एक्स्प्लोर

Ajit Pawar: 'मला मुख्यमंत्री व्हायचे आहे, पण उपमुख्यमंत्रीपदावरच...', अजित पवारांचं मोठं वक्तव्य

Ajit Pawar on CM Post : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी राज्याचा मुख्यमंत्री होण्याबाबतच आपली इच्छा अनेकदा बोलून दाखवली आहे. त्यांनी एका कार्यक्रमावेळी बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे.

मुंबई: अनेकदा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्याचा मुख्यमंत्री होण्याबाबतच आपली इच्छा अनेकदा बोलून दाखवली आहे. अशातच अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा एकदा एका कार्यक्रमामध्ये बोलताना त्यांनी मुख्यमंत्री पदाबाबतची इच्छा बोलून दाखवत असताना मोठं वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा उघडपणे बोलून दाखवली. एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी सांगितले की, मला मुख्यमंत्री व्हायचे आहे, पण वारंवार उपमुख्यमंत्रीपदावर अडकतो. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यातील जागावाटपावरही भाष्य केलं आहे.

इंडिया टुडेच्या एका कार्यक्रमात अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, 'मला मुख्यमंत्री व्हायचे आहे, पण मी पुढेच जात नाही. मला संधी मिळत नाहीये. 2004 मध्ये राष्ट्रवादीला मुख्यमंत्री करण्याची संधी होती, पण पक्षाने ती गमावली, असेही ते म्हणाले. विशेष म्हणजे 2004 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद काँग्रेसच्या खात्यात आले.

2004 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. त्यावेळी पक्षाला 71 जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेस 69 जागांवर विजय मिळवत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर काँग्रेस नेते विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले. देशमुख यांचे2012 मध्ये निधन झाले.

जागावाटपाचा फॉर्म्युला अजित पवार यांनी केला स्पष्ट

2019 मध्ये पक्षाने जिंकलेल्या जागांच्या आधारे जागावाटप केले जाईल, असे अजित यांनी कार्यक्रमात बोलताना सांगितले. ते म्हणाले, 'भाजप 2019 मध्ये जिंकलेल्या जागांवर निवडणूक लढवेल. राष्ट्रवादी आणि शिवसेनेचेही तेच होईल. अशा स्थितीत 200 जागांवर जागावाटपाचा फॉर्म्युला स्पष्ट झाला आहे. उर्वरित 88 जागांवर महायुतीत चर्चा केली जाईल.

2019 महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

2019 मध्ये अविभाजित राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेससोबत आघाडी करून निवडणूक लढवली होती. त्याच वेळी भाजप आणि नंतर अविभक्त शिवसेना एकत्र होते. 2019 मध्ये भाजपने 164 जागा लढवल्या आणि 105 जागा जिंकल्या. तर शिवसेनेने 126 पैकी 56 जागा जिंकल्या. त्यानंतर राष्ट्रवादी 54 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला तर काँग्रेसला 44 जागा मिळाल्या.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीवर सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीने पक्षाचे 2 गट निर्माण झाले. त्यानंतर खरी राष्ट्रवादी कोणाची असा प्रश्न निर्माण झाला. यासंबधी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना खासदार सुप्रिया सुळे  (Supriya Sule) म्हणाल्या, जर मागितलं असतं तर सर्व दिलं असतं, पक्ष हिसकावण्याची गरज नव्हती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अजित पवार (Ajit Pawar) यांना पक्षात ठेवायचं होतं, परंतु त्यांनीच आमचं आयुष्य अस्त व्यक्त करत सोडून जाण्याचा निर्णय घेतला असं विधान खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केले आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : ABP MajhaCentral Department On Bangladeshiबांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाईचे महाराष्ट्र सरकारला आदेशBird flu Maharashtra | राज्यात बर्ड फ्ल्यूने पोल्ट्री व्यावसायिकांचं वाढवलं टेंशन Special ReportSpecial Report Walmik Karadवाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयीन कोठडीचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Embed widget