल ते दिवस आता संपलेले आहेत. देशातल्या राजकारणातील मालमसाल्याचा वीट आल्यासारखं वाटायला लागलेलं आहे. पूर्वी दिवे खूप कमी होते पण अंधाराची भीती वाटत नव्हती. आता दिवे खूप झालेत पण केव्हा अंधार होईल हे सांगता येत नाही. देशात उद्या काय होईल हे सांगता येत नाही, अशीच परिस्थिती देशातल्या प्रत्येक समाज मनात आहे. अनिश्चितेचे वातावरण आहे , असं अशोक नायगावकर (Ashok Naigaonkar) यांनी नमूद केलं आहे.
पुण्याच्या अपघाताची बातमी वाचली आणि वाईट वाटलं
पुण्याच्या अपघाताची (Pune Accident) बातमी वाचली आणि वाईट वाटलं. न्यायाधीश एका बाजूने निबंध लिहायला सांगत आहेत. हल्लीच्या मुलांना निबंध लिहायची सवय नाही तर निदान न्यायालय तरी मराठी भाषेच्या उद्धारासाठी काही प्रयत्न करत आहे, असं म्हणायला हरकत नाही. असं विनोदाने, उपहासाने, उपरोधने आम्हाला म्हणावे लागते. सध्या सगळं जागतिक वातावरणच बिघडलेलं आहे, असंही अशोक नायगावकर (Ashok Naigaonkar) यांनी नमूद केलं.
जे न देखे न रवी तो देखे कवी, याचा दुसरा अर्थ असा आहे की, कवी नेहमीच रात्री बाहेर पडतात. लोकशाही कितीही नाही म्हटलं तरी मतमतांतर पाहिली, संमेलन चाललेली पाहिली. अनेक ठिकाणी लेख छापून येत आहेत. हे ज्या अर्थी छापून येत आहेत, त्या अर्थी लोकशाही अजून जिवंत आहे. आम्ही सर्व चर्चा करत आहोत. हे एकाच अंगाने जाता कामा नये, कोणाला पाशवी बहुमत मिळता कामा नये, असं मतही नायगावकर (Ashok Naigaonkar) यांनी नोंदवले.
इतर महत्वाच्या बातम्या