एक्स्प्लोर

अजित पवारांची डोकेदुखी वाढली; 18 मतदारसंघात बंडखोरीची शक्यता, दिग्गजांच्याही मतदारसंघात फूट?

आगामी विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 19 विद्यमान आमदारांच्या विधानसभा मतदार संघामध्ये बंडखोरी होण्याची शक्यता दिसून येत आहे

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit pawar) कंबर कसली असून त्यांचा महाराष्ट्र दौरा सुरू होत आहे. महायुतीमध्ये जागावाटपापासून उमेदवार निवडून आणेपर्यंत त्यांना आता रणनीती आखायची आहे. मात्र, तत्पूर्वी जागावाटपात अधिकाधिक जागा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी अजित पवारांची कसरत होणार आहे. कारण, लोकसभेला (Loksabha) 48 पैकी केवळ 4 मतदारसंघात त्यांनी उमेदवार उभे केले होते. त्यापैकी, रायगड लोकसभा मतदारसंघातच त्यांना विजय मिळाला. त्यामुळे, आगामी विधानसभा (vidhansabha) निवडणुकांत त्यांना ताकद दाखवावी लागणार आहे. मात्र, महाविकास आघाडीतील शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सामोरे जाण्याचं आव्हान अजित पवारांसमोर आहेत. त्यातच, महायुतीतील (Mahayuti) जागावाटपानंतर तब्बल 18 मतदारसंघात बंडखोरी होण्याची शक्यता प्रथमदर्शनी दिसून येत आहे. त्यामुळे, अजित पवारांनी डोकेदु:खी वाढणार आहे. 

आगामी विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 18 विद्यमान आमदारांच्या विधानसभा मतदार संघामध्ये बंडखोरी होण्याची शक्यता दिसून येत आहे. त्यामध्ये, सध्या राष्ट्रवादी अजित पवार यांच्याकडे असलेल्या आमदारांच्या, काही मंत्र्‍यांच्या मतदारसंघातही बंडखोरीची शक्यता आहे. कारण, मंत्री हसन मुश्रीफ, आमदार नरहरी झिरवळ, आमदार सुनिल शेळकर, सुनिल टिंगरे यांच्या मतदारसंघात बंडखोरीची शक्यता आहे. यांसह राज्यातील विधानसभेच्या एकूण 18 मतदारसंघात महायुतीतील जागावाटपावरुन खटका उडू शकतो. या 18 मतदारसंघात बंडखोरीचा सामना होणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे, अजित पवार आपल्या आमदारांना तिकीट देण्यात किंवा त्यांची नाराजी दूर करण्यात किती सरस ठरतात हे पुढील काही दिवसांतच दिसून येईल. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मावळ,दिंडोरी,कागल,इंदापूर,वडगाव शेरी, आष्टी,कोपरगाव, अहेरी,अकोले,पूसद,जुन्नर,वाई या मतदार संघात महायुतीमध्ये सध्या धुसफूस सुरू आहे. महायुतीमधील अनेक नेते हे निवडणुकीच्या काळात महाविकास आघाडीच्या गळाला लागण्याची शक्यता आहे. कारण, जागावाटपात भाजपचं पारडं जड असून अनेक मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षातील आमदारांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता आहे. या बंडखोरीच्या शक्यतेमुळे महायुतीमधील पक्षांच्या प्रमुख नेत्यांची डोकेदुखी वाढणार आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महायुतीमधील वादातीत 18 मतदारसंघ कोणते?

दिंडोरी- नरहरी झिरवाळ विरुद्ध शिवसेना माजी आमदार धनराज महाले- 

कागल- हसन मुश्रीफ विरुद्ध समरजीत घाटगे (भाजप)

चंदगड- राजेश पाटील विरुद्ध शिवाजी पाटील (भाजप )

मावळ- सुनील शेळके विरुद्ध भाजपचे माजी मंत्री बाळा भेगडे

इंदापूर- दत्तामामा भरणे विरुद्ध हर्षवर्धन पाटील

वडगाव शेरी- सुनील टिंगरे विरुद्ध जगदीश मुळीक (भाजप)

हडपसर- चेतन तुपे विरुद्ध महादेव बाबर (शिवसेना शिंदे)

आष्टी- बाळासाहेब आजबे विरुद्ध सुरेश धस (भाजप)

कोपरगाव- आशुतोष काळे विरुद्ध विवेक कोल्हे (भाजप)

अर्जुनी मोरगाव- मनोहर चंद्रिकापुरे विरुद्ध माजी मंत्री राजकुमार बडोले (भाजप)

अहिरी- धर्मरावबाबा अत्राम विरुद्ध अमरिश राजे (भाजप)

पुसद- इंद्रनील नाईक विरुद्ध भाजप आमदार नीलय नाईक

अकोले- किरण लहामटे विरुद्ध वैभव पिचड (भाजप)

येवला- छगन भुजबळ विरुद्ध अमृता पवार (भाजप)

अमळनेर- अनिल पाटील विरुद्ध माजी आमदार शिऱिष चौधरी (भाजप)

सिंदखेड राजा- राजेंद्र शिंगणे विरुद्ध शशिकांत खेडेकर (शिवसेना)

जुन्नर- अतुल बेनके विरुद्ध शरद सोनवणे (शिंदे)

वाई- मकरंद पाटील विरुद्ध मदन भोसले (भाजप)

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mamata Bannerjee: मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
Sanjay Raut: सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
Ajit Pawar : अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 12 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सKavita Raut : धावपटू कविता राऊत मिळालेल्या नियुक्तीवर नाराजSpecial Report Nitesh Rane : मुस्लिमांसोबत व्यवहार करू नका, नितेश राणेंनी गरळ ओकलीSpecial Report PM Modi : पंतप्रधान मोदींनी घेतलं सरन्यायाधीशांच्या घरच्या बाप्पाचं दर्शन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mamata Bannerjee: मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
Sanjay Raut: सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
Ajit Pawar : अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
Ganeshotsav : जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
Sitaram Yechury आयुष्यभर कष्टकऱ्यांसाठी झिजले, मृत्यूनतंरही समाजाच्या कामी आले; सिताराम येचुरींचे 'देहदान'
आयुष्यभर कष्टकऱ्यांसाठी झिजले, मृत्यूनतंरही समाजाच्या कामी आले; सिताराम येचुरींचे 'देहदान'
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
निरोप कॉम्रेड...  कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
निरोप कॉम्रेड... कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
Embed widget