धक्कादायक! रेल्वेनं प्रवास करणाऱ्या युवकाचा तोल गेला अन् थेट खाडीत पडला, मुलुंड ते कळवा दरम्यान घडली घटना
ठाण्यात (Thane) एक धक्कादायक घटना घडली आहे. रेल्वेने प्रवास करणाऱ्या एका युवकाचा तोल गेल्यानं तो थेट विटावा खाडीत पडल्याची घटना घडली आहे.
ठाणे : ठाण्यात (Thane) एक धक्कादायक घटना घडली आहे. रेल्वेने प्रवास करणाऱ्या एका युवकाचा तोल गेल्यानं तो थेट विटावा खाडीत पडल्याची घटना घडली आहे. हा युवक मुलुंड ते कळवा दरम्यान रेल्वेने प्रवास करत होता. मात्र, विटावा खाडी जवळ ट्रेन येतात त्याचा तोल गेला आणि तो थेट खाडीत पडला आहे. 19 वर्षाचा हा युवक कळव्यातील, गोलाईनगर येथे राहणार आहे.
2 बोटींच्या सहाय्याने युवकाचा शोध सुरु
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच युवकाचा शोध घेण्यासाठी अग्निशमाक दलाचे जवान जवान आणि, आपत्ती दलाचे जवान तसेच स्थानिक मच्छीमार घटनास्थली दाखल झाले आहेत. 2 बोटींच्या सहाय्याने युवकाचा शोध घेण्याचं काम सुरु आहे. मात्र अंधार पडल्यानं आता शोध थांबवण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या:
Mumbai News: गोरेगावमधील मित्रांच्या ग्रुपची 'ती' पिकनिक अखेरची ठरली, वसईच्या चिंचोटी धबधब्यातील डोहात दोघे बुडाले, गळ टाकून मृतदेह बाहेर काढले



















