एक्स्प्लोर

संजय राऊत यांच्या आक्रमक भूमिकेनंतर बड्या नेत्याचा तातडीने फोन, काँग्रेसचा सावध पवित्रा?

Mumbai News : महाविकास आघाडीत फूट पडू शकते असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता काँग्रेसने सावध पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे.

Mumbai News : स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांच्याबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केलेलं वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेने (Shiv Sena) आक्रमक भूमिका घेतली आहे. सावरकरांचा अपमान खपवून घेणार नाही, अशामुळे महाविकास आघाडीत (Maha Vikas Aaghadi) फूट पडू शकते असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता काँग्रेसने सावध पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी असलेले काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी संजय राऊत यांना फोन करुन त्यांच्याशी संवाद साधला. 

"मी सकाळीच संजय राऊतांशी बोललो, खूप दीर्घ चर्चा झाली. सावरकर प्रकरणावर त्यांचे आणि राहुल गांधींचे विचार वेगळे आहेत. मतभेदाच्या अधिकारावर आमचा विश्वास आहे असं बोलणं त्यांच्या-माझ्यात झालं. त्यामुळे याचा महाविकास आघाडीवर काहीच परिणाम होणार नाही असं संजय राऊतांनी सांगितल्याचं जयराम रमेश म्हणाले. 

होय, मला जयराम रमेश यांचा फोन आला : संजय राऊत 
तिकडे संजय राऊत यांनीही जयराम रमेश यांनी फोन आल्याची माहिती दिली. संजय राऊत म्हणाले, " भारत जोडो यात्रेत सहभागी असलेले जयराम रमेश यांनी माझ्याशी फोनवर चर्चा केली बराच वेळ आम्ही फोनवर बोललो.  काही विषयांवर नक्कीच मतभेद आहेत त्या संदर्भात आम्ही माहिती उद्धव ठाकरे यांना दिली आहे". 

सावरकरांबाबत शिवसेनेची ठाम भूमिका 
काल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सावरकरांवर आपली भूमिका स्पष्ट केली होती.  राहुल गांधी यांनी सावरकर यांच्यावर केलेली वक्तव्य हे शिवसेनेला मान्य नाहीत. सावरकर हे महाराष्ट्रासाठी देशासाठी आदराचं आणि श्रद्धेचा विषय आहे विशेषता आमच्यासाठी, असं संजय राऊत यांनी ठणकावून सांगितलं. 

भारत जोडो यात्रेचा हा अजेंडा नव्हता,  हा विषय नव्हता, आमची भूमिका स्पष्ट केली आहे.  आम्ही आमच्या भूमीवर ठाम आहोत आणि राहणार आम्ही सावरकरांवर केलेली टिपणी सहन करणार नाही, असं संजय राऊत म्हणाले. 

मनसे-भाजपचं ढोंग
दरम्यान, राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर मनसे आणि भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसैनिकांनी राज ठाकरेंच्या आदेशानंतर बुलडाण्यात जाऊन, राहुल गांधींच्या शेगावातील सभेत निषेध नोंदवण्याचा निर्धार केला. तर इकडे मुंबई, ठाण्यात भाजपने रस्त्यावर उतरुन राहुल गांधींचा निषेध केला. मात्र  मनसे-भाजप रस्त्यावर उतरले हे ढोंग आहे.  राजकीय फायदे तोटे पाहून वीर सावरकरांवरून रस्त्यावर उतरण्याचं काहींचं काम सुरू आहे, असं संजय राऊत म्हणाले. 

सरदार पटेलांप्रमाणे सावरकरांचा पुतळा उभारा 
जर भाजपला वीर सावरकरांबाबत इतका  मान असता तर सरदार वल्लभाई पटेल यांचा जसा पुतळा बनवला तसा पुतळा वीर सावरकरांचा दिल्लीमध्ये बनवला असता. आमची तर स्टँडिंग डिमांड आहे की सावरकरांना भारतरत्न द्यावा, असं संजय राऊत म्हणाले.

VIDEO : Sanjay Raut : आम्ही Savarkar भक्त आहोत आणि राहणार, राहुल गांधींची भूमिका मान्य नाही ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

KDMC : कल्याण-डोंबिवली महापालिकेत बंदुका घेऊन फिरायला परवानगी? अनुचित घटना घडल्यास जबाबदार कोण?
कल्याण-डोंबिवली महापालिकेत बंदुका घेऊन फिरायला परवानगी? अनुचित घटना घडल्यास जबाबदार कोण?
गावच्या पारावर ओबीसी आरक्षणावरून निराशा, नातवाच्या नोकरीच्या चिंतेनं तडक शेत गाठलं अन्.., बीडमध्ये खळबळ
गावच्या पारावर ओबीसी आरक्षणावरून निराशा, नातवाच्या नोकरीच्या चिंतेनं तडक शेत गाठलं अन्.., बीडमध्ये खळबळ
हृदयद्रावक !  4 वर्षांचं  बाळ नाल्यात वाहून गेलं, तासाभराने मृतदेह आईसमोर, आक्रोशानं गोंडेगाव सुन्न
हृदयद्रावक ! 4 वर्षांचं बाळ नाल्यात वाहून गेलं, तासाभराने मृतदेह आईसमोर, आक्रोशानं गोंडेगाव सुन्न
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 सप्टेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 सप्टेंबर 2025 | गुरुवार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 6 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : TOP Headlines : 15 Sep 2025 : ABP Majha
Ind beat Pak Asia Cup 2025 : दुबईती 'ऑपरेशन विजय'...भारतीय संघाकडून पाकचा धुव्वा
Navi Mumbai Airport Special Report : नवीमुंबई विमानतळाच्या नावाचा वाद पेटला, भूमीपुत्र एकवटले
Animal Cruelty | Pimpri Chinchwad मध्ये Siberian Husky ला अमानुष मारहाण, जीव घेतला
Private University Row | नाशिकमध्ये MVP संस्थेच्या सभेत गोंधळ, धक्काबुक्की

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
KDMC : कल्याण-डोंबिवली महापालिकेत बंदुका घेऊन फिरायला परवानगी? अनुचित घटना घडल्यास जबाबदार कोण?
कल्याण-डोंबिवली महापालिकेत बंदुका घेऊन फिरायला परवानगी? अनुचित घटना घडल्यास जबाबदार कोण?
गावच्या पारावर ओबीसी आरक्षणावरून निराशा, नातवाच्या नोकरीच्या चिंतेनं तडक शेत गाठलं अन्.., बीडमध्ये खळबळ
गावच्या पारावर ओबीसी आरक्षणावरून निराशा, नातवाच्या नोकरीच्या चिंतेनं तडक शेत गाठलं अन्.., बीडमध्ये खळबळ
हृदयद्रावक !  4 वर्षांचं  बाळ नाल्यात वाहून गेलं, तासाभराने मृतदेह आईसमोर, आक्रोशानं गोंडेगाव सुन्न
हृदयद्रावक ! 4 वर्षांचं बाळ नाल्यात वाहून गेलं, तासाभराने मृतदेह आईसमोर, आक्रोशानं गोंडेगाव सुन्न
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 सप्टेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 सप्टेंबर 2025 | गुरुवार
अखेर सोनाली आंदेकर पोलिसांच्या ताब्यात, आयुष कोमकर प्रकरणात मोठी कारवाई, आता संपूर्ण कुटुंब रडारवर
अखेर सोनाली आंदेकर पोलिसांच्या ताब्यात, आयुष कोमकर प्रकरणात मोठी कारवाई, आता संपूर्ण कुटुंब रडारवर
जीआरचा मराठा समाजाला फायदा नाही, सहा मुलांची नावे देतो, एका महिन्यात नव्या जीआरनुसार प्रमाणपत्र व्हॅलेडिटी करून द्यावे; मराठा क्रांती मोर्चाकडून गोलमेज परिषदेतून चॅलेंज
जीआरचा मराठा समाजाला फायदा नाही, सहा मुलांची नावे देतो, एका महिन्यात नव्या जीआरनुसार प्रमाणपत्र व्हॅलेडिटी करून द्यावे; मराठा क्रांती मोर्चाकडून गोलमेज परिषदेतून चॅलेंज
बाळासाहेबांच्या बाजूला आनंद दिघेंचा फोटो लावताय, ठाकरे ब्रँडचे महत्व कमी करण्यासाठी राष्ट्रीय कट; संजय राऊतांचा शिंदेंवर निशाणा
बाळासाहेबांच्या बाजूला आनंद दिघेंचा फोटो लावताय, ठाकरे ब्रँडचे महत्व कमी करण्यासाठी राष्ट्रीय कट; संजय राऊतांचा शिंदेंवर निशाणा
राहुल गांधी केस का करु शकत नाहीत? डिसेंबर 2023 मध्ये मोदी सरकारने कायद्यातच असा बदल की निवडणूक आयुक्तांविरुद्ध मृत्यूपर्यंत कोणताच खटला चालवू शकत नाही, केरळ काँग्रेसने कायदा दाखवला
राहुल गांधी केस का करु शकत नाहीत? डिसेंबर 2023 मध्ये मोदी सरकारने कायद्यातच असा बदल की निवडणूक आयुक्तांविरुद्ध मृत्यूपर्यंत कोणताच खटला चालवू शकत नाही, केरळ काँग्रेसने कायदा दाखवला
Embed widget