Ajit Pawar vs Yugendra Pawar : पवार कुटुंब लोकसभेनंतर विधानसभेलाही आमने-सामने येणार, बारामतीकरांचा कौल कोणाकडे?
Ajit Pawar vs Yugendra Pawar : लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीतही पवार कुटंब आमने सामने येणार आहे. बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत होण्याची शक्यता आहे.
Baramati Assembly Election : बारामती म्हटलं की पवार आणि पवार म्हटलं की बारामती ते गेल्या सहा दशकातलं राज्यातलं समीकरण आहे. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आणि आता बारामती कोणाची यावरती लढाई सुरू आहे.
पवार कुटुंब राजकारणात जरी एकसंघ असलं तरी त्यात दुभंगलेला आहे. त्याच्यामुळे ही निखराची लढाई बारामतीकरांसाठी जशी अवघड आहे तशी पवारांसाठी देखील. लोकसभेला सुनेत्रा पवारांचा पराभव झाला आणि त्यानंतर आता विधानसभेला अजित पवारांनी न लढण्याचे ठरवलं होतं. मात्र कार्यकर्त्यांच्या रेट्यापुढे अजित पवारांनी लढण्याचा निर्णय घेतला असल्याचं कार्यकर्ते सांगतात..
अजित पवारांच्या समोर त्यांचा सख्खा पुतण्या युगेंद्र पवार निवडणुकीच्या रिंगणात असणार असल्याची चर्चा जोर धरते आहे. तशी मागणी देखील कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात केली आहे.
लोकसभेला संपूर्ण पवार कुटुंब एका बाजूला आणि अजित पवारांचे कुटुंब एका बाजूला अशी परिस्थिती होती. परंतु काही दिवसापूर्वी अजित पवारांनी घेतलेल्या मेळाव्यात लोकसभेला सगळे पवार माझ्या विरोधात होते. परंतु आता काही पवार माझ्या बाजूने असतील असं वक्तव्य केलं होतं. यालाच धरून श्रीनिवास पवार यांनी मला बघायचं आहे. नेमके कोणते पवार दादांच्या बाजूने आहेत, असा खोचक टोला देखील लगावला होता.
लोकसभेला सुप्रिया सुळे आणि विधानसभेला अजित पवारांना मतदान करण्याचा बारामतीकरांचा शिरस्ता राहिलाय. राष्ट्रवादी तुम्ही फूट पडली आणि त्यानंतर अजित पवारांनी स्वतःच्या पत्नीला तिकीट दिलं तरी सुप्रिया सुळे यांचा विजय झाला. आता विधानसभेला काय होत हे महत्वाचे आहे.गेल्या अनेक वर्षापासून निवडणूक कोणतीही असो पवारांच्या सांगता सभेचे ठिकाण ठरलेलं मात्र यंदा हे मिशन हायस्कूल ठिकाण कोण मिळवतो याकडे सर्वांचे लक्ष लागले.
आजपर्यंत बारामतीतला पवारांचा विजय खूप सोपा होता. शरद पवार किंवा अजित पवार भरल्यानंतर थेट सांगता सभेला आणि त्यांचा उमेदवार निवडून यायचा. परंतु कुटुंबातच दोन गट झाल्याने आता कार्यकर्त्यांसह नेत्यांची देखील कसोटी असणार आहे.
लोकसभेनंतर युगेंद्र पवार जय पवार बारामतीमध्ये कमालीचे ऍक्टिव्ह झालेत. यांच्यासह सुनेत्रा पवार आणि शर्मिला पवार बारामती मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी खेळ पैठणीच्या माध्यमातून महिलांचे मेळावे घेत आहेत. यावरून अजित पवारांनी देखील काही दिवसापूर्वी असते पण असं म्हणत एक वक्तव्य केले होते. तसेच आजपर्यंत कुठलेच पवार घरी येत नव्हते. परंतु आता पवार कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचू लागलेत, असा टोला अजित पवारांनी लगावला होता..
लोकसभेला काकांनी पुतण्याला आसमान दाखवलं. आता पुतण्याच्या विरोधात त्याचाच पुतण्या विधानसभेत दंड ठोकून उभा असण्याची शक्यता आहे. जरी लोकसभेला सुप्रिया सुळे यांना बारामती विधानसभा मतदारसंघातून 48 हजारांचे लीड असलं. तरी आगामी विधानसभेत अजित पवारांचे पारडे जड असले तरी कोण बाजी मारत हे पाहणं महत्त्वाचं आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
संभाजीराजेंच्या तिसऱ्या आघाडीचे 8 उमेदवार जाहीर, बच्चू कडू अचलपूरमधून; सांगलीत 2 उमेदवार