एक्स्प्लोर

Video: पुण्यातील बैठकीत काका-पुतण्या एकत्र; शरद पवारांच्या प्रश्नावर अजित दादांचं उत्तर, पण बघणं टाळलं

उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली.

पुणे : उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते अजित पवार (Ajit Pawar) नेहमीच पक्षाचे संस्थापक शरद पवार यांच्यासमवेत स्टेज शेअर करण्याचं टाळतात. मात्र, शरद पवार अजित पवारांसमोर आवर्जून येतात, यापूर्वीही एक-दोनवेळा असे प्रसंग घडले आहेत. आता, पुणे जिल्ह्याच्या नियोजन मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीतही शरद पवार आणि अजित पवार समोरासमोर आले होते. पुण्याचे  (Pune) पालकमंत्री म्हणून अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. तर, राज्यसभा खासदार म्हणून शरद पवार (Sharad pawar) या बैठकीला उपस्थित होते. विशेष म्हणजे शरद पवार हे बैठकीसाठी 5 मिनिटं आधीच सभागृहात आले होते. तर, नंतर आलेल्या अजित पवारांनी दोन खुर्च्या सोडून बसणं पसंत केल्याचं दिसून आलं. विशेष म्हणजे, बैठक पूर्ण होईपर्यंत अजित पवारांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे बसलेल्या बाजूला बघणेही टाळलं होतं. त्यामुळे, पुण्यातील या डीपीडीसी बैठकीची पुणे जिल्ह्यात आणि राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. 

उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. विभागीय आयुक्त कार्यालयात दुपारी दोन वाजता डीपीडीसीच्या बैठकीला सुरुवात झाली होती. या बैठकीला खासदार आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे व जिल्ह्यातील आमदार, पदाधिकारी उपस्थित होते. यापूर्वी महाविकास आघाडी सरकार असताना शरद पवारांनी अचानकपणे डीपीडीसी बैठकीला हजेरी लावली होती. त्यानंतर, आजच्या डीपीडीसी बैठकीनिमित्त पवार काका-पुतणे समोरासमोर आल्याचं पाहायला मिळालं. तसेच, या बैठकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेते आणि पालकमंत्री अजित पवार यांच्यात थेट सवाल-जवाब पाहायला मिळाला. तर, शरद पवार यांनीही बारामतीती दूषित पाणी येत असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. 

शरद पवारांचा प्रश्न

बारामतीत पाणी दूषित येत आहे, हात घातला की काळे पाणी येत आहे, त्या अनुषंगाने कारवाई करा, असा प्रश्न शरद पवारांनी उपस्थित केला होता. त्यावर, बारामती परिसरात काही कारखाने प्रदूषण करत आहेत, त्यासंदर्भात प्रदूषण बोर्डाशी बोलून नोटीसा पाठवायला सांगितल्या आहेत, कारखाने बंद केले तर शेतकऱ्यांची अडचण होईल, असे उत्तर अजित पवारांनी दिले. तर, सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हेंनीही प्रश्न विचारल्याचं दिसून आलं.  

अमोल कोल्हेंनीही विचारला प्रश्न

शरद पवारांच्या समोर सुप्रिया सुळें आणि अमोल कोल्हे यांच्याकडून लोकसभा सदस्यांना निधी न दिल्याची तक्रार अजित पवारांकडे करण्यात आली. मावळ लोकसभेला निधी मिळतो आम्हाला का नाही असा सवाल, अमोल कोल्हेंनी उपस्थित केला होता. त्यावर, अजित पवारांनी थेट उत्तर देण टाळलं, तर जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं. त्यामुळे, डीपीडीसीच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये चांगलीच जुगलबंदी पाहायला मिळाली. तर, शरद पवार स्वत: बैठकीला असल्याने सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचाही आत्मविश्वास बळावल्याचं दिसून आलं. 

हेही वाचा

41 दिवसांनी आचारसंहिता लागू होणार; उद्धव ठाकरेंनी विधानसभेचं रणशिंग फुंकलं, भगवा सप्ताहाची घोषणा

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

PADU यंत्र 2004 पासून, मार्कर 2011 पासून मार्कर वापरला जात आहे, 2 टक्के ईव्हीएम खराब आहेत मान्य करतो, 10 वर्षात बदलली नाहीत: दिनेश वाघमारे, मुख्य निवडणूक आयुक्त
PADU यंत्र 2004 पासून, मार्कर 2011 पासून मार्कर वापरला जात आहे, 2 टक्के ईव्हीएम खराब आहेत मान्य करतो, 10 वर्षात बदलली नाहीत: दिनेश वाघमारे, मुख्य निवडणूक आयुक्त
महापालिकांसाठी मतदान सुरू असतानाच जळगावात गोळीबार; पोलिसांची फौज दाखल, SP रेड्डींनी दिली माहिती
महापालिकांसाठी मतदान सुरू असतानाच जळगावात गोळीबार; पोलिसांची फौज दाखल, SP रेड्डींनी दिली माहिती
'शहा सेनेचे' लोक भाजपच्या लोकांना ठेचताना दिसत आहेत, त्याकडे लक्ष द्या, आम्ही मुंबई आणि मराठी रक्षणासाठी रस्त्यावर आहोत; सीएम फडणवीसांच्या ‘ठेचून काढू’वर राऊतांचा गर्भित इशारा
'शहा सेनेचे' लोक भाजपच्या लोकांना ठेचताना दिसत आहेत, त्याकडे लक्ष द्या, आम्ही मुंबई आणि मराठी रक्षणासाठी रस्त्यावर आहोत; सीएम फडणवीसांच्या ‘ठेचून काढू’वर राऊतांचा गर्भित इशारा
Gold Rate : सोने दरातील वाढीचा ट्रेंड कायम, गुंतवणूकदारांची मोठी कमाई, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
सोने दरातील वाढीचा ट्रेंड कायम, गुंतवणूकदारांची मोठी कमाई, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या

व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai : ..आणि शाई पुसा, परत जा… मतदान करुन बाहेर पडताच राज ठाकरे संतापले
Ashish Shelar PC : भ्रष्ट आणि अकार्यक्षण ठाकरे बंधूंना धडा शिकवण्याची ही शेवटची निवडणूक
Devendra Fadnavis On Voting : माझ्या हातावरील मार्कर पुसून दाखवा, राज ठाकरेंना फडणवीसांचं उत्तर
Rohit Pawar Pimpari Chinchwad : एका मताला ५००० चा भाव, मतदानाच्यादिवशी भाजपवर गंभीर आरोप
Ambadas Danve on BJP : भाजपला पैशांची मस्ती, उन्माद, संभाजीनगरात दानवेंच्या भावाचा संताप अनावर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PADU यंत्र 2004 पासून, मार्कर 2011 पासून मार्कर वापरला जात आहे, 2 टक्के ईव्हीएम खराब आहेत मान्य करतो, 10 वर्षात बदलली नाहीत: दिनेश वाघमारे, मुख्य निवडणूक आयुक्त
PADU यंत्र 2004 पासून, मार्कर 2011 पासून मार्कर वापरला जात आहे, 2 टक्के ईव्हीएम खराब आहेत मान्य करतो, 10 वर्षात बदलली नाहीत: दिनेश वाघमारे, मुख्य निवडणूक आयुक्त
महापालिकांसाठी मतदान सुरू असतानाच जळगावात गोळीबार; पोलिसांची फौज दाखल, SP रेड्डींनी दिली माहिती
महापालिकांसाठी मतदान सुरू असतानाच जळगावात गोळीबार; पोलिसांची फौज दाखल, SP रेड्डींनी दिली माहिती
'शहा सेनेचे' लोक भाजपच्या लोकांना ठेचताना दिसत आहेत, त्याकडे लक्ष द्या, आम्ही मुंबई आणि मराठी रक्षणासाठी रस्त्यावर आहोत; सीएम फडणवीसांच्या ‘ठेचून काढू’वर राऊतांचा गर्भित इशारा
'शहा सेनेचे' लोक भाजपच्या लोकांना ठेचताना दिसत आहेत, त्याकडे लक्ष द्या, आम्ही मुंबई आणि मराठी रक्षणासाठी रस्त्यावर आहोत; सीएम फडणवीसांच्या ‘ठेचून काढू’वर राऊतांचा गर्भित इशारा
Gold Rate : सोने दरातील वाढीचा ट्रेंड कायम, गुंतवणूकदारांची मोठी कमाई, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
सोने दरातील वाढीचा ट्रेंड कायम, गुंतवणूकदारांची मोठी कमाई, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
पुण्यात गावाकडनं आणले मतदार, सोलापुरात कर्नाटकातून गाड्या भरल्या; बोगस मतदारांचा सुळसुळाट
पुण्यात गावाकडनं आणले मतदार, सोलापुरात कर्नाटकातून गाड्या भरल्या; बोगस मतदारांचा सुळसुळाट
बाईचं नाव रविंद्र असतं का? बोटावरील शाई नाही, लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर उद्धव ठाकरेंचा घणाघात
बाईचं नाव रविंद्र असतं का? बोटावरील शाई नाही, लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Election Commission Voter Ink: बोटावरील शाई पुसली जातेय, राज ठाकरे संतापले; निवडणूक आयोग म्हणाले, पुन्हा मतदान करता येणार नाही, कारण...
शाई पुसली जातेय, राज ठाकरे संतापले; निवडणूक आयोग म्हणाले, पुन्हा मतदान करता येणार नाही, कारण...
अकोल्यात पडदाशीन यंत्रणेचा बोजवारा, बुरखाधारी महिलांना ओळख न पटवताच सोडलं; मतदान केंद्रावर गोंधळ
अकोल्यात पडदाशीन यंत्रणेचा बोजवारा, बुरखाधारी महिलांना ओळख न पटवताच सोडलं; मतदान केंद्रावर गोंधळ
Embed widget