Ajit Pawar on Nilesh Lanke : निलेशला मीच पक्षात आणलं, त्याला प्रचंड निधीही दिला, पण.... अजित पवारांनी मनातली खदखद बोलून दाखवली
Ajit Pawar on Nilesh Lanke : अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी आज (दि.14) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षात प्रवेश केला. आम्ही सुरुवातीपासूनच पवारांच्या विचारांचे आहोत, असं निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी स्पष्ट केलं
Ajit Pawar on Nilesh Lanke : अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी आज (दि.14) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षात प्रवेश केला. आम्ही सुरुवातीपासूनच पवारांच्या विचारांचे आहोत, असं निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, आता अजित पवारांनी निलेश लंकेंच्या (Nilesh Lanke) प्रवेशाबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. "वास्तविक निलेशला पक्षात मी घेतल. निलेशला मनापासून आधार दिला. विकास कामांसाठी मी त्याला प्रचंड निधी दिला होता", असं अजित पवार म्हणाले. ते बारामती येथे बोलत होते.
अजित पवार म्हणाले, निलेश लंके (Nilesh Lanke) जाऊ शकत नाही. त्याला जायचं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा द्यावा लागेल. त्याच्यामुळे राजीनामा देऊन कोणालाही कोठेही जाता येतं. वास्तविक निलेशला पक्षात मी घेतल. निलेशला मनापासून आधार दिला. विकास कामांसाठी मी त्याला प्रचंड निधी दिला होता. कालच माझ्याकडे तो आला होता. काही गोष्टी त्याला मी नीट समजून सांगितल्या. मात्र, काही लोकांनी त्याच्या डोक्यात हवा घातलेली आहे की, तू खासदार होशील. मात्र, अस काहीही नाही.
शरद पवार गटात प्रवेश करताना निलेश लंके काय म्हणाले?
निलेश लंके (Nilesh Lanke) म्हणाले, कोरोना काळात पती त्याच्या पत्नीला विसरला. भाऊ भावाला विचारत नव्हता. त्या काळात मी पवार साहेबांच्या नावाने आरोग्य मंदिर सुरु केले. आरोग्य मंदिराच्या माध्यमातून 31 हजार लोकांवर उपचार करता आले. पवार साहेबांची अदृश्य ताकद माझ्यासोबत होती. या घटना मी आयुष्यात कधीही विसरु शकणार नाही. मी साहेबांना कधीही सोडून गेलेलो नव्हतोच, असंही लंके यांनी स्पष्ट केलं.
मी लोकसभेसाठी कोणतीही चर्चा केलेले नव्हती
पुढे बोलताना लंके म्हणाले, मी शरद पवारांची भेट घ्यायला आलो ते खासदारकीची आशा आहे म्हणून नाही. मी काल देखील साहेबांच्या विचारांचा होतो आणि आजही त्यांच्याच विचारांचा आहे. इथे येण्यापूर्वी मी लोकसभेसाठी कोणतीही चर्चा केलेले नव्हती. मी शरद पवार साहेबांच्या आशीर्वादाने अद्ययावात सुविधा असलेली रुग्णवाहिका सुरु करणार आहे. आज माझ्यासोबत अहमदनगर आणि पारनेरमधील अनेक सहकारी उपस्थित आहेत, त्यांचेही मी आभार मानतो, असंही लंके यावेळी म्हणाले होते.
इतर महत्वाच्या बातम्या