एक्स्प्लोर

मोठी बातमी! काँग्रेसचे 4 आमदार अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार, अमोल मिटकरींचं वक्तव्य, एकाचं नावही सांगितलं

पुढच्या चार ते पाच दिवसात काँग्रेसचे (Congress) चार आमदार अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी दिली आहे.

Amol Mitkari : पुढच्या चार ते पाच दिवसात काँग्रेसचे (Congress) चार आमदार अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी दिली आहे. रविवारी अमरावतीच्या काँग्रेस आमदार सुलभा खोडके अमरावतीत एका मेळाव्यात अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याचे मिटकरी म्हणाले. आज राष्ट्रवादीतील इनकमिंगची सुरूवात सिने अभिनेते सयाजी शिंदेपासून सुरू झाल्याचं मिटकरी म्हणाले. 

अमोल मिटकरी उद्या अकोल्यात प्रकाश आंबेडकरांची भेट घेणार

दरम्यान, आमदार अमोल मिटकरी उद्या अकोल्यात प्रकाश आंबेडकरांची भेट घेणार आहेत. अकोल्यातील 'यशवंत भवन' या आंबेडकरांच्या निवासस्थानी आमदार मिटकरी आंबेडकरांची भेट घेणार आहेत. अजित पवार आणि प्रकाश आंबेडकरांनी आगामी विधानसभा निवडणुकीत एकत्र यावं, अशी साद आमदार अमोल मिटकरींनी दिली आहे. आंबेडकरांच्या काही अटीशर्ती असतील तर आपण मध्यस्थी म्हणून काम करू असेही ते म्हणालेत. या संदर्भातच आज रात्री अजितदादांसोबत आपण स्वतः बोलणार असल्याचंही मिटकरी म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणेंच्या तोंडाला पट्टा लावावा 

नितेश राणे या व्यक्तीबद्दल बोलावं वाटत नाही. प्रत्येक तरुण सुशिक्षित झालाय, अशा बावळट लोकांच्या नादाला लागणार नाही असे अमोल मिटकरी म्हणाले.  नितेश राणेंचे वक्तव्य कोणीही लोकशाहीमध्ये खपवून घेणार नाही. त्यांना आवरलं नाही तर त्यांच्याच पक्षांना नुकसान भोगावे लागेल. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या तोंडाला पट्टा लावावा असेही मिटकरी म्हणाले. अशा प्रकारचे वक्तव्य करून जातीय दंगल भडकवण्याचं पाप नितेश राणेंनी करू नये, असा सल्ला मिटकरींनी दिला. 

पक्ष प्रवेश करणाऱ्या सर्वांची नावं माहिती आहेत, पण सध्या घेणार नाही

अभिनेते सयाजी शिंदे यांच्या पक्षप्रवेशापासून सुरुवात झाली आहे.. लवकरच अमरावती काँग्रेस आमदार सुलभाताई खोडके यांचा पक्षप्रवेश होणार आहे. त्यापुढेही काँग्रेसचे तीन आमदार लवकरच पक्ष प्रवेश करणार आहेत. सर्वांची नावं माहिती आहेत, पण सध्या घेणार नाही असे मिटकरी म्हणाले. 
तुतारी गटात बंपर पक्षप्रवेश सुरू आहे याबाबत बोलताना मिटकरी म्हणाले की, त्यातले लोक कंटाळलेत. ते सुद्धा पुढं अजितदादांचं नेतृत्व करताना दिसले तर नवल वाटून घेऊ नका असे मिटकरी म्हणाले. अजितदादांवर विश्वास ठेवून अनेक नेते राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची माहिती अमोल मिटकरी यांनी दिली आहे. 

महत्वाच्या बातम्या:

अमोल मिटकरींना शरद पवार गटाकडून ऑफर, पक्षाचं स्टार प्रचारक, आमदार ते राज्यमंत्रीपद, बड्या नेत्याचा फोन 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Samarjeetsinh Ghatge on Hasan Mushrif : निष्ठा विकल्याने झोप येत नाही, कागलचे नाव बदनाम करण्याचा ठेका घेतला; समरजित घाटगेंचा हसन मुश्रीफांवर जोरदार पलटवार
निष्ठा विकल्याने झोप येत नाही, कागलचे नाव बदनाम करण्याचा ठेका घेतला; समरजित घाटगेंचा हसन मुश्रीफांवर जोरदार पलटवार
Konkan Sea Bridge: विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी कोकणातील 7 पूलांचे भूमिपूजन, 8000 कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प
विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी कोकणातील 7 पूलांचे भूमिपूजन, 8000 कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प
Congress Action: अजित पवारांच्या पक्षात जाण्याच्या चर्चा असलेल्या 'त्या' आमदारावर काँग्रेसची कारवाई! सहा वर्षांसाठी केलं निलंबित, काय आहे प्रकरण?
अजित पवारांच्या पक्षात जाण्याच्या चर्चा असलेल्या 'त्या' आमदारावर काँग्रेसची कारवाई! सहा वर्षांसाठी केलं निलंबित, काय आहे प्रकरण?
Dasara Melava 2024 : भगवानगडावर पंकजा मुंडे की नारायण गडावर मनोज जरांगे पाटील? कोणाच्या दसरा मेळाव्याला सर्वाधिक गर्दी?
भगवानगडावर पंकजा मुंडे की नारायण गडावर मनोज जरांगे पाटील? कोणाच्या दसरा मेळाव्याला सर्वाधिक गर्दी?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Suraj Chavan Meet Ajit Pawar : बिग बॉस विजेता सूरज चव्हाणने घेतली अजित पवार यांच्या भेटीलाABP Majha Headlines : 5 PM : 12 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सEknath Shinde Shiv Sena Dasara Melava 2024 : आझाद मैदानावर एकनाथ शिंदेंच्या मेळाव्याची जय्यत तयारीSayaji Shinde EXCLUSIVE : आधी शरद पवारांनी बोलावलं असतं तर तिकडे गेलो असतो

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Samarjeetsinh Ghatge on Hasan Mushrif : निष्ठा विकल्याने झोप येत नाही, कागलचे नाव बदनाम करण्याचा ठेका घेतला; समरजित घाटगेंचा हसन मुश्रीफांवर जोरदार पलटवार
निष्ठा विकल्याने झोप येत नाही, कागलचे नाव बदनाम करण्याचा ठेका घेतला; समरजित घाटगेंचा हसन मुश्रीफांवर जोरदार पलटवार
Konkan Sea Bridge: विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी कोकणातील 7 पूलांचे भूमिपूजन, 8000 कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प
विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी कोकणातील 7 पूलांचे भूमिपूजन, 8000 कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प
Congress Action: अजित पवारांच्या पक्षात जाण्याच्या चर्चा असलेल्या 'त्या' आमदारावर काँग्रेसची कारवाई! सहा वर्षांसाठी केलं निलंबित, काय आहे प्रकरण?
अजित पवारांच्या पक्षात जाण्याच्या चर्चा असलेल्या 'त्या' आमदारावर काँग्रेसची कारवाई! सहा वर्षांसाठी केलं निलंबित, काय आहे प्रकरण?
Dasara Melava 2024 : भगवानगडावर पंकजा मुंडे की नारायण गडावर मनोज जरांगे पाटील? कोणाच्या दसरा मेळाव्याला सर्वाधिक गर्दी?
भगवानगडावर पंकजा मुंडे की नारायण गडावर मनोज जरांगे पाटील? कोणाच्या दसरा मेळाव्याला सर्वाधिक गर्दी?
Nashik Crime : हत्याराचा धाक दाखवून मित्राला बेदम मारहाण, वाचवायला गेलेल्या भावाच्या डोक्यात कोयत्याने केला वार, नाशिकमध्ये खळबळ
हत्याराचा धाक दाखवून मित्राला बेदम मारहाण, वाचवायला गेलेल्या भावाच्या डोक्यात कोयत्याने केला वार, नाशिकमध्ये खळबळ
Pankaja Munde: छत्रपती घराण्याचं गोपीनाथ मुंडेंवर प्रेम; उदयनराजेंच्या घरात पाहिलेल्या 'त्या' फोटोचा पंकजा मुंडेंनी सांगितला किस्सा!
छत्रपती घराण्याचं गोपीनाथ मुंडेंवर प्रेम; उदयनराजेंच्या घरात पाहिलेल्या 'त्या' फोटोचा पंकजा मुंडेंनी सांगितला किस्सा!
सयाजी शिंदेंनी गुलीगत धोका दिलाय; राष्ट्रवादी प्रवेशावर सुषमा अंधारेंची टीका, आता अभिनेत्याचा पलटवार
सयाजी शिंदेंनी गुलीगत धोका दिलाय; राष्ट्रवादी प्रवेशावर सुषमा अंधारेंची टीका, आता अभिनेत्याचा पलटवार
Gulabrao Patil : संजय राऊत म्हणजे 'हम तो डुबेंगे सनम, तुझको भी ले डुबेंगे'; गुलाबराव पाटलांचा पलटवार
संजय राऊत म्हणजे 'हम तो डुबेंगे सनम, तुझको भी ले डुबेंगे'; गुलाबराव पाटलांचा पलटवार
Embed widget