Navneet Rana: नाची, डान्सर, बबली म्हणणाऱ्या संजय राऊत यांना नवनीत राणांचं जशास तसं उत्तर, म्हणाल्या...
जनाब संजय राऊत, सून ले मेरी बात तू अमरावतीला येऊन तू नवनीत राणांना गाडण्याची भाषा केली. एक लक्षात ठेव ही अमरावती आहे.या अमरावतीत तुझ्यासारखे 56 गाडण्याची ताकद आहे, अशी टीका नवनीत राणांचे पती रवी राणा यांनी केली आहे.
अमरावती : अमरावतीत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची नवनीत राणांवर (Navneet Rana) टीका करताना जीभ घसरली. त्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. खासदार नवनीत राणा यांनी देखील संजय राऊतांच्या वक्तव्याचा चांगला समाचार घेतला आहे. अशा प्रकारचं वक्तव्य करण्याआधी राऊतांनी आपल्या आईकडे आणि मुलीकडे पाहायला हवं होतं, असे म्हणत अमरावतीमध्ये आयोजित सभेत नवनीत राणांनी संजय राऊतांना उत्तर दिले आहे.
नवनीत राणा म्हणाल्या, कोण आहे संजय राऊत? सीतेला पण भोग चुकले नाही.आपण तर राजकारणात आहे. संजय राऊतांनी बोलताना ज्या मुलीचे कन्यादान केले आणि ज्या मातेच्या पोटी जन्म घेतला तिच्याकडे पाहायला हवे होते. माझ्यावर टीका करण्याअगोदर आपल्य पत्नीकडे तरी एकदा पाहायचे होते. एखादी महिला जर बाहेर येऊन काम करते तर ती तिचा स्वाभिमान विकत नाही. अमरावतीची तर मी सून आहे. नवनीत राणांसोबत अमरवातीतील प्रत्येक महिलेचा स्वाभिमान, सन्मान जोडला गेला आहे.
अमरावतीत तुझ्यासारखे 56 गाडण्याची ताकद, रवी राणा संतापले
नवनीत राणांचे पती रवी राणा यांनी देखील राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे. रवी राणा म्हणाले, संजय राऊत अमरावतीला येऊन गेला अतिशय खालच्या पातळीवर नवनीत राणांवर टीका केली. अतिशय खालच्या पातळीवर टीका केलेला संजय राऊत आता जनाब संजय राऊत झाला आहे. जनाब संजय राऊत, सून ले मेरी बात तू अमरावतीला येऊन तू नवनीत राणांना गाडण्याची भाषा केली. एक लक्षात ठेव ही अमरावती आहे. या अमरावतीत तुझ्यासारखे 56 गाडण्याची ताकद आहे. नवनीत राणाविरोधात ज्या भाषेत टीका केली.तुमच्या वयाची मुलगी आहे नवनीत राणा आहे.14 दिवस जेलमध्ये ठेवून देखील पोट भरले नाही वर परत तुम्ही अमरावतीला येऊन गाडण्याची भाषा बोलता. हिंदू शेरणी म्हणून आता नवनीत राणा पुढे आल्या आहेत
काय म्हणाले होते संजय राऊत?
लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं अमरावतीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप उमेदवार नवनीत राणा यांच्यावर आक्षेपार्ह शब्दांमध्ये टीका केली आहे. तसंच ज्या बाईनं मातोश्रीला आव्हान देण्याचा प्रयत्न केला, ज्या बाईनं मातोश्रीत घुसण्याचा प्रयत्न केला, मातोश्रीविषयी अपशब्द वापरले, हिंदुत्वाविषयी अपशब्द वापरले. त्या बाईचा पराभव करणं शिवसैनिकांचं पहिलं कर्तव्य आणि नैतिक कर्तव्य आहे. ती नाची...डान्सर.. बबली.. तुम्हाला खुनावेल.. पडद्यावरून इशारे करेल.. पण भुरळून जाऊ नका.. अशा एका नटीने विश्वामित्रांनाही फसवले होते, असंही राऊतांनी म्हटलं आहे.
हे ही वाचा :
उमेश कोल्हे हत्याकांडावर भाष्य, राऊतांवर पलटवार; अमरावतीच्या सभेत राणा आक्रमक