![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
अजित पवारांच्या जीआरला सुप्रिया सुळेंचंही GR नेच उत्तर; पुण्यातील बैठकीत दादा-ताई आमनेसामने
शरद पवारांचा पिंपरी चिंचवडमध्ये विजयी संकल्प मेळावा पार पडतोय. एकेकाळी अजित पवारांचा बालेकिल्ला समजल्या पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवारांची तोफ धडाडली
![अजित पवारांच्या जीआरला सुप्रिया सुळेंचंही GR नेच उत्तर; पुण्यातील बैठकीत दादा-ताई आमनेसामने Ajit Pawar GR was also answered by Supriya Sule GR in DPDC meeting of pune; Dada-Tai face to face at a meeting in Pune अजित पवारांच्या जीआरला सुप्रिया सुळेंचंही GR नेच उत्तर; पुण्यातील बैठकीत दादा-ताई आमनेसामने](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/20/be7a5ff440250a98061354da151ea72417214870230251002_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे : पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेली पुणे जिल्हा नियोजन मंडळाची बैठक आज चांगलीच चर्चेत ठरली. कारण, खासदार शरद पवार (Sharad pawar) यांनी थेट या बैठकीला उपस्थिती दर्शवल होती, विशेष म्हणजे त्यांनी बारामतीमधील दूषित पाण्यासंदर्भाने प्रश्नही विचारला. तर, दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांनीही अजित पवारांना प्रश्न विचारले होते. मात्र, या दोन्ही खासदारांच्या प्रश्नावरुन अजित पवारांनी थेट जीआर काढूनच नियम दाखवला. त्यावरुन, आता सुप्रिया सुळे आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात शाब्दीक खडाजंगी होत असल्याचं दिसून येत आहे. कारण, अजित पवार यांच्या जीआरला सुप्रिया सुळेंनीही (Supriya sule) जीआरनेच उत्तर दिलंय. माझ्याकडेही जीआर आहे, त्यात प्रत्येक खासदार-आमदाराला ज्याला आमंत्रित केलेलं आहे, त्यांना बोलण्याचा अधिकार आहे, असा पलटवार सुप्रिया सुळे पालकमंत्र्यांवर केला.
शरद पवारांचा पिंपरी चिंचवडमध्ये विजयी संकल्प मेळावा पार पडतोय. एकेकाळी अजित पवारांचा बालेकिल्ला समजल्या पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवारांची तोफ धडाडली. मात्र, याच मेळाव्यातून आमदार रोहित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट अजित पवारांवर हल्लाबोल केला. शरद पवारांचा यंदा 85वा वाढदिवस आहे. त्यामुळं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांसह आम्ही सर्वांनी एक संकल्प केलाय. आपण 90 जागा लढवू अथवा किती ही जागा लढवू, आपले 85 आमदार निवडून आलेच पाहिजेत. फक्त विधानसभेतचं नव्हे तर महापालिकेत ही आपले 85 नगरसेवक निवडून यायलाचं हवेत,असे रोहित पवार यांनी म्हटले. तर, सुप्रिया सुळेंनी जीआरचा दाखल देता अजित पवारांवर प्रतिहल्ला केला.
''आज डीपीडिसी बैठक झाली. आज मी वडिलांकडून आणखी एक गोष्ट शिकले. जेंव्हा पालकमंत्री (अजित पवार ) आले तेंव्हा पवार साहेबांसह सगळे उभे राहिले. जी व्यक्ती पालकमंत्री होती, त्या पदाचा तो मान होता. स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचे हे विचार आहेत. याच बैठकीत मी आणि अमोल कोल्हे यांनी प्रश्न उपस्थित केले. त्यावेळी पालकमंत्री यांनी एक कागद काढला आणि त्यांनी खासदार-आमदारांबाबत मुद्दा मांडला. या बैठकीत फक्त आमंत्रित केलेलं आहे. तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही. मात्र माझ्याकडे एक जीआर आहे, त्यात प्रत्येक खासदार-आमदाराला ज्याला आमंत्रित केलेलं आहे, त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. मात्र, आम्हाला मत देण्याचा अधिकार नाही. लोकशाहीने दिलेल्या अधिकाराचा वापर करून आम्ही निधीबाबत प्रश्न उपस्थित केलं. मात्र, या सशक्त लोकशाहीत आमचा आवाज दाबण्याचं काम सुरू आहे. या हुकूमशाही विरोधात आपल्याला आवाज उठवायचा आहे,'', असा पलटवार सुप्रिया सुळे यांनी केलाय.
अजित पवारांमध्ये मी पणा - रोहित पवार
शहराचा विकास हा स्थानिकांनी केला. इथल्या स्थानिकांचे मन खूप मोठे आहे. इथल्या स्थानिकांनी राज्याच्या कानाकोपऱ्यातुन आलेल्या प्रत्येकाला स्वीकारले. त्यामुळं तुम्ही या शहराचा विकास केला. आता काहीजण स्वतः क्रेडिट घेतात. जसं वाडपी असतो त्याला वाटतं आपल्यामुळंच सर्वांची पोटं भरतात, तोच सगळं श्रेय लाटायला बघतो. हे मी पणातून होतंय. हा मी पणा भाजपमध्ये ठासून भरला आहे. तेच विचार काहींच्यामध्ये दिसतायत, असे म्हणत रोहित पवारांनी नाव न घेता अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच, सगळे जागे आहात ना? मग माझ्या मागे घोषणा द्या. पवार साहेब तुम आगे बढो, आवाज जरा कमी आहे. आता असा आवाज घुमवा की उद्या कोणाची तरी सभा (अजित पवार) होणार आहे, त्या सभेत ही फक्त अन फक्त पवार साहेबांचा आवाज घुमायला हवा, असेही रोहित पवार यांनी म्हटले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)