Ajit Pawar Camp: थांबायचं नाय आता जिंकायचं हाय, अजितदादांच्या राष्ट्रवादीची प्रचार मोहीम जोरात
Ajit Pawar Camp: अजित पवार गटाची विद्यार्थी संघटना, सांस्कृतिक विभाग, सामाजिक न्याय विभाग आणि अल्पसंख्याक विभाग या आघाडीच्या संघटनांकडून राज्यातील विविध भागांमध्ये उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अजितदादा जोरात
पुणे: सर्जनशीलता आणि अपारंपरिक कल्पना हे अजित पवार यांच्या निवडणूक प्रचाराचे प्रमुख वैशिष्ट्य बनले आहेत. अॅनिमेटेड व्हिडिओ, स्वाक्षरी मोहीम, रांगोळी स्पर्धा आणि मानवी साखळी उपक्रम अशा अनोख्या उपक्रमांद्वारे मतदारांशी जोडण्याचा राष्ट्रवादीचा (NCP Ajit Pawar Camp) प्रयत्न आहे. येत्या काही महिन्यांत राज्यात मतदान होणार असून 9.5 कोटींहून अधिक मतदार आहेत. नाविन्यपूर्ण संकल्पना राबवताना आणि समर्थकांशी जोडण्यासाठी, संपर्क वाढवण्यासाठी पक्ष डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. अनेक रंग आणि पैलूंनी सजली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रचार मोहिम; अॅनिमेटेड व्हिडिओ, स्वाक्षरी मोहिम आणि मानवी साखळी उपक्रम ठरल्या अजित पवारांच्या (Ajit Pawar) प्रचार मोहिमेच्या जमेच्या बाजू ठरताना दिसत आहेत.
आज शिरूर विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांकडून 'मानवी साखळी उपक्रम' आयोजित करण्यात आला होता. विधानसभा मतदारसंघातील वाघेश्वर महादेव मंदिर, मांडवगण फराटा गावात मानवी साखळी बनवत शेकडो महिलांनी कल्याणकारी योजनांच्या समर्थनार्थ गावात जागृती मोहिम राबवली. यावेळी मांडवगण फराटा भागातील सरपंच समिक्षा अक्षय फराटे, महिला जिल्हाध्यक्षा मोनिका हरगुडे, महिला तालुकाध्यक्ष आरती ताई भुजबळ आदी उपस्थित होते. रविवारी, पक्षाच्या महिला शाखेने पुणे जिल्ह्यातील पर्वती आणि हडपसर विधानसभा मतदारसंघात स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन केले होते ज्यात कल्याणकारी योजनांच्या समर्थनार्थ हजारो लोकांनी स्वाक्षऱ्या केल्या. या कार्यक्रमांदरम्यान पक्षाचे प्रचार गीत 'दादा चा वादा' वाजवले गेले. यावेळी लोकांनी गाण्याच्या बीटवर ठेका धरला.
उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार निवडणूक प्रचारासाठी सोशल मीडियावर नवनवीन तंत्रांचा अवलंब करत समर्थकांशी संवाद साधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. काल, 'मुख्यमंत्री बळीराजा विज सावलत योजने' बद्दल सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एक अॅनिमेटेड व्हिडिओ शेअर केला होता. या योजनेद्वारे, सरकार 44.06 लाख शेतकऱ्यांना मदत करत 7.5 अश्वशक्ती क्षमतेच्या कृषी पंप ग्राहकांना मोफत वीज पुरवत आहे. था योजनेसाठी नुकत्याच आलेल्या अर्थसंकल्पात 14,761 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.
लाडकी बहीण योजनेचं जोरदार प्रमोशन
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे शुक्रवारी पुण्यात 'स्वाक्षरी मोहिमेत' सहभागी झाले. हजारो लोकांनी पांढऱ्या कॅनव्हासवर स्वाक्षरी केली 'माझी लाडकी बहीण योजनेला माझा पाठिंबा आहे आणि ती पुढील ५ वर्षे सुरू राहावी अशी माझी इच्छा आहे", असा मजकूर त्यावर लिहीला होता.
काही दिवसांपासून पक्षाच्या युवक आणि महिला आघाडीसह इतर संघटना मतदारांशी जोडण्यासाठी विविध अनोखे उपक्रम राबवत आहेत. युवा नेते सूरज चव्हाण यांनी राज्यातील विविध मतदारसंघात स्वाक्षरी मोहीम हाती घेतली आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि पक्षाच्या जामखेड शाखेच्या वतीने काल लाडकी बहीण योजना व इतर विविध कल्याणकारी योजनांच्या समर्थनार्थ जामखेड येथील मुख्य चौकात भव्य स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी युवती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा संध्या सोनवणे, राष्ट्रवादीचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ विधानसभा मतदारसंघातही रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. लोकांनी विविध योजनांवर आधारीत संकल्पनांवर सुंदर रांगोळ्या काढल्या.
वडगाव शेरी मतदारसंघातही जोरदार प्रचार
वडगाव शेरी विधानसभेत सूरज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली प्रचार करण्यात आला, यावेळी आमदार सुनील टिंगरे, पुणे शहर अध्यक्ष दीपक भाऊ मानकर, पुणे युवक शहराध्यक्ष समीर दादा चांदेरे यांचीही उपस्थिती होती. 11 सप्टेंबर रोजी सुरज चव्हाण यांनी पिंपरी विधानसभा मतदारसंघातील विविध ठिकाणी स्वाक्षरी मोहीम राबवली. तत्पूर्वी, 05 सप्टेंबर शुक्रवारी वडगाव शेरी विधानसभेत सूरज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली प्रचार करण्यात आला, यावेळी आमदार सुनील टिंगरे, पुणे शहर अध्यक्ष दीपक भाऊ मानकर, पुणे युवक शहराध्यक्ष समीर दादा चांदेरे यांचीही उपस्थिती होती. 11 सप्टेंबर रोजी सुरज चव्हाण यांनी पिंपरी विधानसभा मतदारसंघातील विविध ठिकाणी स्वाक्षरी मोहीम राबवली. तत्पूर्वी, 05 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही पुण्यात या अभियानाचे आयोजन केले होते.
गणपती बसतात त्या दिवशी, माझी लाडकी बहीण योजनेसह कल्याणकारी योजनांवर अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एक अॅनिमेटेड व्हिडिओ शेअर केला होता, ज्या अंतर्गत महिलांना 1500 रुपयांची मदत दिली जाते. 1.6 कोर्टी पेक्षा जास्त लाभार्थ्यांना याचा हप्ता मिळाला आहे. अन्नपूर्णा योजनेंतर्गत 52 लाख कुटुंबांना मोफत सिलिंडर मिळत आहेत, अजित पवार या योजनांचं श्रेय गणपती बाप्पाला देत आहेत. 08 सप्टेंबर रोजी पक्षाने 'दादाचा वादा' हे एक नवीन प्रचार गीत लाँच केले, ज्याला एका दिवसात 1 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. काही आठवड्यांपूर्वी, अजित पवार यांनी 'काम करत अलोय, काम करत राहू' हे एक नवीन प्रचार गाणंही लाँच केलं होतं. या गाण्याचा व्हिडिओ लाँच झाल्यानंतर काही दिवसांतच याला सोशल मीडियावर 75 लाखांहून अधिक व्यूज मिळाले होते.
आणखी वाचा
'महायुतीतील सर्वांशी जुळवून घ्या', अजित पवार देणार सल्ला; बोलावली महत्त्वाची बैठक