Antarwali Sarati : अंतरवाली सराटीमध्ये पंकजा मुंडेंच्या विजयाचा जल्लोष, तरुणांनी डीजे लावून गुलाल उधळला
Antarwali Sarati : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी विधानपरिषद निवडणुकीत (Vidhan Parishad Election) विजय मिळवल्यानंतर आज अंतरवाली सराटीमध्ये (Antarwali Sarati) गावकऱ्यांनी गुलाल उधळत आतिषबाजी करून जल्लोष साजरा केला.
Antarwali Sarati : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी विधानपरिषद निवडणुकीत (Vidhan Parishad Election) विजय मिळवल्यानंतर आज अंतरवाली सराटीमध्ये (Antarwali Sarati) गावकऱ्यांनी गुलाल उधळत आतिषबाजी करून जल्लोष साजरा केला. यावेळी तरुण मुंडे समर्थकांनी गावात डीजे लाऊन मिरवणूक देखील काढली.
ओबीसी आंदोलकांनी गावातून रॅली काढून आपला आनंद व्यक्त केला
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आंदोलन केलेल्या या गावाने नुकताच वडीगोद्री येथील ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला देखील पाठिंबा देत रॅली काढली होती. आज पंकजा मुंडे समर्थक आणि ओबीसी आंदोलकांनी गावातून रॅली काढून आपला आनंद व्यक्त केला. पंकजा मुंडे यांचा बीड लोकसभा मतदारसंघात पराभव झाला होता. मात्र, विधानपरिषदेतील विजयाने पंकजा यांचे राजकीय पुनर्वसन झाले आहे. तसेच पंकजा मुंडे महाराष्ट्राच्या विधीमंडळात परतल्या आहेत.
विधानपरिषद निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
विधान परिषदेत गेल्यानंतर अनेक महत्त्वाची कामे आहेत. मराठा ओबीसी आरक्षण प्रश्न मोठा आहे. एका बाजूला मनोज जरांगे तुमचे 288 आमदार पाडू असं म्हणत असताना तसेच ओबीसी नेते लक्ष्मण हाके ही मुंबई जाम करू अशी घोषणा करत असताना यावर उपाय काढला पाहिजे. नेत्यांनी मॅच्युअरली हा विषय हाताळायला हवा असंही पंकजा मुंडे म्हणाल्या. विधानपरिषदेत विजयी होणार याबाबत अधिक आम्हाला विश्वास होता. आता राज्यात आल्यामुळे सध्या जे काही फेकण्यासाठी बनवण्यात आले आहे ते खोडून काढायचे आहे.असे पंकजा मुंडे म्हणाल्या. जी मत फुटली त्याबाबत मला माहिती नाही. कारण मला पक्षाची २७ मत मिळाली आहेत, असेही त्यांनी सांगितले.
कोणत्या पक्षाचे आणि कोणते उमेदवार विजयी?
भाजपचे विजयी उमदेवार
1) योगेश टिळेकर - 26 मते
2) पंकजा मुंडे - 26 मते
3) परिणय फुके- 26 मते
4) अमित गोरखे - 26 मते
5) सदाभाऊ खोत - 24
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विजयी उमेदवार
1) भावना गवळी -
2) कृपाल तुमाने
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार)
1. शिवाजीराव गर्जे
2. राजेश विटेकर
काँग्रेस विजयी उमेदवार
1) प्रज्ञा सातव - 26
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
1.) मिलिंद नार्वेकर