एक्स्प्लोर

मागल्या दाराने मराठीद्वेषी भाजपाचं काय चाललंय? मराठी रंगभूमी दालनवरुन आदित्य ठाकरेंचा सवाल

मुंबईतील मराठी रंगभूमी दालन गुपचूप रद्द का केलं? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. 

मुंबई : राज्यात इयत्ता पहिलीपासून तिसरी भाषा सक्तीची केली असून राज्य सरकारने हिंदीसह (Hindi) इतरही प्रादेशिक भाषांचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. सरकारच्या या निर्णयाला मनसेनं स्पष्ट शब्दात विरोध दर्शवला असून राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. त्यानंतर, इतर राजकीय पक्षांकडून देखील या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. राज्यात मराठी भाषेलाच प्राधान्य असून हिंदीची सक्ती खपवून घेतली जाणार नाही, असेही सांगितले जात आहे. तर, या निर्णयामागे भाजप (BJP) किंवा सरकारचा हिंदी भाषा लादण्याचा छुपा अजेंडा असल्याचाही आरोप होत आहे. आता, शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी ट्विट करत हिंदी भाषेच्या सक्तीला विरोधच राहिल, असे स्पष्ट केले. तसेच, मुंबईतील मराठी रंगभूमी दालन गुपचूप रद्द का केलं? असा सवालही उपस्थित केला आहे. 

आमचा कुठल्याही भाषेला विरोध नाही, पण त्या भाषेच्या सक्तीला विरोध आहेच. त्याविरुद्ध आंदोलन सुरु असताना आणि मराठी माणूस पेटून उठलेला असताना, आपल्या लक्षात येतंय का की मागल्या दाराने मराठीद्वेषी भाजपाचं काय चाललंय? असे म्हणत आदित्य ठाकरेंनी संताप व्यक्त केला. गिरगाव चौपाटी येथे उद्धवसाहेबांनी मुंबईत सुरु केलेलं 'मराठी रंगभूमी दालन' गुपचूप रद्द करायचं, तिसरीकडे मराठी भाषा भवनात इतर कार्यालयं घुसवून त्याचं महत्व कमी करायचं आणि त्यातूनही मराठी भाषा भवनाच्या कामाला मुद्दाम उशीर करुन घोंगडं भिजवत ठेवायचं, असा सरकारचा डाव असल्याचे आदित्य यांनी म्हटलं आहे.  

हे सगळं कश्यासाठी करतंय भाजपा? गिरगाव चौपाटी येथे मराठीला विरोध कोणाचा असेल? स्थानिकांचा तर नव्हता, मग स्थानिक भाजपा आमदाराने केला का? की कुठल्या बिल्डर मित्राला ती जागा देणार आहेत? ह्याचे उत्तर महाराष्ट्र द्वेष्टे भाजपा देणार का? आणि ह्यांचा हा खेळ आपण मुंबईकर वेळेत ओळखणार का?, असा सवालही आदित्य यांनी उपस्थित केला आहे. आदित्य ठाकरेंनी नाव न घेता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह सरकारवर निशाणा साधला आहे. 

हिंदी सक्तीला मनसेचा विरोध

महाराष्ट्र शासन छुप्या मार्गाने महाराष्ट्रात पहिली पासूनच्या विद्यार्थ्यांवर तिसरी भाषा म्हणून हिंदी लादण्यात आल्याचा आरोप मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केला आहे.त्यास सुरवातीपासून मनसेने विरोध केल्याने शासननिर्णयातील “अनिवार्य” हा शब्द काढून “सर्वसाधारण” असा शब्द घेतला आहे. हा कावा मराठी माणसानं वेळीच ओळखला पाहिजे म्हणत मनसेनं विविध शाळा व प्रशासकीय कार्यालयात जाऊन आंदोलन केले. 

हेही वाचा

मॉडेलिंग हा अपघात, माझ्यासोबतचा प्रँक; देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं 90s चं सर्वात आवडतं गाणं कोणतं?

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Aaditya Thackeray : मुख्यमंत्री महोदय, जेन झीनं स्क्रीनवर नसायला पाहिजे आणि मैदानांवर असावं पण तुम्ही मैदानं ठेवताय कुठे? : आदित्य ठाकरे
मुंबई गेल्या चार वर्षात बदलली, 17 मैदानांचं आरक्षण बदललं, मैदानं वाचवण्यासाठी एकत्र यावं लागेल : आदित्य ठाकरे
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव

व्हिडीओ

Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
Sambhajinagar News: तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
Embed widget