एक्स्प्लोर

Ajit Pawar Death Plane Crash: अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शोक प्रस्ताव, अजितदादांना श्रद्धांजली, उद्धव ठाकरेंसह कोणकोणते नेते भाषण करणार?

Ajit Pawar Death Plane Crash: अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत दिवंगत अजित पवार यांच्या स्मरणार्थ शोकप्रस्ताव मांडला जाणार आहे.

Ajit Pawar Death Plane Crash: महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात आज (२३ फेब्रुवारी) मुंबईतील विधानभवनात होत असून अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी वातावरण भावूक होण्याची शक्यता आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या निधनाबद्दल दोन्ही सभागृहात शोकप्रस्ताव मांडण्यात येणार आहे. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत या अधिवेशनाचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला असून अधिवेशन 25 मार्चपर्यंत चालणार आहे. राज्याचा अर्थसंकल्प 6 मार्च 2026 रोजी सादर केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Ajit Pawar Death Plane Crash: शोकप्रस्तावावर अनेक नेते बोलणार

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत स्व. अजित पवार यांच्या स्मरणार्थ शोकप्रस्ताव मांडला जाणार आहे. पारंपरिक पद्धतीनुसार हा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांकडून मांडला जाईल आणि त्यांच्याच हस्ते वाचून दाखवला जाईल. मात्र, यावेळी अनेक सदस्यांनी अजित पवार यांच्या कार्याबाबत सभागृहात मनोगत व्यक्त करण्याची इच्छा व्यक्त केल्याने शोकप्रस्तावावर विशेष चर्चा होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, विविध पक्षांचे गटनेते तसेच प्रत्येक पक्षातील किमान तीन सदस्य हे सभागृहात आपली भावना व्यक्त करणार असल्याची माहिती आहे.

Ajit Pawar Death Plane Crash: उद्धव ठाकरे उपस्थित राहणार

माजी मुख्यमंत्री आणि  शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे देखील आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधान परिषदेत उपस्थित राहणार आहेत. अजित पवार यांच्या शोकप्रस्तावाच्या वेळी ते सभागृहात उपस्थित राहणार आहे. या शोक प्रस्तावावेळी उद्धव ठाकरे भाषण करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

Ajit Pawar Death Plane Crash: 28 जानेवारीला झाला होता भीषण अपघात

अजित पवार 28 जानेवारी रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी बारामतीकडे जात असताना त्यांचे विमान धावपट्टीवर उतरताना कोसळले होते. त्यानंतर झालेल्या स्फोटात अजित पवार यांच्यासह विमानातील पाच जणांचा मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी 29 जानेवारीला बारामतीतील विद्या प्रतिष्ठान येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या वेळी हजारो कार्यकर्ते आणि नागरिकांनी उपस्थित राहून त्यांना अखेरचा निरोप दिला होता. त्यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना अनेक नेत्यांनी व्यक्त केली होती.

Ajit Pawar Death Plane Crash: अपघाताबाबत संशयही व्यक्त

दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी अलीकडेच या विमान अपघाताबाबत घातपाताचा संशय व्यक्त केला होता. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी विमानात गरजेपेक्षा जास्त इंधन असल्याचा मुद्दा उपस्थित केला. तसेच वैमानिक सुमित कपूर यांनी विमान मुद्दाम जमिनीवर आदळले असावे, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली होती.

आणखी वाचा 

Rohini Khadse on Ajit Pawar Death Plane Crash : आमचे रोहितदादा पाठपुरावा करताय, पण अधिवेशनात अजितदादांच्या मृत्यूबाबत सर्वपक्षीय आमदारांनी सरकारला जाब विचारावा; रोहिणी खडसेंची मागणी

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Prithviraj Chavan : कराड दक्षिण मतदारसंघात 58 हजार दुबार नावं, निवडणुकीपूर्वी नावं काढली असती तर कदाचित निकाल वेगळा असता: पृथ्वीराज चव्हाण
कराड दक्षिण मतदारसंघात 58 हजार दुबार नावं, निवडणुकीपूर्वी लेखी निवेदन दिलेलं पण... : पृथ्वीराज चव्हाण
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget