एक्स्प्लोर

फोन करुन अजित पवारांना अडचणीत आणणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल; सरकारी कामात अडथळा

गावातील मुरूस उपसा करताना अडवणूक केल्यानंतर येथील एका कार्यकर्त्याने थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोन लावून कारवाई थांबविण्याची विनंती केली होती.

सोलापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिस्तप्रीय नेते म्हणून ओळख असलेल्या अजित पवारांनी (Ajit pawar) एका महिला पोलीस अधिकाऱ्यास फोनवरुन दादागिरी केली. अजित पवारांच्या या संवादाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, माध्यमांत हे वृत्त झळकल्यानंतर आता संबंधित गावातील शेतकरी आणि फोन लावणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्यामुळे, अखेर अजित दादांना अडचणीत आणणाऱ्या कुर्डू (Solapur) येथील 15 ते 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचं दिसून आलं. त्यामध्ये, बाबा जगताप, नितीन माळी, संतोष कापरे, अण्णा धाणे यांच्यासह 15 ते 20 ग्रामस्थांचा समावेश असून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी, ग्राम महसूल अधिकारी प्रीती शिंदे यांनी फिर्याद दिली आहे.

गावातील मुरूस उपसा करताना अडवणूक केल्यानंतर येथील एका कार्यकर्त्याने थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोन लावून कारवाई थांबविण्याची विनंती केली होती. त्यावेळी, अजित पवारांनीही फोनवरुन संबंधित महिला अधिकाऱ्यास कारवाई थांबवा, मी तुम्हाला आदेश देतो असे म्हणत दादागिरीची भाषा केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामुळे, अजित पवारांवर टीकेची झोड उठल्याने आता संबंधित ग्रामस्थांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. कुर्डूवाडी पोलीस ठाणे गु.र.नं 371/2025 बी.एन.एस.चे कलम 303(2),3(5) व पर्यावरण संरक्षण अधिनियम 9.15 प्रमाणे फिर्यादी-प्रीती प्रकाश शिंदे वय 27 वर्ष धंदा नोकरी (ग्राम महसूल अधिकारी कुर्डू) रा. मोडनिंब ता. माढा जिल्हा सोलापूर यांनी याबाबत तक्रारदाखल केली आहे.

कुर्डूतील श्री दादाराव गोरख माने यांची शेती गट नंबर 575/1 मधील 0.20 आर जमिनीमधील अंदाजे 120 ब्रास मुरूम रक्कम अंदाजे 72,000 हजार रुपये, बाहेर काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी संगणमत करुन तहसीलदार माढा यांची कोणतीही परवानगी न घेता पर्यवरणाचा ऱ्हास करुन मौजे कुर्ड शेती गट नंबर 575/1 मधील शेतकरी श्री दादाराव गोरख माने यांच्या मालकीचे 0.20 आर. जमीनमधील अंदाजे 120 ब्रास मुरुम प्रति ब्रास 600/- रुपये प्रमाणे एकूण 72,000/- रुपयांचा मुरुम अवैद्यरित्या उत्खनन करन चोरी केल्याची तक्रार दाखल झाली आहे. याशिवाय जमाव जमवून सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय

माढ्याच्या कुर्डू गावात रस्त्यासाठी मुरुम उत्खनन होत असल्याची तक्रार आल्यानुसार करमाळ्याच्या पोलिस उपअधिक्षक अंजना कृष्णा या घटनास्थळी पोहचल्या. मुरुम उचलण्याच्या मुद्यावरुन कुर्डू गावातील नागरीक आणि अंजली कृष्णा यांच्यामध्ये शाब्दिक जुगलबंदी रंगली. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबा जगताप या कार्यकर्त्याने थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोन लावून अंजली कृष्णा यांच्या हातात दिला. मात्र त्यांना अजित पवार आणि त्यांचा आवाज ओळखता आला नाही. तिकडून अजित पवार दोनदा सांगताना दिसले की डीसीएम अजित पवार बोल रहा हूं. ये कार्यवाही बंद करो...मेरा आदेश हैं.. त्यावर कृष्णा म्हणतात मेरे फौन पर काॅल करें..त्यावर पवार म्हणताहेत..की तुम पे अॅक्शन लूंगा.. इतनी डेरिंग है तुम्हारी..मेरा चेहरा तो पेहचानोगा ना.. असे रागावून अजित पवार बोलले ... आणि अजित पवारांनी व्हिडीओ काॅल केला.

त्यावर कृष्णा बांधावरच जाऊन बसून पवारांशी बोलताना दिसल्या...यात अजित पवार कारवाई थांबवण्याचे आदेश देत असल्याचे पहायला मिळत असून...माझा फोन आलाय...तहसीलदारांना सांगा असे पवार सांगतात. घटनास्थळी हा प्रकार 3 तास चालू होता. अंजली कृष्णा आणि पवारांच्या संवादाच्या क्लिप व्हायरल झाला आहे. या प्रकरणी पोलिसांकडे कसलीही तक्रार अथवा गुन्हांची नोंद झालेली नाही. काल दुपारी हा सर्व प्रकार घडला. अवैध मुरूम उपसा सुरू असताना आयपीएस महिला अधिकाऱ्याने तेथे धाड टाकून कारवाई सुरू केली असता अजितदादांच्या कार्यकर्त्यांनी थेट दादांना फोन लावून दिला होता. वास्तविक ग्रामपंचायतच्या परवानगीने मुरूम उपसा होत असल्याची भूमिका ग्रामस्थांची होती, मात्र कोणतीही ग्रामपंचायत अथवा कागदपत्र सादर न झाल्याने महिला आयपीएस अधिकाऱ्याने कारवाई केली होती. दरम्यान, करमाळ्याच्या पोलिस उपअधिक्षक अंजली कृष्णा यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोनवरुन ओळखता आले नाही. त्यानंतर रागावलेल्या अजित पवारांनी अंजली कृष्णा यांना खडेबोल सुनावत थेट व्हिडीओ कॉलच केला होता.

हेही वाचा

बेकायदा मुरुम उपशाला पाठबळ, लाडक्या बहि‍णींचा भाऊ म्हणणारे अजित दादा धटींगशाही करतात; शेतकरी संघटना आक्रमक

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल

व्हिडीओ

Zero Hour Full EP :निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा वारेमाप वापर होतोय, विरोधकांचा आरोप पटतो? सखोल चर्चा
Akola Police : घर सोडून गेलेल्या मुलाला अकोला पोलिसांनी कसं शोधलं Special Report
Ambadas Danve Viral Video : कुणाचे खोके, नोटांचे कोण राजकीय बोके? Special Report
Phaltan Lady Doctor Case : फलटण डॉक्टर महिलेने स्वत:च जीवन संपवलं Special Report
Ram Shinde Vs Rohit Pawar : राम शिंदे विरूद्ध रोहित पवार वादाचा भाग तिसरा Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
Embed widget