एक्स्प्लोर

Ashish Shelar : उद्धव ठाकरे म्हणजे 'व्होट जिहाद'चे आका, आशिष शेलारांची घणाघाती टीका 

Mumbai Lok Sabha Election : मराठी भाषा आणि मराठी माणसाचा अपमान भाजप होवू देणार नाही आणि गुजराती माणसांवर अन्यायही चालू देणार नाही असं मुंबई भाजपा अध्यक्ष ॲड. आशिष शेलार म्हणाले. 

मुंबई : विरोधकांच्या इंडिया आघाडीकडून एक नवीन पद्धतीचा जिहाद सुरू झाला आहे. पूर्वी आपण लँड जिहाद पाहिला, लव्ह जिहाद, भाषा जिहाद बघितला आता व्होट जिहाद मुंबईत मोठ्याप्रमाणात सुरू झाला आहे. या वोट जिहादचा 'आका' कोण असेल तर ते उद्धव ठाकरे आहेत अशी घणाघाती टीका मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केली. अशा देशविरोधी शक्तीच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बसत आहेत, म्हणून प्रत्येक राष्ट्रभक्ताचं मत हिरवी चादर पांघरणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या विरोधात पडले पाहिजे असेही आवाहन आशिष शेलार यांनी यावेळी केले. दक्षिण मुंबईच्या महायुतीच्या उमेदवार यामिनीताई जाधव यांच्या प्रचारार्थ परेलच्या शिरोडकर हायस्कूलमध्ये आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते आज बोलत होते. 

महायुतीच्या महाविजयासाठी एकजुटीने काम करण्याचे तसेच मोदी सरकारने केलेली विकासाची कामे घेऊन लोकांमध्ये जाऊन दमदार प्रचार करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले. यावेळी कॅबिनेट मंत्री ॲड.मंगलप्रभात लोढा, महामंत्री संजय उपाध्याय, माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांचेसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार म्हणाले, आम्ही कुठल्या धर्माच्या भाषेच्या विरोधात नाही. 1950 ते 2014 पर्यंत बहुतांश काँग्रेस राजवटीच्या कार्यकाळात जेव्हा मुस्लिमांची लोकसंख्या पाच टक्क्यांनी वाढते तेव्हा हिंदुंची संख्या 7.8 टक्क्यांनी कमी होते. यासाठी वोट जिहादच्या विरोधात लढताना आपल्याला आपले राष्ट्र टिकवायचे आहे. आपला हिंदुस्तान ताठ मानेने उभा करायचा आहे. हिंदू एकत्र आला तर यांना त्रास होतो त्यामुळे हिंदू विरोधी सर्वजण एकत्र आले आहेत. गेले दोन ते तीन दिवस मराठी आणि गुजराती वाद पेटविण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत. मराठी आणि गुजराती बांधव दुधात साखर याप्रमाणे मुंबईत राहत आहेत. मराठी भाषा आणि मराठी माणसाचा अपमान भाजप होवू देणार नाही आणि गुजराती माणसांवर अन्यायही चालू देणार नाही असेही मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यावेळी म्हणाले.

त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे

ठाकरे गटाला खूप अहंकार आला आहे. हा माज स्वत:च्या जीवावर असता तर ठीक होते पण तोही नाही. उद्धव ठाकरे यांचं प्रत्येक भाषण मी पाहतो. विरोधक काय करतात ते पाहिलं पाहिजे. उद्धव ठाकरे यांना कुणीही विचारत, कुणाच्या मनात प्रश्नही नाही तरीही ते सारखं म्हणतात की मर्दांचा पक्ष आहे. आमच्या मनात त्यांच्याबद्दल काही शंका नाही. स्वतःच्या मर्दुमकीवर अरविंद सावंत यांनी माज, मस्ती अहंकार केला तर समजू शकतो. ते इतके घाबरले आहेत की त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. यांच्या  समर्थकाने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्यात लिहिलं ज्या मशीनवर तुम्हाला कमळ दिसणार आहे तिकडे तुम्हाला मशाल बटन दाबायचे आहे. अशा प्रकारचा अपप्रचार केला जात आहे. ठाकरे गटाला कोणी मत द्यायला तयार नाही म्हणून ही खोटं पसरवत आहेत. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे अटल बिहारी वाजपेयी यांनी केलेली युती पक्की राहील. जिकडे कमळ आहे तिकडे धनुष्यबाण राहील. त्यामुळे धनुष्यबाण हे निशाणी असणारे बटन आपल्याला दाबायचे आहे असेही मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार म्हणाले.

एका विशिष्ट वर्गाच्या मतासाठी उद्धव ठाकरे यांचा कुर्निसात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवड्यात आपल्याला एक आवाहन केले आहे, त्यावर करताना आपल्याला सजग राहायला सांगितले आहे. डोळ्यात तेल घालून लक्ष द्यायला सांगितले आहे. गेल्या महिन्यात उद्धव ठाकरे यांनी माहीमच्या काही लोकांना शिवसेना भवनात बोलावलं. एका विशिष्ट रंगाच्या लोकांना बोलावून हिरवी चादर घालून त्यांना बसवलं आणि उद्धव ठाकरे त्यांना म्हणाले, हो गया, झालं गेलं विसरून जा... विसरून जा म्हणजे काय? त्या माहीममध्ये याकूब मेमनने त्याच्या स्कूटरमध्ये भरलेला आरडीएक्स मुंबईतील बारा ठिकाणी ठेवून बॉम्बस्फोट करून मुंबईकरांचा बळी घेतला. त्या याकूब मेमनच दहशतवादी कृत्य उद्धव ठाकरे हिंदूंना आणि मराठी माणसाला विसरायला लावत आहेत. विसरा म्हणून सांगत आहेत हा वोट जिहाद आहे. ॲड. उज्ज्वल निकम यांनी कसाबच्या विरोधातील लढाई लढली. 26/11 दहशतवादी हल्ल्यांमध्ये बळी गेलेल्या हुतात्म्यांचा अपमान करण्याचे काम उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेले काँग्रेस करत आहे. काँग्रेसचे वडेट्टीवार सांगतात, कसाबने गोळीबार केलाच नाही. कसाबने मुंबईवर हल्ला केला नाही. कसाबने 167 निष्पाप मुंबईकरांचे प्राण घेतले. कसाबच्या गोळीने आमचे वीर अधिकारी मारले गेले. एका विशिष्ट वर्गाच्या मतासाठी उद्धव ठाकरे कुर्निसात करत आहेत. हा व्होट जिहाद मुंबईत पसरवण्याचे काम उद्धव ठाकरे करत आहेत. उबाठाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांना मते मिळविण्यासाठी 1993 च्या दंगलीतील आरोपी इब्राहिम मुसा याची मदत घेतली आहे. ज्याला दहा वर्षे शिक्षा झाली होती त्याच्या मदतीवर उद्धव ठाकरे मते मागत आहेत अशीही टीका मुंबई भाजपा अध्यक्ष ॲड. आशिष शेलार यांनी केली.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2024 Playoffs : आरसीबी किती एलिमिनेटर सामने खेळला, काय सांगतात आकडे, यंदा राजस्थानचा अडथळा दूर करणार?
IPL 2024 Playoffs : आरसीबी किती एलिमिनेटर सामने खेळला, काय सांगतात आकडे, यंदा राजस्थानचा अडथळा दूर करणार?
Bhiwandi : बोगस मतदान, मतदारांना धमकावणे... भिवंडीत कपिल पाटील- बाळ्यामामा म्हात्रेंचे आरोप-प्रत्यारोप
बोगस मतदान, मतदारांना धमकावणे... भिवंडीत कपिल पाटील- बाळ्यामामा म्हात्रेंचे आरोप-प्रत्यारोप
IPL 2024 : 17 वर्षांचं स्वप्न पूर्ण होणार, यंदा RCB चषकावर नाव कोरणार, ही घ्या 3 मोठी कारणं 
IPL 2024 : 17 वर्षांचं स्वप्न पूर्ण होणार, यंदा RCB चषकावर नाव कोरणार, ही घ्या 3 मोठी कारणं 
पती शिंदे गटात, पुत्र ठाकरे गटात, अमोल किर्तिकर यांच्या मातोश्री म्हणाल्या, शिंदेंना सलाम ठोकणे पटत नाही, माझं मत...
पती शिंदे गटात, पुत्र ठाकरे गटात, अमोल किर्तिकर यांच्या मातोश्री म्हणाल्या, शिंदेंना सलाम ठोकणे पटत नाही, माझं मत...
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Sharad Pawar Interview : बीड आणि बारामतीत बोगस मतदान,शरद पवारांची EXCLUSIVE मुलाखतABP Majha Headlines : 09 PM : 20 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सZero Hour Lok Sabha Elections 2024 : महाराष्ट्रात कुणाचं पारडं जड? दिग्गजांची प्रतिष्ठा पणालाZero Hour Lok Sabha 2024 : नाशिक दिंडोरी आणि धुळे! कुठे कोण मारणार बाजी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2024 Playoffs : आरसीबी किती एलिमिनेटर सामने खेळला, काय सांगतात आकडे, यंदा राजस्थानचा अडथळा दूर करणार?
IPL 2024 Playoffs : आरसीबी किती एलिमिनेटर सामने खेळला, काय सांगतात आकडे, यंदा राजस्थानचा अडथळा दूर करणार?
Bhiwandi : बोगस मतदान, मतदारांना धमकावणे... भिवंडीत कपिल पाटील- बाळ्यामामा म्हात्रेंचे आरोप-प्रत्यारोप
बोगस मतदान, मतदारांना धमकावणे... भिवंडीत कपिल पाटील- बाळ्यामामा म्हात्रेंचे आरोप-प्रत्यारोप
IPL 2024 : 17 वर्षांचं स्वप्न पूर्ण होणार, यंदा RCB चषकावर नाव कोरणार, ही घ्या 3 मोठी कारणं 
IPL 2024 : 17 वर्षांचं स्वप्न पूर्ण होणार, यंदा RCB चषकावर नाव कोरणार, ही घ्या 3 मोठी कारणं 
पती शिंदे गटात, पुत्र ठाकरे गटात, अमोल किर्तिकर यांच्या मातोश्री म्हणाल्या, शिंदेंना सलाम ठोकणे पटत नाही, माझं मत...
पती शिंदे गटात, पुत्र ठाकरे गटात, अमोल किर्तिकर यांच्या मातोश्री म्हणाल्या, शिंदेंना सलाम ठोकणे पटत नाही, माझं मत...
IND vs PAK : पार्किंग लॉटमध्ये होणार भारत-पाकिस्तान सामना, विश्वचषकासाठी मैदान सज्ज
IND vs PAK : पार्किंग लॉटमध्ये होणार भारत-पाकिस्तान सामना, विश्वचषकासाठी मैदान सज्ज
IPL 2024 Final: चेन्नईमध्ये IPL फायनलचा थरार, तिकिटांची विक्री सुरु, सर्वात स्वस्त तिकिट किती रुपयांचं?  
IPL 2024 Final: चेन्नईमध्ये IPL फायनलचा थरार, तिकिटांची विक्री सुरु, सर्वात स्वस्त तिकिट किती रुपयांचं?  
Cyber Crime : तब्बल 18 लाखांहून अधिक सिम बंद होणार, सायबर गुन्ह्यांवरील नियंत्रणासाठी सरकारचं मोठं पाऊल
Cyber Crime : तब्बल 18 लाखांहून अधिक सिम बंद होणार, सायबर गुन्ह्यांवरील नियंत्रणासाठी सरकारचं मोठं पाऊल
T20 World Cup 2024 : भारतीय दुधाचा ब्रँड विश्वचषकात झळकणार, स्कॉटलँड आणि आयर्लंडच्या जर्सीवर दिसणार
T20 World Cup 2024 : भारतीय दुधाचा ब्रँड विश्वचषकात झळकणार, स्कॉटलँड आणि आयर्लंडच्या जर्सीवर दिसणार
Embed widget