एक्स्प्लोर

Maharashtra Politics: 'देवेंद्र फडणवीस माझ्या अटकेची वाट...', गिरीश महाजन प्रकरणावरून अनिल देशमुखांचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल

Maharashtra Politics: गिरीश महाजन यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी जळगावच्या तत्कालीन पोलीस अधीक्षकांवर दबाव टाकल्याचा आरोप अनिल देशमुखांवर करण्यात आला आहे.

पुणे: भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी जळगावच्या तत्कालीन पोलीस अधीक्षकांवर दबाव टाकल्याचा आरोप माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर करण्यात आलेला आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते तेव्हा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना खोट्या गुन्ह्यात अडवण्यात आल्याचा आरोप करत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आता अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी सोशल मिडियावर पोस्ट करत उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. 

अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी त्यांच्या सोशल म मिडिया एक्स(पुर्वीचे ट्विटर)वरती पोस्ट लिहून देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं आहे. 'देवेंद्र फडणवीस यांनी 4 वर्षा पुर्वीची घटना उकरुण काढीत माझ्या विरुध्द दिल्लीच्या मदतीने CBI FIR दाखल केली आहे. 4 वर्षापुर्वी मी गृहमंत्री असतांना जळगावच्या एका घटनेमध्ये भाजपाचे नेते गिरीष महाराज (Girish Mahajan) यांच्यावर कारवाई करण्यासाठी मी जळगावच्या पोलीस अधिकाऱ्यावर दबाव टाकला होता, हा माझ्यावर आरोप आहे. माझ्या माहितीनुसार माझ्यावर रेड टाकुन मला अट‍क करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करीत आहेत. ज्या देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) दिल्लीच्या मदतीने ED-CBI ला हाताशी धरुण महाराष्ट्राचे राजकारण अतिशय खालच्या स्तरावर आणले त्यांना सांगु ईच्छीतो की, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मी माझ्या अटकेची वाट पाहत आहे, असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. 

माझ्यावर रेड टाकून मला अट‍क करण्याचा प्रयत्न 

अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) माझ्या अटकेची वाट पाहत असल्याचंही म्हटलं आहे, माझ्या माहितीनुसार माझ्यावर रेड टाकुन मला अट‍क करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) करीत आहेत. ज्या देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीच्या मदतीने ED-CBI ला हाताशी धरुण महाराष्ट्राचे राजकारण अतिशय खालच्या स्तरावर आणले त्यांना सांगु ईच्छीतो की, देवेंद्र फडणवीस मी माझ्या अटकेची वाट पाहत आहे, असा उल्लेख त्यांनी आपल्या पोस्टमध्ये केला आहे. 

काय आहे प्रकरण?

गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी पत्रकार परिषदेत महाविकास आघाडी सरकार असताना त्यांना मोक्का अंतर्गत अटक करण्यासाठी अनिल देशमुख यांनी खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला होता असा गंभीर आरोप केला होता. तसेच हा संपूर्ण प्रकार प्रवीण मुंडे यांनीच माझ्या लक्षात आणून दिल्यानंतर मी या संदर्भात अनिल देशमुख यांना जाब विचारला होता असे देखील गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी म्हटलं होतं. याप्रकरणी नुकतच सीबीआयकडून चौकशी करण्यात आली असून आता अनिल देशमुख यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 CBI कडून अनिल देशमुखांविरुद्ध गुन्हा दाखल

माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या अडचणी वाढ झाली असून सीबीआयकडून त्यांच्यवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी जळगावच्या तत्कालीन पोलीस अधीक्षकांवर दबाव टाकल्याचा आरोप करत त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jio Server Down : गणपती विसर्जनाच्या दिवशीच 'जिओ'वर गंडांतर! सकाळपासून नेटवर्क गायब, युजर्स हैराण
गणपती विसर्जनाच्या दिवशीच 'जिओ'वर गंडांतर! सकाळपासून नेटवर्क गायब, युजर्स हैराण
Ganesh Visarjan 2024 : भिवंडीतील 22 फूट उंच गणेश मूर्तीच्या विसर्जनात अतिक्रमणामुळे अडथळे, मार्ग बदलण्याची वेळ
भिवंडीतील 22 फूट उंच गणेश मूर्तीच्या विसर्जनात अतिक्रमणामुळे अडथळे, मार्ग बदलण्याची वेळ
Pune Ganesh Visarjan: पुण्यात गणपती विसर्जनासाठी येताय? तर मग जाणून घ्या दुचाकी, चारचाकी पार्किंगची सोय कुठे अन् मेट्रोचं काय?
पुण्यात गणपती विसर्जनासाठी येताय? तर मग जाणून घ्या दुचाकी, चारचाकी पार्किंगची सोय कुठे अन् मेट्रोचं काय?
Ganesh Visarjan 2024 : गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी डॉल्बी साऊंड लावताना मेंदुतून रक्तस्राव, डीजेवाला जागीच कोसळला अन्...
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी डॉल्बी साऊंड लावताना मेंदुतून रक्तस्राव, डीजेवाला जागीच कोसळला अन्...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Ramanbaug Dhol Pathak : कसबा गणपतीसमोर रमणबाग ढोल पथकाचं वादनSolapur Ganpati Visarjan : सोलापुरात बाप्पाचं विसर्जन, वाजत गाजत बाप्पाला निरोपLalbaugacha Raja Visarjan : लालबागच्या राजाचं मंडपातून प्रस्थान, लाखो भक्तांची मांदीयाळीLalbaugcha Raja Visarjan 2024 :लालबागमध्ये विसर्जन मिरवणुकीसाठी तुफान गर्दी; पोलिसांचा मोठा बंदोबस्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jio Server Down : गणपती विसर्जनाच्या दिवशीच 'जिओ'वर गंडांतर! सकाळपासून नेटवर्क गायब, युजर्स हैराण
गणपती विसर्जनाच्या दिवशीच 'जिओ'वर गंडांतर! सकाळपासून नेटवर्क गायब, युजर्स हैराण
Ganesh Visarjan 2024 : भिवंडीतील 22 फूट उंच गणेश मूर्तीच्या विसर्जनात अतिक्रमणामुळे अडथळे, मार्ग बदलण्याची वेळ
भिवंडीतील 22 फूट उंच गणेश मूर्तीच्या विसर्जनात अतिक्रमणामुळे अडथळे, मार्ग बदलण्याची वेळ
Pune Ganesh Visarjan: पुण्यात गणपती विसर्जनासाठी येताय? तर मग जाणून घ्या दुचाकी, चारचाकी पार्किंगची सोय कुठे अन् मेट्रोचं काय?
पुण्यात गणपती विसर्जनासाठी येताय? तर मग जाणून घ्या दुचाकी, चारचाकी पार्किंगची सोय कुठे अन् मेट्रोचं काय?
Ganesh Visarjan 2024 : गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी डॉल्बी साऊंड लावताना मेंदुतून रक्तस्राव, डीजेवाला जागीच कोसळला अन्...
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी डॉल्बी साऊंड लावताना मेंदुतून रक्तस्राव, डीजेवाला जागीच कोसळला अन्...
Lalbaugcha Raja: लालबागचा राजाच्या चरणांपाशीची ती चिठ्ठी चर्चेत, सुधीर साळवींना ठाकरे गटाची उमेदवारी, अजय चौधरींचा पत्ता कट होणार?
लालबागचा राजाच्या चरणांपाशीची ती चिठ्ठी चर्चेत, सुधीर साळवींना ठाकरे गटाची उमेदवारी, अजय चौधरींचा पत्ता कट होणार?
Lalbughcha Raja Visarjan Aarti LIVE : सुखकर्ता दुःखहर्ता ... विसर्जनाआधी लालबाग राजाची आरती लाईव्ह
Lalbughcha Raja Visarjan Aarti LIVE : सुखकर्ता दुःखहर्ता ... विसर्जनाआधी लालबाग राजाची आरती लाईव्ह
Delhi Chief Minister दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी आतिशी यांना संधी; केजरीवालांकडून प्रस्ताव, भाजपचा दावा ठरला खोटा
दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी आतिशी यांना संधी; केजरीवालांकडून प्रस्ताव, भाजपचा दावा ठरला खोटा
Sherlyn Chopra Shocking Confession :   होय, पैशांसाठी देहविक्रीचा व्यवसाय केलाय; अभिनेत्रीच्या कबुलीने उडाली एकच खळबळ
होय, पैशांसाठी देहविक्रीचा व्यवसाय केलाय; अभिनेत्रीच्या कबुलीने उडाली एकच खळबळ
Embed widget