एक्स्प्लोर

शिवसेनेच्या इशाऱ्यानंतर अमोल कोल्हेंचा पिंपरीतील जनता दरबार रद्द; महाविकास आघाडीत बिघाडी?

लोकसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर खासदार डॉ. कोल्हे यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघात विधानसभानिहाय जनता दरबार कार्यक्रमाचे आयोजन केले

पुणे : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार असलेल्या अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांना दुसऱ्यांदा शिरुर लोकसभा मतदारसंघातून प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. येथील जनतेने शिवाजीराव आढळराव पाटील यांना नाकारत कोल्हेंना दुसऱ्यांदा खासदार केले. त्यामुळे, साहजिकच त्यांचा उत्साह वाढला असून आता विधानसभा निवडणुकांसाठी ते कार्यकर्त्यांना बळ देत आहेत. त्याच अनुषंगाने भोसरी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी 18 जुलै रोजी आयोजित केलेले जनता दरबार कार्यक्रम काही अपरिहार्य कारणास्तव रद्द करण्यात आला आहे. मात्र, शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी दर्शवल्यामुळे आणि राष्ट्रवादीला इशारा दिल्यामुळेच हा दौरा रद्द करण्यात आल्याचे समजते. 

लोकसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर खासदार डॉ. कोल्हे यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघात विधानसभानिहाय जनता दरबार कार्यक्रमाचे आयोजन केले. त्यानुसार हडपसर, आंबेगाव विधानसभा मतदारसंघातही जनता दरबार कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर, भोसरी विधानसभा मतदारसंघात 18 जुलै रोजी दोन ठिकाणी जनता दरबार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, काही अपरिहार्य कारणास्तव हे दोन्ही जनता दरबार तूर्तास पुढे ढकलण्यात आले असून लवकरच नवीन तारीख कळविण्यात येणार आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महायुती तसेच महाविकास आघाडीकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू करून दिली आहे. पिंपरी चिंचवडमधील तीनही विधानसभा मतदारसंघात महायुतीला शह देण्यासाठी महाविकास आघाडीकडून राजकीय चाचपणी सुरू आहे. त्यातच, शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाने आणि स्थानिक इच्छुकांनी कामाला सुरुवात केल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे आजच अजित गव्हाणे यांच्या शरद पवार गटातील प्रवेशाने महाविकास आघडीत काहीही बिघाडी झाल्याचं चित्र आहे. तर, दुसरीकडे भोसरी विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीच्या दावेदार सुलभा उबाळे यांनी भोसरीमध्ये यंदा मशाल पेटवू, रुतलेल्या विकासाला नवदिशा देऊ.. असा संकल्प केला. त्याच अनुषंगाने खासदार अमोल कोल्हे यांनी येथे जनता दरबाराचे आयोजन केले होते. मात्र, ऐनवेळी हा जनता दरबार रद्द करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा होत आहेत.

अजित गव्हाणेंच्या प्रवेशानंतर दौरा रद्द

पिंपरी-चिंचवडमधील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे आणि समर्थकांनी आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केला. त्यानंतर आता त्याचे पडसाद ठाकरेंच्या शिवसैनिकांमध्ये उमटल्याचं चित्र दिसून येत आहे. अजित गव्हाणे आणि समर्थकांच्या पक्षप्रवेशानंतर भोसरी विधानसभेतील शिवसैनिकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी तातडीनं बैठक घेतली. त्यामध्ये अजित गव्हाणेंना तिकीट दिलं, तर आपण तुतारीचा प्रचार करायचा का नाही? याबाबत प्रदीर्घ चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली. त्यातूनच अमोल कोल्हेंचा पिंपरी दौरा रद्द झाल्याची माहिती आहे.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नादच खुळा... योगी सरकारची लाडका युट्यूबर योजना, महिन्याला 8 लाख रुपये कमावण्याची संधी
नादच खुळा... योगी सरकारची लाडका युट्यूबर योजना, महिन्याला 8 लाख रुपये कमावण्याची संधी
मोठी बातमी! पुण्यातील बिल्डर अविनाश भोसलेंना मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी 2 वर्षांनंतर जामीन
मोठी बातमी! पुण्यातील बिल्डर अविनाश भोसलेंना मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी 2 वर्षांनंतर जामीन
Sugar Factory : निवडणुकीच्या आधी अभिजीत पाटलांसह 5 सहकारी साखर कारखान्यांना 'पहिला हप्ता', NCDC कडून 487 कोटी रक्कम जमा
निवडणुकीच्या आधी अभिजीत पाटलांसह 5 सहकारी साखर कारखान्यांना 'पहिला हप्ता', NCDC कडून 487 कोटी रक्कम जमा
39 लाखाचे घर 29 लाखात, 62 लाखाचे घर 50 लाखात; म्हाडाकडून खुशखबर,  370 घरं 10 ते 12 लाखांनी स्वस्त
39 लाखाचे घर 29 लाखात, 62 लाखाचे घर 50 लाखात; म्हाडाकडून खुशखबर, 370 घरं 10 ते 12 लाखांनी स्वस्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM  : 28 August 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सZero Hour Guest Center : आदित्य ठाकरे निलेश राणे आमने-सामने! भाजप नेते प्रमोद जठार काय म्हणाले?ABP Majha Headlines : 08 PM  : 28 August 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP Majha 8 PM

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नादच खुळा... योगी सरकारची लाडका युट्यूबर योजना, महिन्याला 8 लाख रुपये कमावण्याची संधी
नादच खुळा... योगी सरकारची लाडका युट्यूबर योजना, महिन्याला 8 लाख रुपये कमावण्याची संधी
मोठी बातमी! पुण्यातील बिल्डर अविनाश भोसलेंना मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी 2 वर्षांनंतर जामीन
मोठी बातमी! पुण्यातील बिल्डर अविनाश भोसलेंना मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी 2 वर्षांनंतर जामीन
Sugar Factory : निवडणुकीच्या आधी अभिजीत पाटलांसह 5 सहकारी साखर कारखान्यांना 'पहिला हप्ता', NCDC कडून 487 कोटी रक्कम जमा
निवडणुकीच्या आधी अभिजीत पाटलांसह 5 सहकारी साखर कारखान्यांना 'पहिला हप्ता', NCDC कडून 487 कोटी रक्कम जमा
39 लाखाचे घर 29 लाखात, 62 लाखाचे घर 50 लाखात; म्हाडाकडून खुशखबर,  370 घरं 10 ते 12 लाखांनी स्वस्त
39 लाखाचे घर 29 लाखात, 62 लाखाचे घर 50 लाखात; म्हाडाकडून खुशखबर, 370 घरं 10 ते 12 लाखांनी स्वस्त
नितीन गडकरींनी मैदानात उतरावं; विधानसभेसाठी सक्रिय भूमिका बजावावी, RSS आग्रही
नितीन गडकरींनी मैदानात उतरावं; विधानसभेसाठी सक्रिय भूमिका बजावावी, RSS आग्रही
Video : अजित दादांना ताईंचा दे धक्का?; राष्ट्रवादीचा आमदार थेट सुप्रिया सुळेंच्या कारमध्ये
Video : अजित दादांना ताईंचा दे धक्का?; राष्ट्रवादीचा आमदार थेट सुप्रिया सुळेंच्या कारमध्ये
तू छान दिसतेय, कपडे छान आहेत; अधिकाऱ्याकडून विनयभंग, लिपिक महिलेची पोलिसात धाव
तू छान दिसतेय, कपडे छान आहेत; अधिकाऱ्याकडून विनयभंग, लिपिक महिलेची पोलिसात धाव
Bachhu Kadu : संभाजीराजेंच्या भेटीनंतर बच्चू कडूंचा सरकारवर हल्लाबोल; तिसऱ्या आघाडीबाबत मोठं वक्तव्य
संभाजीराजेंच्या भेटीनंतर बच्चू कडूंचा सरकारवर हल्लाबोल; तिसऱ्या आघाडीबाबत मोठं वक्तव्य
Embed widget