एक्स्प्लोर

Ashok Chavan Resign : अजित पवारही काँग्रेसला सुरुंग लावणार, सहा आमदार दादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार?

Ashok Chavan Resign News :  काही आमदार हे भाजपात जाणार असून काही आमदार अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Ashok Chavan Resign News :  काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाण यांच्यासोबत आणखी काही आमदार राजीनामे देणार असल्याची चर्चा आहे. त्यापैकी काही आमदार हे  भाजपात जाणार असून काही आमदार अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (Ajit Pawar NCP) प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

अजित पवार गटाचा पर्याय का?

काँग्रेसमध्ये भगदाड पडल्यानंतर काही आमदार अशोक चव्हाण यांच्यासोबत भाजपात जाणार आहेत. तर, काही  आमदार हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपच्या उजव्या हिंदुत्ववादी भूमिकेला पर्याय म्हणून काँग्रेसचे काही आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. अजित पवार यांच्याकडून सातत्याने आपल्या भाषणात धर्मनिरपेक्ष विचारांची कास सोडणार नसून फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांवर काम करणार असल्याचे सातत्याने म्हटले जाते. त्यामुळे भाजपात थेट जाऊन हिंदुत्ववादी विचारांशी समझोत केला असल्याचा ठपका लावून घेण्यापेक्षा राष्ट्रवादीचा सोयीस्कर पर्याय अवलंबला जात असल्याची चर्चा सुरू आहे. 

कोणते आमदार अजित पवार गटात?

अशोक चव्हाण यांच्यानंतर आणखी काही आमदार काँग्रेसला हात दाखवणार आहेत. यामध्ये अस्लम शेख,  अमीन पटेल , सुलभा खोडके, हिरामण खोसकर, जितेश अंतापूरकर,  विश्वजित कदम आदींच्या नावांची चर्चा सुरू आहे. 

अस्लम शेख यांचा इन्कार

 दरम्यान, मालाड पूर्वचे आमदार  अस्लम शेख यांनी काँग्रेस सोडणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. माध्यमांना दिलेल्या माहितीत त्यांनी आपण काँग्रेस सोडणार असल्याचे वृत्त निराधार असल्याचे शेख यांनी म्हटले.  तर, सुलभा खोडके यांनीदेखील काँग्रेस सोडून जाणार असल्याच्या वृत्ताचे खंडन केले. 

अशोक चव्हाणांचा 2019 मध्ये लोकसभेत पराभव 

प्रताप पाटील चिखलीकर आणि अशोक चव्हाण हे नांदेडमध्ये दोन तगडे उमेदवार. चव्हाणांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी चिखलीकर यांच्या रूपानं भाजपला लोकसभेचा उमेदवार मिळाला. 2019 ला चिखलीकर यांना भाजपनं मैदानात उतरवलं आणि अशोक चव्हाण यांच्यापुढे मोठं आव्हान उभं केलं. चिखलीकर यांनी 4 लाख 86 हजार मतं घेत विजय मिळवला आणि यात किंगमकेर ठरले ते वंचितचे उमेदवार, ज्यांनी 1 लाख 66 हजार मतं घेतली. तर अशोक चव्हाण यांना 4 लाख 46 हजार मतं मिळाली. अशोक चव्हाण यांचा हा लोकसभेतला हा दुसरा पराभव ठरला. याआधी डॉ. व्यंकटेश काबदे यांनी अशोक चव्हाण यांचा पराभव केला होता. भाजपनं लोकसभेची जागा ही 2004 नंतर 2019 ला जिंकली होती. 

नांदेडचा गड काँग्रेसच्या ताब्यात ठेवण्यात अशोक चव्हाणांची मोठी भूमिका 

मराठवाड्यातील सर्वात प्रतिष्ठेची लढत म्हणून आता नांदेड लोकसभेकडे (Nanded Lok Sabha Election) पाहिलं जातं. काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी केंद्रीय गृह मंत्री आणि माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचा गड म्हणून ओळखला जाणारा जिल्हा म्हणजे नांदेड. पुढे अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी हा पूर्ण जिल्हा आपल्या हातात ठेवला, त्याच्यावर एकहाती वर्चस्व ठेवलं. काँग्रेससाठी सर्वात सुरक्षित मतदारसंघ म्हणून नांदेडकडे पाहिलं जातं. आतापर्यंत 17 पैकी 14 वेळा लोकसभेच नेतृत्व हे काँग्रेसकडे होते. मुख्यमंत्रीपदी विराजमन असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा ते विधानसभापर्यंत काँग्रेसला अच्छे दिन आणलेले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget