Arjun Khotkar : तुमचं अस्तित्व नव्हतं, तेव्हापासून आम्ही युती धर्म पाळतोय, अर्जुन खोतकरांची रावसाहेब दानवेंवर अप्रत्यक्ष टीका
शिंदेंच्या शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे नाव न घेता अप्रत्यक्ष टीका केली आहे.
![Arjun Khotkar : तुमचं अस्तित्व नव्हतं, तेव्हापासून आम्ही युती धर्म पाळतोय, अर्जुन खोतकरांची रावसाहेब दानवेंवर अप्रत्यक्ष टीका Arjun Khotkar You didn't exist since then we have been following Yuti Dharma Arjun Khotkar indirect criticism on Raosaheb Danve Marathi News Arjun Khotkar : तुमचं अस्तित्व नव्हतं, तेव्हापासून आम्ही युती धर्म पाळतोय, अर्जुन खोतकरांची रावसाहेब दानवेंवर अप्रत्यक्ष टीका](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/06/3709e807ab06e6a68e077e437701d1361725643150133924_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Arjun Khotkar on Raosaheb Danve, जालना : शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्या वरती नाव न घेता टीका केलीय. 1990 पासून आम्ही युतीचा धर्म पाळतो तेंव्हा तुमचं काहीच अस्तित्व नव्हतं. मात्र आता तुम्ही युती धर्म पाळला नाही तर आमच्या कार्यकर्त्यांनी वेगळी भूमिका घेतली आणि परिणाम वेगळे दिसले तर नवल वाटायला नको" असा इशाराच अर्जुन खोतकर (Arjun Khotkar ) यांनी दिलाय. जालन्यातील भोकरदन येथे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांचा सन्मान करण्यात आला यावेळी ते बोलत होते.
इतरांकडून चांगल्या वागणुकीची अपेक्षा करतात आणि आपली वागणूक कशी आहे?
अर्जुन खोतकर म्हणाले, महायुतीचा आम्ही धर्म पाळतो, आता तुम्ही धर्म पाळला नाही तर आमच्या कार्यकर्त्यांनी वेगळी भूमिका घेऊन वेगळे परिणाम दिसले तर नवल वाटायला नको. 1990 पासून अम्ही युतीचा धर्म पाळलेला तेव्हा तुमचं काही अस्तित्व नव्हतं. तेव्हा अम्ही तुम्हाला साथ दिली. काही लोक इतरांकडून चांगल्या वागणुकीची अपेक्षा करतात आणि आपली वागणूक कशी आहे? असा सवालही अर्जुन खोतकर यांनी केला.
कार्यकर्त्यांना डावलण्याचा प्रयत्न केला तर गाठ आमच्याशी आहे
पुढे बोलताना अर्जुन खोतकर म्हणाले, हार जीत होत असते मात्र आम्ही कोणाचा द्वेष केला नाही. आमच्या कार्यकर्त्यांना डावलण्याचा प्रयत्न केला तर गाठ आमच्याशी आहे. अशा सर्व अधिकाऱ्यांचा हिशोब करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. दरम्यान काही लोक इतरांकडून चांगले वागणुकीची अपेक्षा करतात मात्र आपली वागणूक कशी आहे ?असा सवाल करत खोतकर यांनी जेव्हा होईल तेव्हा आमच्या पाठीत सुरा खुपसण्याचं काम केल्याचा आरोप देखील त्यांनी केला. यावेळी भाषणाच्या सुरुवातीलाच खोतकर यांनी सरकारी अधिकाऱ्यांना तंबी देखील दिली.
इतर महत्वाच्या बातम्या
Rajendra Raut : मी फुकलो असतो तरी उदयनराजे पडले असते, असं मनोज जरांगे म्हणाले होते; आमदार राजेंद्र राऊत यांचा दावा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)