विजय शिवतारे पुरंदरच्या भूमीत जन्माला आलेला दिलेर खान; बार्गेनिंग पॉवर वाढवून पाच-पन्नास लाख रुपये मिळवण्याचा प्रयत्न ; अमोल मिटकरींचे जोरदार प्रत्युत्तर
Amol Mitkari on Vijay Shivtare : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संपूर्ण महाराष्ट्रात ग्रामीण दहशतवाद पोसला. सर्व यंत्रणांवर त्यांनी कब्जा केलाय.
Amol Mitkari on Vijay Shivtare : "राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संपूर्ण महाराष्ट्रात ग्रामीण दहशतवाद पोसला. सर्व यंत्रणांवर त्यांनी कब्जा केलाय. पवाररुपी झुंडशाही आणि हुकूमशाही संपवण्यासाठी मी धर्मयुद्ध स्वीकारले आहे", शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केली होती. विजय शिवतारेंच्या (Vijay Shivtare) या टीकेला अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
अमोल मिटकरी काय म्हणाले?
विजय शिवतारेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना अमोल मिटकरी म्हणाले, विजय शिवतारे (Vijay Shivtare) हा पुरंदरच्या भूमीत जन्माला आलेला दिलेर खान आहे. याला मातीत गाडल्याशिवाय जनता शांत बसणार नाही. शिवतारे यांची फडफड हे विझत असलेल्या दिव्यासारखी आहे. केवळ बार्गेनिंग पॉवर वाढवून पाच-पन्नास लाख रुपये गोळा करण्याचा सध्या ते प्रयत्न करत आहेत, असा आरोपही अमोल मिटकरी यांनी केला. शिवतारे यांच्या मागे इतर व्यक्तींचा मेंदू आहे. त्याचा तपास आम्हाला करावा लागेल. थोड्या पैशांसाठी बार्गेनिंग पॉवर वापरायची आणि कोणत्यातरी पक्षाकडून 5-25 लाख घ्यायचे. यासाठी त्यांची तडफड सुरु आहे, असंही अमोल मिटकरी म्हणाले.
तुकाराम महाराजांचा शिवतारेंवर अभंग आहे
शिवतारे बालीश वक्तव्य करत आहेत. त्यांचा राजकीय अंत जवळ आला आहे. त्यांच्या बैठकीला कोणीही किंमत दिलेली नाही. तुकाराम महाराजांचा शिवतारेंवर (Vijay Shivtare) अभंग आहे. विंचवाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी. विंचवाच्या नांगीमध्ये विष असतं. तसा विषारी प्रवृत्तीचा व्यक्ती म्हणजे विजय शिवतारे आहे. तुमच्या भागातील मतदार मुरारबाजीच्या भूमिकेत आहेत, असंही अमोल मिटकरी यांनी सांगितले. मोठ्या व्यक्तीचा वरदहस्त आहे. त्याच्या शिवाय हे बोलू शकत नाहीत. कदाचित ती व्यक्ती सत्तेतील असू शकते किंवा सत्तेच्या बाहेरही असू शकते. शिवतारे यांनी अजितदादांवर बोलावे एवढी त्यांची औकात नाही. पण आज त्यांनी पातळी सोडून अकलेचे तारे तोडले आहेत.
विजय शिवतारे हा मनोरुग्ण आहे
अमोल मिटकरींनंतर अजित पवार गटाचे नेते सूरज चव्हाण यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. विजय शिवतारे (Vijay Shivtare) हा मनोरुग्ण आहे. त्यामुळे सरकारने आता शिवतारे याला पोलीस संरक्षणासोबतच एक डॉक्टर देखील द्यावा कारण मनोरुग्न व्यक्ती समाजाला घातक असतो, अशी टीका चव्हाण यांनी केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Raj Thackeray : साहेब तुम्हीच नाशिकमधून निवडणूक लढा! राज ठाकरेंना मनसैनिकांकडून गळ