एक्स्प्लोर

खासदार होताच बाळ्या मामा अन् कपिल पाटलांमध्ये वादाची ठिणगी; म्हात्रेंना कायदेशीर नोटीस पाठवणार

काल्हेर येथील या अनधिकृत बांधकामासाठी माजी खासदार कपिल पाटील व त्यांचा पुतण्या देवेश पाटील यांच्या नावाने हे बांधकाम व्यावसायिक येथील शेतकरी व नागरिकांना धमकावत जमिनींवर अतिक्रमण केले

ठाणे : जनतेच्या आशीर्वादाने मी खासदार झालो आहे. त्यामुळे येथील शेतकरी व जनसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्याची मुख्य जबाबदारी माझ्यावर आहे. काल्हेर येथे सुमारे 26 एकर  शासकीय सोबतच वन विभाग व स्थानिक नागरिकांच्या जमिनीवर नागरिकांना दमदाटी करून व अतिक्रमण करून येथील बांधकाम व्यावसायिक श्रीधर पाटील, भरत पाटील, नितीन पाटील यांनी  मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते सुरेश म्हात्रे यांनी केला आहे.  आता, कपिल पाटील यांच्या कुटुंबीयांकडूनही या आरोपावर प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. तसेच, बाळ्या मामांना कायदेशीर नोटीस बजावण्यात येईल, असेही देवेश पाटील यांनी म्हटले.  

काल्हेर येथील या अनधिकृत बांधकामासाठी माजी खासदार कपिल पाटील व त्यांचा पुतण्या देवेश पाटील यांच्या नावाने हे बांधकाम व्यावसायिक येथील शेतकरी व नागरिकांना धमकावत जमिनींवर अतिक्रमण केले असून येथील स्थानिक गुंडांना हाताशी धरून बांधकाम व्यावसायिक जनतेची फसवणूक करत आहेत, असा आरोपही खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी केला आहे. या प्रकरणी आपण तहसीलदार,उप विभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी,एमएमआरडीए यांच्याकडे तक्रार करणार असून या प्रकाराची सर्व कागदपत्रे शासकीय यंत्रणेला सोपविणार आहोत, असेही बाळ्या मामा यांनी यावेळी सांगितले. मात्र, खासदार म्हात्रेंच्या आरोपानंतर आता कपिल पाटील यांच्या कुटुंबीयांनी कायदेशीर नोटीस बजावणार असल्याचे म्हटले. तसेच, आमच्यावर करण्यात आलेले आरोप बिनबुडाचे व खोटे असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.  

कोल्हेर येथील बांधकाम व्यावसायिक जमिनीचे खोटे कागदपत्र दाखवून मध्यमवर्गीय गुंतवणूक करणाऱ्या कुटुंबीयांना घर खरेदी करणाऱ्या नागरिकांना फसवत असून दादागिरी व दहशत वाढवली जात आहे.शेतकऱ्यांच्या आग्रहा खातर मी इथे येऊन पाहणी केली असून मी शेतकऱ्यांना शब्द दिला होता की मी निवडून आलो की दुसऱ्याच दिवशी या जागेची पाहणी करणार व तिसऱ्या दिवशी तक्रार करून जनतेला न्याय देणार असल्याचे सांगितले असल्याने,आज घरी शुभेच्छा देणाऱ्यांची रीघ लागलेली असताना ते कार्यक्रम आटोपते घेऊन या ठिकाणी अनधिकृत बांधकामांची पाहणी केली असल्याचेही खासदार सुरेश म्हात्रे यांनी यावेळी सांगितले असून केवळ केंद्रीय मंत्र्यांच्या आशीर्वादाने शासकीय यंत्रणा या अनधिकृत बांधकामां वर दुर्लक्ष करत आले आहेत मात्र आता असा गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही असा इशारा देखील बाळ्या मामा यांनी दिला आहे.

कायदेशीर नोटीस बजावणार

दरम्यान, या विषयावर कपिल पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचे पुतणे देवेश पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, बाळ्या मामा यांनी आरोप केलेल्या प्रोजेक्टमध्ये आमचा कोणताही संबंध नसून, उलट बाळ्या मामा यांनी प्रोजेक्टचे कागदपत्र तपासावे ते त्यांच्या नेत्याच्या नावे आहेत हे स्पष्ट होईल. त्यांनी आमच्यावर केलेल्या बेझुट आरोपानंतर आम्ही लवकरच बाळ्यामामा यांना वकिलामार्फत कायदेशीर नोटीस बजावणार आहोत, अशी प्रतिक्रिया देवेश पाटील यांनी दिली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma: लढवय्या सेनापतीच्याही डोळ्याच्या कडा ओल्या, रोहितच्या डोळ्यात अश्रू, विराटने धीर दिला!
लढवय्या सेनापतीच्याही डोळ्याच्या कडा ओल्या, रोहितच्या डोळ्यात अश्रू, विराटने धीर दिला!
हिटमॅनचा नादच खुळा... अर्धशतक ठोकून इतिहास रचला; धोनीच्या 'या' क्लबमध्ये दिमाखात एन्ट्री
हिटमॅनचा नादच खुळा... अर्धशतक ठोकून इतिहास रचला; धोनीच्या 'या' क्लबमध्ये दिमाखात एन्ट्री
Aamir Khan : आमिर खानने मुंबईतील उच्चभ्रू वस्तीत खरेदी केला लक्झरी अपार्टमेंट,  किंमत किती?
आमिर खानने मुंबईतील उच्चभ्रू वस्तीत खरेदी केला लक्झरी अपार्टमेंट, किंमत किती?
Bhandara : BHEL प्रकल्पासाठी शेती दिल्या, मात्र ना प्रकल्प झाला, ना रोजगार मिळाला; 11 वर्षानंतरही फक्त फलक आणि सुरक्षा भिंत
BHEL प्रकल्पासाठी शेती दिल्या, मात्र ना प्रकल्प झाला, ना रोजगार मिळाला; 11 वर्षानंतरही फक्त फलक आणि सुरक्षा भिंत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 100 Headlines : सकाळच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 28 June 2024 : 6 AM  : ABP MajhaSunandan Lele T20 World Cup : भारतीय आक्रमणासमोर इंग्लंडचं सपशेल लोटांगणABP Majha Headlines :  6:30AM : 28 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSpecial Report Mumbai Water Shortage : मुंबईकरांवर ऐन पावसाळ्यात पाणीकपातीचं संकट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma: लढवय्या सेनापतीच्याही डोळ्याच्या कडा ओल्या, रोहितच्या डोळ्यात अश्रू, विराटने धीर दिला!
लढवय्या सेनापतीच्याही डोळ्याच्या कडा ओल्या, रोहितच्या डोळ्यात अश्रू, विराटने धीर दिला!
हिटमॅनचा नादच खुळा... अर्धशतक ठोकून इतिहास रचला; धोनीच्या 'या' क्लबमध्ये दिमाखात एन्ट्री
हिटमॅनचा नादच खुळा... अर्धशतक ठोकून इतिहास रचला; धोनीच्या 'या' क्लबमध्ये दिमाखात एन्ट्री
Aamir Khan : आमिर खानने मुंबईतील उच्चभ्रू वस्तीत खरेदी केला लक्झरी अपार्टमेंट,  किंमत किती?
आमिर खानने मुंबईतील उच्चभ्रू वस्तीत खरेदी केला लक्झरी अपार्टमेंट, किंमत किती?
Bhandara : BHEL प्रकल्पासाठी शेती दिल्या, मात्र ना प्रकल्प झाला, ना रोजगार मिळाला; 11 वर्षानंतरही फक्त फलक आणि सुरक्षा भिंत
BHEL प्रकल्पासाठी शेती दिल्या, मात्र ना प्रकल्प झाला, ना रोजगार मिळाला; 11 वर्षानंतरही फक्त फलक आणि सुरक्षा भिंत
Eknath Khadse : भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी खडसे कुटुंबीयांचा दोषमुक्तीसाठी अर्ज, ईडीला उत्तर सादर करण्याचे कोर्टाचे निर्देश
भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी खडसे कुटुंबीयांचा दोषमुक्तीसाठी अर्ज, ईडीला उत्तर सादर करण्याचे कोर्टाचे निर्देश
यापेक्षा वाईट काय असेल... विराट कोहली पहिल्यांदाच उपांत्य सामन्यात फेल, विश्वचषकातही फ्लॉप 
यापेक्षा वाईट काय असेल... विराट कोहली पहिल्यांदाच उपांत्य सामन्यात फेल, विश्वचषकातही फ्लॉप 
Dombivli Crime : झोपेची गोळी न दिल्याने मेडिकल कर्मचाऱ्याला रॉडने मारहाण, डोंबिवलीतील घटना सीसीटीव्हीत कैद
झोपेची गोळी न दिल्याने मेडिकल कर्मचाऱ्याला रॉडने मारहाण, डोंबिवलीतील घटना सीसीटीव्हीत कैद
Baby John : बॉडी डबलचा वापर नाही, बेबी जॉन चित्रपटात वरुण धवनच्या ॲक्शनचा तडका, 'या' दिवशी होणार प्रदर्शित
बॉडी डबलचा वापर नाही, बेबी जॉन चित्रपटात वरुण धवनच्या ॲक्शनचा तडका, 'या' दिवशी होणार प्रदर्शित
Embed widget