एक्स्प्लोर

आता कोण कोणाला ढेकूण म्हणत आहेत, एकमेकांचे कपडे काढायचं बाकी ठेवतात; ठाकरे-फडणवीसांच्या वादावर अजितदादांची प्रतिक्रिया

Ajit Pawar on Uddhav Thackeray, Pune : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यात घेतलेल्या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला होता.

Ajit Pawar on Uddhav Thackeray, Pune : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यात घेतलेल्या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला होता. "एकतर तू राहशील नाहीतर मी राहीन", अस म्हणत ठाकरेंनी फडणवीसांना ललकारलं होतं. शिवाय ठाकरेंनी फडणवीसांचा ढेकून म्हणून उल्लेख केला होता. दरम्यान, ठाकरे फडणवीसांच्या वादावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते सांगवी येथील भाषणात बोलत होते. 

अजित पवार काय काय म्हणाले? 

अजित पवार म्हणाले, मी महाराष्ट्र दौऱ्यावर निघालो आहे. मी फक्त विकासाच्या मुद्द्यावर बोलणार आहे. फाफट पसारा सांगणार नाही, पण आता कोण कुणाला ढेकूण म्हणत आहेत. एकमेकांचे कपडे काढायचं बाकी ठेवतात. सत्ताधारी आणि विरोधकांनी लक्ष घालण्याची गरज आहे. पाच ते सहा वेळा एफआरपी वाढला पण MSP वाढला नाही. 40 रुपयापर्यंत साखरेचे दर करून द्या, अशी मागणी आम्ही केली आहे. वाढवणजवळ आम्ही विमानतळ करणार आहोत.

लोकांचे कसे नुकसान होणार नाही याची खबरदारी घेतो

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, बेरोजगारी कशी कमी होईल यासाठी प्रयत्न करतोय. काही प्रकल्प बाहेर राज्यात जाणार होते ते आम्ही परत आणले. शिक्षणात आम्ही काय बदल करू पाहतोय. काही तज्ज्ञांची नेमणूक केली आहे. शिक्षण घेतल्यावर त्याला त्याचा फायदा होईल असा आमचा प्रयत्न आहे. पाऊस पडतो आहे, मी अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. उजनी धरण 90 टक्के भरले आहे. नदी काठी आम्ही लक्ष देऊन आहोत. लोकांचे कसे नुकसान होणार नाही याची खबरदारी घेतो. डॉक्टर आणि कर्मचारी यांचे हे निवासस्थान इथे होणार आहे. खूप मोठा निधी केंद्र आणि राज्य सरकार कडून आणतो आहे. 

एका वर्षानंतर शेतकऱ्यांना दिवसा लाईट देण्याचा आमचा प्रयत्न

लाडकी बहिण योजना सगळ्या महिलांसाठी आहे. फक्त त्यांचे उतपन्न अडीच लाखांच्या आत पाहिजे. शेतकऱ्यांचे वीज बिल माफ केलं. एका वर्षानंतर शेतकऱ्यांना दिवसा लाईट देण्याचा आमचा प्रयत्न आहे. काही जण आमच्यावर टीका करतात हा चुनावी जुमला आहे, पण हे खोटं आहे. इथे पाण्याचा प्रश्न आहे. दोन जिल्ह्याचे खराब पाणी येत. त्यासाठी आपण खराब पाणी रोखण्यासाठी प्रयत्न करतो आहे. मोठा निर्णय घ्यायचा म्हटलं तर कारखाने बंद करावे लागतील. परत तुम्ही माझ्यावर याल. सरकारमध्ये नसतो तर वीज माफी करता आली नसती, असंही अजित पवारांनी नमूद केलं. 

अनेक घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. दुधाला 5 रूपये अनुदान द्यायचा निर्णय घेतला आहे. आम्ही विद्यार्थी आणि विद्यार्थ्यना आधार लिंक केलं तर 5 लाख विद्यार्थी बोगस होते. दुधात भेसळ केली जाते. काहींनी सांगितले की या विरोधात कडक कायदा आणा. आम्ही फाशीची मागणी केली होती पण राष्ट्रपती यांनी मागणी मान्य केली नाही, असंही अजित पवारांनी सांगितलं. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Chhagan Bhujbal on Baban Shinde : शरद पवारांच्या भेटीसाठी बबनदादांनी 'मोदी बाग' गाठली, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

EPFO : ईपीएफओ सदस्यांसाठी गुड न्यूज, देशातील कोणत्याही बँकेतून पेन्शनची रक्कम मिळणार, 68 लाख पेन्शनर्सला फायदा
EPFO सदस्यांसाठी मोठी अपडेट, पेन्शनची रक्कम कोणत्याही बँकेतून काढता येणार, नवी प्रणाली लागू
Rohit Sharma :हिटमॅनचं टेस्ट करिअर संकटात, रोहित शर्मा सिडनी कसोटीतून बाहेर,रिषभ पंतची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
रोहित शर्मा पाचव्या कसोटीतून बाहेर, भारतीय संघातून पहिली प्रतिक्रिया, रिषभ पंत म्हणाला...
मोठी बातमी! बीडमध्ये CID ने डॉक्टरला उचललं; सरपंच हत्याप्रकरणातील 3 आरोपींना पळवण्यास मदत
मोठी बातमी! बीडमध्ये CID ने डॉक्टरला उचललं; सरपंच हत्याप्रकरणातील 3 आरोपींना पळवण्यास मदत
Fact Check : काँगोचा व्हिडीओ मुंबईतील बोट दुर्घटनेच्या असल्याचं सांगत शेअर, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर
काँगोचा व्हिडीओ मुंबईतील बोट दुर्घटनेच्या असल्याचं सांगत शेअर, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Graphic Designer to Rikshawala| नोकरी गेली पण कमलेश कामतेकरने हार मानली नाही Special ReportSpecial Report Dhananjay Munde:धनंजय मुंडेविरोधात वेगळी भूमिका,एसआयटी अहवालानंतर राजीनाम्याचा निर्णयSpecial Report Marathi vs Hindi:मुंब्रामध्ये मराठी हिंदी वाद, मराठी तरुणावंर परप्रांतीयांचा हल्लबोलZero Hour Nagpur Tree Cutting : नागपूर महापालिकेचे महामुद्दे कोणते? दहा वर्षात किती वृक्षतोड?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओ सदस्यांसाठी गुड न्यूज, देशातील कोणत्याही बँकेतून पेन्शनची रक्कम मिळणार, 68 लाख पेन्शनर्सला फायदा
EPFO सदस्यांसाठी मोठी अपडेट, पेन्शनची रक्कम कोणत्याही बँकेतून काढता येणार, नवी प्रणाली लागू
Rohit Sharma :हिटमॅनचं टेस्ट करिअर संकटात, रोहित शर्मा सिडनी कसोटीतून बाहेर,रिषभ पंतची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
रोहित शर्मा पाचव्या कसोटीतून बाहेर, भारतीय संघातून पहिली प्रतिक्रिया, रिषभ पंत म्हणाला...
मोठी बातमी! बीडमध्ये CID ने डॉक्टरला उचललं; सरपंच हत्याप्रकरणातील 3 आरोपींना पळवण्यास मदत
मोठी बातमी! बीडमध्ये CID ने डॉक्टरला उचललं; सरपंच हत्याप्रकरणातील 3 आरोपींना पळवण्यास मदत
Fact Check : काँगोचा व्हिडीओ मुंबईतील बोट दुर्घटनेच्या असल्याचं सांगत शेअर, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर
काँगोचा व्हिडीओ मुंबईतील बोट दुर्घटनेच्या असल्याचं सांगत शेअर, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर
धक्कादायक! महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात; DYSP सह शिवारात पोहोचलं पोलीस पथक आढळला
धक्कादायक! महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात; DYSP सह शिवारात पोहोचलं पोलीस पथक आढळला
Aashish Deshmukh : रॉयल्टी वाचवण्यासाठी आडमार्ग, आशिष देशमुखांनी वाळू माफियांना रंगेहात पडकलं
Aashish Deshmukh : रॉयल्टी वाचवण्यासाठी आडमार्ग, आशिष देशमुखांनी वाळू माफियांना रंगेहात पडकलं
Video: आळंदीत जिरेटोप हाती घेतला, नमन केलं, परत दिला; मुख्यमंत्री म्हणाले, मी महाराजांचा मावळा
Video: आळंदीत जिरेटोप हाती घेतला, नमन केलं, परत दिला; मुख्यमंत्री म्हणाले, मी महाराजांचा मावळा
Shirdi Saibaba: नववर्षाच्या सुरुवातीलच साईचरणी कोट्यवधींचं दान, सोनं-नाणं, चेक, कॅश अन् ऑनलाईनही अर्पण
Shirdi Saibaba: नववर्षाच्या सुरुवातीलच साईचरणी कोट्यवधींचं दान, सोनं-नाणं, चेक, कॅश अन् ऑनलाईनही अर्पण
Embed widget