सेनापतीच गळपटला तर सैन्यांनी लढायचं कसं ? अमोल कोल्हेंचा अजितदादांसह धनंजय मुंडेंवर हल्लाबोल
Amol Kolhe on Dhananjay Munde, Beed : "चार दिवस सासूचे आणि चार दिवस सुनेचे असे म्हणतात, मात्र इथे साडेबावीस वर्ष अजितदादा सत्तेत होते. फक्त दोनदा विरोधात होते. त्यामुळे 66% सत्तेत आणि 33 टक्के विरोधात अशी दादांची कारकीर्द राहिलेली आहे."
Amol Kolhe on Dhananjay Munde, Beed : "चार दिवस सासूचे आणि चार दिवस सुनेचे असे म्हणतात, मात्र इथे साडेबावीस वर्ष अजितदादा सत्तेत होते. फक्त दोनदा विरोधात होते. त्यामुळे 66% सत्तेत आणि 33 टक्के विरोधात अशी दादांची कारकीर्द राहिलेली आहे. आता पराभव समोर दिसत असल्याने की महायुतीत दादांची घुसमट होतेय. यामुळे दादांना निवडणुकीत रस वाटेनासा झालाय का? असा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडलाय. आदरणीय पवार साहेबांच बोट सोडण्याचा निर्णय घेतला त्यांची मला मला जास्त चिंता वाटते. सेनापतीच गळपटला तर सैन्यांनी लढायचं कसं असा प्रश्न त्यांच्या लोकांना पडला आहे", असं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) म्हणाले. बीडमधील पत्रकार परिषदेत त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह (Ajit Pawar) मंत्री धनंजय मुंडेंवर जोरदार टीका केली.
बीड शहराला वीस दिवसाला पाणीपुरवठा होत असेल तर याला विकास म्हणायचा का?
अमोल कोल्हे म्हणाले, विकास काही दिसत नाही. बीड शहराला वीस दिवसाला पाणीपुरवठा होत असेल तर याला विकास म्हणायचा का? विकासासाठी गेलो असल्याचं म्हणतात मग बीड जिल्ह्यातील किती तरुणांना रोजगार मिळाला? सत्ता येते जाते भूमिका घेतल्या जातात पण जनतेशी प्रामाणिकपणा राहिला पाहिजे. तरुणांच्या हाताला काम पाहिजे. या भाकरीचा प्रश्न सोडवण्यासाठी पालकमंत्री किती यशस्वी झाले त्याचा लेखाजोखा त्यांनी मांडावा. बीडमधील शिवस्वराज यात्रेदरम्यान कोल्हे माध्यमांशी बोलत होते.
मग जेव्हा पक्ष पळवला चिन्ह पळवलं त्यावेळी हे मन कुठे गेलं होतं?
सुनेत्रा पवारांना लोकसभेत उभे करणे ही चूक होती असं विधान अजित पवार यांनी केलं. यावर अमोल कोल्हे म्हणाले, त्यावेळी असे घडायचं नव्हतं असं कुणाचं मन सांगतं होत, मग जेव्हा पक्ष पळवला चिन्ह पळवलं त्यावेळी हे मन कुठे गेलं होतं? असा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडला आहे. अमोल कोल्हे पुढे बोलताना म्हणाले, उद्धव ठाकरे यांना चाहता वर्ग आहे. लोकसभा निवडणुकीत सुद्धा मॅन ऑफ द मॅच प्रचाराच्या बाबतीत होते. उद्धव ठाकरे प्रचार प्रमुख असतील तर महाविकास आघाडीला आणखी बळकटीने निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी चांगली गोष्ट आहे.
इतर महत्वाच्या बातम्या